Thursday, May 21, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

आसनगाव प्रकरणात जिल्हाधिकारी संधी शोधण्याच्या प्रयत्नात

पालघर दर्पण by पालघर दर्पण
March 20, 2026
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला धुडकावून दस्तऐवज नोंदणी
0
SHARES
347
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

आसनगाव प्रकरणात जिल्हाधिकारी संधी शोधण्याच्या प्रयत्नात

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी दुय्यम निबंधकांना काढले जुन्या तारखेने पत्र

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

डहाणू दुय्यम निबंधक यांनी केला स्वतः ला वाचवण्यासाठी खोटा खुलासा?

पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील

पालघर: डहाणू तालुक्यातील आसनगाव येथील वर्ग दोनच्या जमीनींचे बेकायदेशीर साठे करार कुलमुखत्यार पत्र रजिस्टर नोंदणी केल्या प्रकरणी आता वेगळाच प्रकार समोर आला आहे. या विषयी आमदार जितेंद्र आव्हाड यंनी मुख्यमंत्री यांना ट्विट केल्यानंतर पालघर जिल्हाधिकारी यांनी दुय्यम निबंधक यांना जुन्या तारखेने पत्र काढून २४ तासात खुलासा द्यावा असे सांगितले असल्याचे समोर आले आहे. यातच आरोपीच्या पिंजऱ्यात असलेल्या दुय्यम निबंधक यांनी खुलासा करताना दिशाभूल करणारा खुलासा करत थेट जिल्हाधिकारी यांना आव्हान दिले आहे.

पालघर जिल्ह्यात शासनाची मालकी असलेल्या वर्ग दोनच्या जमिनीचे हक्क शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय इतरांना हस्तांतर करणे बेकायदा आहे. त्यामुळे अशा जमिनीवर गहाणखत, साठेकरार, विक्री करारनामा वा अन्य कोणत्याही प्रकारचे दस्त पूर्वपरवानगी शिवाय करू नये असे पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी १० डिसेंबर २०२४ रोजी जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक यांना दिले होते. असे असताना डहाणू उपनिबंधक यांनी आसनगाव येथील सर्वे नंबर १७१,१७२ मधील शासनाच्या मालकीची असलेली सुमारे ४९ हेक्टर पैकी तीन हेक्टर मालकीच्या जमिनीचे साठेकरार व कुलमुखत्यारपत्र यांची नोंदणी डहाणू उपनिबंधक कार्यालयात १ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आली असल्याचे उघडकीस आले होते.

शासनाचा मालकी हक्क असलेल्या वर्ग दोनच्या जमीनींचे साठे करार कुलमुखत्यार मध्ये जागा खरेदी करण्याच्या प्रक्रियेत भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज कोरे व इतर राजकीय मंडळींचा समावेश होता. या विषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे तक्रार दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी १२ मार्च २०२५ रोजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्या व निवेदन मुख्यमंत्र्यांना ट्विट करून हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला होता. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तातडीने पालघर जिल्हाधिकारी यांनी दुय्यम निबंधक डहाणू -१ यांना पत्र देवून कारवाई का करण्यात येऊ नये असे लेखी देत २४ तासात खुलासा देण्याची ताकिद देण्यात आली होती.

पालघर जिल्हाधिकारी यांनी ३० जानेवारी २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीचा आधार घेत ४ मार्च २०२५ रोची ची तारीख टाकून दुय्यम निबंधक यांना खुलासा सादर करण्याचे आदेश दिले. हे पत्र दुय्यम निबंधक यांना १३ मार्च २०२५ रोजी प्राप्त झाले‌. यानुसार दुय्यम निबंधक डहाणू यांनी खुलासा सादर करताना खुलासा मध्ये म्हटलं आहे ते भारत सरकार कायदा १८८२ चे कलम ५४ मध्ये विक्री व्याख्या वेगळी असल्याने हा खुलासा स्वतः वाचविण्यासाठी केला असल्याचा समोर आले आहे. यातच १३ मार्च रोजी दुय्यम निबंधक यांनी खुलासा सादर केल्या नंतर ही १० दिवस उलटून गेले असतानाही पालघर जिल्हाधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. यामुळे या प्रकरणी संधी शोधण्याच्या प्रयत्नात असलेले पालघर जिल्हाधिकारी नेमकी काय कारवाई करणार हे पाहणेच औचित्यांचे ठरणार आहे.

◾ दुय्यम निबंधकाकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न

जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या पत्रांचा खुलासा सादर करताना दुय्यम निबंधक संतोष घाणेकर यांनी जागेचा शर्त भंग झाला नाही असा दावा करत दिशाभूल करणारी माहिती तसेच स्वतः ला व राजकीय मंडळी यांना वाचवण्यासाठी खोटा खुलासा जिल्हाधिकारी यांना सादर केला. यातच नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी चौकशी प्रकरणातील खुलासाचे पत्र हे प्रसार माध्यमांना पाठवून या प्रकरणी दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. याच बातम्या चा आधार घेत बेकायदेशीर नोंदणी केलेल्या राजकीय मंडळींचे हितचिंतक या बातम्या समाज माध्यमांवर प्रसारित केल्या जात होत्या.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
मयताच्या टाळूवरचे लोणी खाऊन जमीन घोटाळा!

मयताच्या टाळूवरचे लोणी खाऊन जमीन घोटाळा!

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

सिरमची कोरोना लस सुरक्षित, लस उत्पादनाला फटका नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सिरमची कोरोना लस सुरक्षित, लस उत्पादनाला फटका नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

January 24, 2021
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला धुडकावून दस्तऐवज नोंदणी

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला धुडकावून दस्तऐवज नोंदणी

January 28, 2025
12 वी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल

12 वी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल

February 24, 2022
पालघर जिल्ह्यात शिक्षकांच्या बेकायदेशीर नियुक्त्या!

पालघर जिल्ह्यात शिक्षकांच्या बेकायदेशीर नियुक्त्या!

May 24, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!