◾️बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांने केलेल्या आक्षेपार्ह भाषणात तरूणांने केला विरोध?
◾️ “अपना एक मारेंगे तो हम सौ मारेंगे” अशा प्रकारे सुरू होती भाषण बाजी; भर शहरात गर्दीच्या ठिकाणी बोईसर पोलिसांनी दिलेली कार्यक्रमाला परवानगी
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: शहरात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या सुरू असलेल्या भर कार्यक्रमात आक्षेप घेत मंचावर गेलेल्या तरूणाला बजरंग दलाच्या कार्यकर्तांनी चोप देत मारहाण केली आहे. बोईसर शहरात मुख्य गर्दीच्या ठिकाणी बोईसर पोलिसांनी दिलेले परवानगी व त्याठिकाणी झालेल्या मारहाणीच्या प्रकारामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यातच बंदोबस्त मध्ये असलेल्या पोलिसांनी लागलीच खबरदारी घेत तरूणाला मारहाण करणाऱ्या कार्यकर्तांवर लाठीचार्ज करत परिस्थिती नियंत्रणात आणली होती.

कर्नाटक मध्ये बजरंग दलाच्या कार्यकत्यांची झालेल्या हत्येच्या निषेधार्ह बजरंग दलाकडून 25 फेब्रुवारी रोजी निदर्शने कार्यक्रम आयोजित केला होता. बोईसर शहरात पिंक सिटी ओस्तवाल एम्पायर याठिकाणी सायंकाळी 4 वाजता पासून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या अनेक नेत्यांनी प्रश्रोभक भाषणे देखील यावेळी केली. बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांने आपल्या भाषणात “अपना एक मारेंगे तो हम सौ मारेंगे” अशा प्रकारे सुरू असलेल्या आक्षेपार्ह भाषणात अभिनय चौधरी या मंचावर जावून आपले मत व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र याठिकाणी उपस्थित असलेल्या कार्यकर्तांनी त्याला बाजूला खेचत धक्काबुक्की करून बेदम मारहाण केली. यावेळी बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी प्रसावधान दाखवत लागलीच घटनास्थळी धाव घेत तरूणाला मारहाण करणाऱ्या कार्यकर्तांना बाजूला करत लाठीचार्ज देखील केला यावेळी लागली परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.
विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांन कडून तरूणांना समोर भडकावु भाषणे होत असल्याने तणावाचे वातावरण निर्माण होते. यातच अभिनय हा तरूण आक्षेपार्ह सुरू असलेल्या भाषणाला विरोध करण्यासाठी मंचावर गेला होता, की याच भडकावु भाषणाच्या आहारी येवून आपले मत व्यक्त करण्यासाठी मंचावर गेला होता हे स्पष्ट होऊ शकले नाही. यातच हा तरूण इतर धर्माचा असल्याचा संशय आल्याने त्याला मारहाण झाल्याची चर्चा बोईसर मध्ये कार्यक्रमात उपस्थित असलेल्या काही लोकांन कडून केली जात होती. यातच मारहाण झालेल्या तरूणाला रात्री उशिरा पर्यंत बोईसर पोलिस ठाण्यात चौकशी साठी थांबवून ठेवण्यात आले होते. महत्त्वाचे म्हणजे भडकावु भाष करून तणावाचे वातावरण निर्माण करणाऱ्या आयोजकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.

◾️ विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या सुरू असलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी बोईसरचे पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांना मंचावर बोलावून संघटनेने कर्नाटक मध्ये झालेल्या कार्यकर्त्याच्या हत्ये बाबत निषेधार्थ पत्र दिले. मुळात अशा गर्दीच्या ठिकाणी काहीही अनुचित प्रकार घडला असता तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असती. असे असताना देखील गर्दीच्या ठिकाणी कार्यक्रमाला परवानगी देणाऱ्या सुरेश कदमांनी नेहमी प्रमाणे कर्तव्यात कसुर केली आहे का असा सवाल उपस्थित राहत आहे.
◾️आयोजकांनी कार्यक्रमाची परवानगी घेतली होती. याठिकाणी तरूणाला झालेली मारहाण ही गैरसमजातून झाली होती. चौकशी करून तरूणाला सोडून देण्यात आले आहे.
— के. हेगाजे, उपविभागीय अधिकारी बोईसर