Monday, May 25, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

पालघर दर्पण by पालघर दर्पण
February 9, 2026
in जिल्हा, राज्य
0
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
0
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

ग्रामविकास अधिकारी गैरहजर असताना साधला डाव; राज्यातील सर्वात मोठा घरपट्टी घोटाळा

आदिवासी नोटरी जागेवर घरपट्टी लावण्यासाठी रचली मोठी खेळी

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील

पालघर: घोटाळेबाज हा शब्द देखील कमी पडेल अशी धक्कादायक घटना बोईसर ग्रामपंचायत मध्ये घडली आहे. राज्यातील सर्वात मोठा घरपट्टी घोटाळा येथील सर्वांनी मिळून केल्याचे उघडकीस आले असून कोट्यवधी रुपये बेकायदेशीर पणे सर्वसामान्य नागरिकांन कडून लुट केल्याचा प्रकार समोर आला आहे. सत्ताधारी पक्षाच्या काही सदस्यांनी यावर आक्षेप घेतल्याने हा कोट्यवधींचा घरपट्टी घोटाळा उघडकीस आला आहे.

बोईसर ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात आदिवासी खातेदारांच्या जागा असून अनेक जागा कवडीमोल भावाने बेकायदेशीर नोटरी करून विक्री केल्या आहेत. आदिवासी जागेवर मोठ्या प्रमाणात परप्रांतीय वस्ती उभी राहिली असून साधारण २० हजार घरे येत्या दोन तिन वर्षांत भुमाफियांनी उभारून त्यांची बेकायदेशीर विक्री केली आहे. गेल्या ५ वर्षांपासून आदिवासी जागा नोटरी करून विक्री केलेल्या ठिकाणी उभारलेली घरांना कायद्यानुसार कोणत्याही प्रकारची घरपट्टी आकारणी केली जात नव्हती. ग्रामविकास अधिकारी यांनी अनेकदा याबाबत वरिष्ठांचा अभिप्राय मागवला होता. मात्र बेकायदेशीर घरपट्टी लावण्यासाठी ग्रामविकास अधिकारी नकार देत असल्याने सत्ताधारी यांनी एक खेळी रचली या खेळीत ग्रामविकास अधिकारी सुट्टीवर असताना मासिक सभा घेत आदिवासी जागेची विक्री झालेल्या ठिकाणी उभारलेल्या घरांना घरपट्टी लावण्याचा बेकायदेशीर ठराव मंजूर करण्यात आला.

घरपट्टी घोटाळा करण्यासाठी सत्ताधारी यांनी ग्रामविकास अधिकारी कमलेश संखे हे २८ जुलै २०२५ ते ३० जुलै २०२५ या काळात रजेवर गेले असताना ३० जुलै २०२५ रोजी झालेल्या मासिक सभेत आदिवासी नोटरी जागेवर उभारलेल्या चाळी बांधकामावर नवीन घरपट्ट्या लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यावेळी ग्रामविकास अधिकारी अनुपस्थित असताना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात सचिवपद देऊन हा निर्णय राबवण्यात आला, जो पूर्णतः नियमबाह्य असल्याचे सदस्यांनी केलेल्या तक्रारीत सांगण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे आदिवासी नोटरी, वनविभाग , सरकारी जागेवर घरपट्टी लावताना त्याठिकाणी खरोखरच घर आहे का याची पाहणी देखील करण्यात आलेली नाही. महत्वाचे म्हणजे अचानकपणे हजारो घरपट्ट्यांची नोंद आवक–जावक रजिस्टरमध्ये करण्यात आली. याचा अर्थ अगोदर पासून सत्ताधारी यांनी आपल्या दलालांन मार्फत घरपट्टी लावण्याचे अर्ज जमा करून नंतर आपसात संगनमत करून मासिक सभेत ठराव घेतल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

बोईसर ग्रामपंचायत हद्दीतील गणेश नगर, काटकर पाडा, दांडी पाडा, सुतार पाडा, धनानी नगर याभागात मोठ्या प्रमाणात अवैध चाळीचे बांधकाम करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीने बेकायदेशीर लावलेल्या घरपट्ट्याचा याच भागाचा समावेश असून विशेष काम करणारी टिम ग्रामपंचायत मध्ये बनविण्यात आली आहे. बेकायदेशीर घरपट्टी लावताना अर्ज जमा करताना दलालांन मार्फत हे अर्ज घेतले जातात प्रत्येक अर्जासोबत विस हजार रुपये घेऊन कुठल्याही प्रकारची रक्कमेचा उल्लेख नसणारी लाल पावती दिली जाते. या घरपट्टी मधून साधारण ३ कोटी ५० लाख रूपयांचा मलिदा जमा करून तो वाटप देखील झाल्याचे एका सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पालघर दर्पण सोबत बोलताना सांगितले. बेकायदेशीर घरपट्टी लावण्याचा ठराव मंजूर केला असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ग्रामविकास अधिकारी यांनी याबाबत वरिष्ठांना लेखी तक्रार दिली आहे. परंतु अनेक महिने उलटून गेले असले तरी कोणत्याही प्रकारची कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही.

◼️ कसा केला घोटाळा!

ग्रामपंचायत मधील काही कर्मचारी यांची टिम बनवून अर्ज देण्यापासून ते घरपट्टी नोंद करण्यापर्यंत एक टिम बनवण्यात आली आहे. सुरूवातीला अर्ज जमा करताना तो खास दलाला मार्फत घेतला जातो. पैशाची पुर्तता झाल्यावर अर्ज लिपीका कडे जमा होतो. त्यानंतर त्यांची आवक जावक नोंद करून मुख्य संगणकावर त्याची माहिती भरली जाते व घरपट्टी दिली जाते.

◼️ आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशीची गरज

बोईसर ग्रामपंचायत मधील काही कर्मचारी लखपती असून काही सत्ताधारी सदस्य देखील कोट्याधीश झालेले आहेत. सत्ताधारी विरोधक एकत्र येऊन हा राज्यातील सर्वांत मोठ्या घरपट्टी घोटाळा मार्गी लावण्यासाठी मोठा डाव रचण्यात आला होता. या सर्व बाबींची गंभीर दखल प्रशासनाने घेऊन या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशीची गरज आहे. यातच येथील कर्मचारी व घोटाळ्यात सहभागी असलेल्या सदस्यांच्या मालमत्तेची चौकशी केल्यास कोट्यवधी रुपयांचे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे.

◼️ मी सुट्टीवर असताना ग्रामपंचायत मासिक सभेत घरपट्टी लावण्याचा चुकिचा ठरावा घेतल्याचे निदर्शनास आले. याबाबत गटविकास अधिकारी पंचायत समिती पालघर यांना लेखी कळविण्यात आले आहे.

— कमलेश संखे, ग्रामविकास अधिकारी बोईसर ग्रामपंचायत

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?
जिल्हा

“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?

March 20, 2026
Next Post
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

झाड कोसळल्याने अंगणवाडी जमिनदोस्त

झाड कोसळल्याने अंगणवाडी जमिनदोस्त

May 5, 2026
खडसे यांच्या पक्षांतराची पुन्हा एकदा चर्चा.

खडसे यांच्या पक्षांतराची पुन्हा एकदा चर्चा.

October 20, 2020
महसूल विभागाच्या आर्शीवादाने उभारलेल्या बांधकामावर पडणार हातोडा

महसूल विभागाच्या आर्शीवादाने उभारलेल्या बांधकामावर पडणार हातोडा

April 13, 2026
पालघर-ठाणे-मुंबई येथे रेड अलर्ट.

पालघर-ठाणे-मुंबई येथे रेड अलर्ट.

October 15, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!