Monday, May 25, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

पालघर दर्पण by पालघर दर्पण
February 5, 2026
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
0
SHARES
293
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

पहाड सिंगच्या कारखान्यातून रात्रीच्या वेळी घातक ऍसिड थेट शेतजमिनीत फेकले जात असल्याचे गंभीर आरोप

पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्र पुन्हा एकदा भीषण रासायनिक प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विराज प्रोफाईल कंपनीसाठी करण्यात येणाऱ्या एस.एस. कॉइल पिकलींगच्या नावाखाली हजारो लिटर विषारी रासायनिक सांडपाणी बेकायदेशीररित्या विल्हेवाट लावले जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील विराज प्रोफाईल कंपनीकडून दररोज सुमारे २० ते २५ टन एस.एस. कॉइल पिकलींगसाठी बाहेर पाठवण्यात येतात. या कॉइल स्वच्छ करण्यासाठी दररोज सुमारे ५ हजार लिटर हायड्रोक्लोरिक ऍसिड (HCL) वापरले जाते. पिकलींग प्रक्रियेनंतर तयार होणारे ऍसिडयुक्त सांडपाणी अंदाजे ५० ते ६० हजार लिटर पाण्यात मिसळले जाते. मात्र या सांडपाण्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याऐवजी ते थेट पर्यावरणात सोडले जात असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.

औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक जे- ६६, १०४ व १०५ येथील “पहाड सिंग” यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या मे. धनलक्ष्मी स्टील अँड इंजीनियरिंग कंपनी या कारखान्यात हा बेकायदेशीर उद्योग सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या कारखान्याकडे सांडपाणी प्रक्रिया केंद्राची (ETP) कोणतीही अधिकृत यंत्रणा नसतानाही, मोठ्या प्रमाणावर रासायनिक प्रक्रिया केली जात आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे, वापरलेले घातक ऍसिड आणि रासायनिक सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता रात्रीच्या अंधारात उघड्या नाल्यांमध्ये, मोकळ्या जागांवर आणि थेट शेतजमिनीत फेकले जात असल्याचे वारंवार आढळून आले आहे. यासाठी स्थानिक युवकांचा वापर करून टँकरद्वारे सांडपाणी वाहून नेले जात असल्याचाही आरोप होत आहे.

विषारी पाण्यामुळे परिसरातील शेतजमिनीची सुपीकता नष्ट होत असून भूजल मोठ्या प्रमाणावर दूषित होत आहे. याचा थेट परिणाम स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर आणि शेती व्यवसायावर होत असतानाही प्रशासन मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. हा सर्व प्रकार राजकीय वरदहस्तामुळेच खुलेआम सुरू असल्याचा गंभीर आरोप नागरिक करत आहेत. विराज प्रोफाईल कंपनीकडून या बेकायदेशीर कामाला अप्रत्यक्ष पाठबळ दिले जात असल्याचेही बोलले जात आहे. मात्र संपूर्ण व्यवहाराबाबत कोणत्याही शासकीय विभागाकडे अधिकृत नोंद उपलब्ध नसल्याचे वास्तव समोर येत आहे. किती जॉबवर्क झाले, किती ऍसिड वापरले गेले, किती सांडपाणी तयार झाले आणि त्याची विल्हेवाट कशी लावली गेली, याबाबत कोणताही हिशेब ठेवला जात नसल्याचे उघड झाले आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या गंभीर प्रकरणात केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा संताप स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. तारापूरसारख्या संवेदनशील औद्योगिक क्षेत्रात इतका मोठा पर्यावरणविरोधी प्रकार सुरू असतानाही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यपद्धतीवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी आणि पर्यावरणप्रेमींनी केली आहे. संबंधित कारखान्याची सर्व कागदपत्रे, ऍसिड खरेदी-वापराचा हिशेब आणि सांडपाणी विल्हेवाटीची पद्धत यांची स्वतंत्र तपासणी करण्याची मागणी जोरधरू लागली आहे.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?
जिल्हा

“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?

March 20, 2026
Next Post
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

कोविडमुळे अनाथ बालकांना अर्थसहाय्य

कोविडमुळे अनाथ बालकांना अर्थसहाय्य

June 2, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोकण विभागातील जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोकण विभागातील जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

May 3, 2021
पास्थळ मध्ये अनधिकृत बांधकामात तेजीत!

पास्थळ मध्ये अनधिकृत बांधकामात तेजीत!

January 30, 2022
मुंबई कफपरेड ते झाई पर्यंत किनारपट्टी कडकडीत बंद

मुंबई कफपरेड ते झाई पर्यंत किनारपट्टी कडकडीत बंद

April 13, 2026

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!