◾️उपनगराध्यक्ष पदी महेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड
पालघर दर्पण : वार्ताहर
विक्रमगड : विक्रमगड नगरपंचायतीवर जिजाऊ संघटना पुरस्कृत विक्रमगड आघाडीने वर्चस्व मिळवले होते. त्यातच नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाच्या झालेल्या सोडतीत विक्रमगड नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण (खुले) निघाले होते. त्यामुळे मागील वेळी उपनगराध्यक्ष राहिलेले निलेश पडवळे यांचा नगराध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज आला होता. त्यांची नगराध्यक्षपदासाठी फक्त औपचारिकता बाकी राहिली होती. २३ फेब्रुवारी ला वाडा उपविभागीय अधिकारी यांनी भागवनजी आगे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या पहिल्या विशेष सभेत निलेश पडवळे यांची नगराध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली लागली.
त्याच बरोबर विक्रमगड उपनगराध्यक्षपद कोणाला मिळेल हे शेवटच्या दिवसापर्यंत गुलदस्त्यात ठेवण्यात आले होते. याबाबत अनेक तर्क- वितर्क लढविण्यात येत होते. मात्र जिजाऊ संघटनेचे खंदे समर्थक महेंद्र पाटील यांचा आज सकाळी एकमेव अर्ज आल्यानंतर त्यांची देखील बिनविरोध उपनगराध्यक्ष पदी निवड करण्यात करण्यात आली.
विक्रमगड नगरपंचायतीवर सामाजिक कार्यकर्ते निलेश सांबरे यांच्या जिजाऊ पुरस्कृत विक्रमगड विकास आघाडीने 17 पैकी 16 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली होती. त्यातच शिवससनेच्या एकमेव असलेल्या नागरसेविकेने देखील विक्रमगड विकास आघाडीला पाठिंबा दिल्यामुळे विक्रमगड नागरपंचायतीवर कोणताही विरोधी पक्ष राहिला नाही मागील वेळी देखील विक्रमगड विकास आघाडीची विक्रमगड नगरपंचायतीवर सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे शहरात रस्त्यांची, गटारींची कामे चांगल्या प्रकारे करण्यात आली आहेत. आत्ता विक्रमगड नगरपंचायत ही महाराष्ट्रामधील एक आदर्श नगरपंचायत बनविणार असल्याची प्रतिक्रिया या वेळी नागराध्यक्ष पदी निवड झालेल्या निलेश पडवळे यांनी दिली.