◾सतिश पोटे या सराईत गुन्हेगारांच्या संपर्कात बोईसरचा सुबोध संखे व महेंद्र वडे
◾ सुबोध संखे यांनी दिली होती राठोड यांच्या कार्यालयात एक कोटी २५ लाख असल्याची माहिती; बोईसरच्या अनेक लखपतींची दिली होती दरोडेखोरांना माहिती
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: शहरात काही दिवसांपूर्वी झालेल्या दरोडा प्रकरणात मोठा खुलासा समोर आला असून यामध्ये बोईसर मधील दोन स्थानिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या स्थानिक गुन्हेगारांनी कोणाच्या कार्यालयात किती रक्कम व कोणाकडे किती पैसे मिळू शकतात याबाबत माहिती सराईत गुन्हेगारांना दिली होती. धक्कादायक म्हणजे पोलिसांच्या ताब्यात असलेले आरोपी दाऊद गॅग सोबत कनेक्शन असलेले असल्याचे समोर आल्याने या प्रकरणात अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे.
बोईसर शहरातील उद्योजक राजेंद्र राठोड व सुरेंद्र राठोड यांचे ओस्तवाल येथे दोन वेगवेगळी कार्यालये आहेत. याठिकाणी शुक्रवारी ३ मार्च २०२३ रोजी बंदूकीचा धाक दाखवून पाच सराईत गुन्हेगारांनी दरोडा टाकला होता. यावेळी ४ लाख ५० हजार व सोन्याचे दागिने लुटून नेल्याचे राठोड यांच्या कडून सांगण्यात आले होते. या संपूर्ण प्रकरणात बोईसर गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपास करून आरोपींना ताब्यात घेतले होते. बोईसर पोलिसांनी ताब्यात घेतलेला जगदीश विठ्ठल सुवर्ण हा सराईत गुन्हेगार हा संतोष गोपाळ नायर च्या गॅगचे लोकं असुन हे सर्व दाऊद गॅग चे सराईत गुन्हेगार असल्याची खात्रीलायक माहिती सुत्रांकडून पालघर दर्पण ला प्राप्त झाली आहे. राठोड कार्यालय दरोड्यातील मुख्य सुत्रधार सतीश पोटे हा हिमाचल येथे फरार झाला होता. हिमाचल येथील हॉटेल मध्ये तो काम करत असल्याची माहिती बोईसर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक शरद सुळरकर व त्यांच्या टीमने हिमाचल येथे जाऊन सतीश पोटे ला ताब्यात घेतले आहे.
बोईसर पोलिसांचे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकाऱ्यांनी सतीश पोटे यांची सखोल चौकशी केल्यावर त्यांने बोईसर टेंभी येथील सुबोध संखे व महेंद्र संखे यांची नावे घेतली होती. यातील सुबोध यांने बोईसर मध्ये कोणाकडे करोडोंची संपत्ती आहे व कोणाकडे कॅश मध्ये पैसे आहेत याबाबत माहिती दिली होती. विशेष म्हणजे राजेंद्र राठोड यांच्या कार्यालयात एक कोटी २५ लाख रूपये असल्याची माहिती या सराईत गुन्हेगारांना सुबोध संखे यांने दिल्यानंतर याठिकाणी दरोडा टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. टेंभी येथे राहणारा सराईत गुन्हेगाराचा म्होरक्या महेंद्र वडे हा सन २००८ मध्ये ड्रग्स प्रकरणात एनडीपीएस ऍक्ट मध्ये तुरुंगात होता. यावेळी त्यांचा संपर्क दाऊद गॅग कनेक्शन असलेले आरोपी सतिश पोटे यांच्या गॅग सोबत आला होता. तेव्हा पासून हे संपर्कात असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी फोरचुनर गाडी एम एच १४ सीसी ६७६७ हे वाहन ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात पोलिस निरीक्षक प्रदीप कसबे यांच्या देखरेखीखाली पोलिस उपनिरीक्षक शरद सुळरकर हे अधिक तपास करत आहेत.
◾ सुबोध संखे व महेंद्र वडे यांनी बोईसर मधील अनेक उच्चभ्रू लोकांची माहिती सराईत गुन्हेगारांना पुरवली होती. कोणाकडे कुठल्या ठिकाणी पैसे ठेवले आहेत याची संपूर्ण माहिती दिली जात होती. विशेष म्हणजे या दोन महाशयांनी आपल्या समाजातील लखपती लोकांची माहिती देखील दिल्याचे तपासातून समोर आले आहे.
◾ राजेंद्र राठोड यांच्या कडे १ कोटी २५ लाख कार्यालयात आल्याचे वृत्त खरे असल्याने ही संपूर्ण माहिती सुबोध गॅग ला मिळाली होती. तसेच दरोडा पडण्याच्या दोन दिवस अगोदर राजेंद्र राठोड यांनी आपल्या कार्यालयातील १४ लाख रोकड येथून घेवून गेले असल्याचे देखील समोर आले आहे. यामुळे या प्रकरणात कार्यालयात पैसे आले ही माहिती सुबोध याला कशी समजली हा तपास लागल्यावर या प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे.
◾ सोमवारी ३ एप्रिल रोजी पोलिसांनी सुबोध संखे व महेंद्र वडे यांना ताब्यात घेतल्यावर पोलिस ठाण्यात राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यातच एका वैभव नावाच्या नेत्यांने याठिकाणी जमलेल्या लोकांन समोर वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केला होता. परंतु या नेत्यांचे काहीही चालु शकले नाही. बोईसर पोलिसांनी या गंभीर प्रकरणात आरोपींना रात्रीच्या वेळी तपासाअंती अटक केली.
◾राठोड कार्यालयातून हातात काही आलेच नाही?
राठोड यांच्या कार्यालयात टाकलेल्या दरोड्यात काहीही हाती घेतले नसल्याचा दावा आरोपींनी बोईसर पोलिसांन समोर केला आहे. याठिकाणी एक कोटी २५ लाखाची रोकड असल्याची माहिती सुबोध यांने दिली म्हणून याठिकाणी दरोडा टाकला असल्याची माहिती चौकशी दरम्यान ताब्यात घेतलेल्या सर्व आरोपींनी केली असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. यामुळे हा नेमका प्रकार काय याबाबत अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत.