Thursday, July 9, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

रासायनिक घातक रसायन वाहतूक करणारा ट्रक ताब्यात

पालघर दर्पण by पालघर दर्पण
May 5, 2026
in जिल्हा, ताज्या बातम्या, राज्य
0
रासायनिक घातक रसायन वाहतूक करणारा ट्रक ताब्यात
12
SHARES
199
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin
  • औद्योगिक क्षेत्रातील बजाज हेल्थ केअरने हस्तांतरित केलेल्या कारखान्यातुन घातक रसायन वाहतूक करणारा ट्रक पोलिसांच्या ताब्यात; पालघर कंट्रोल रूमला तक्रार दाखल केल्यानंतर मनोर पोलिसांनी केली कारवाई

पालघर दर्पण: प्रतिनिधी

बोईसर: तारापुर औद्योगिक क्षेत्रातील आठ दिवसापूर्वी बंद करण्यात आलेल्या रासायनिक कारखान्यातुन घातक रसायन वाहतूक करणाऱ्या ट्रक ला मनोर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी ताब्यात घेतले आहे. औद्योगिक क्षेत्रातुन घातक रसायन घेवुन जात असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली असुन बेकायदेशीर पणे घातक रसायन वाहतुकीचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला असून अशा प्रदुषणकारी कारखान्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

औद्योगिक क्षेत्रातील प्लाँट नंबर टी- 30 या न्युट्रा प्लस व आता बजाज हेल्थ केअर कारखान्यांने हस्तांतरित केलेल्या कारखान्यातुन घातक रसायन विल्हेवाट लावण्यासाठी घेवुन जाणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी यांना वाहना बाबत माहिती दिली असता त्यांनी त्याकडे प्रथमदर्शनी दुर्लक्ष केल्याचे दिसून आले होते. परंतु प्रकरण अधिकच गंभीर असल्याने पालघर पोलीस अधीक्षक यांना संपर्क साधुन बेकायदेशीर पणे घातक रसायन घेवुन चाललेल्या वाहनांवर कारवाई करण्याबाबत तक्रार देण्यात आली होती. मात्र केमिकल घेवुन जाणारे वाहन बोईसर बेटेगाव चौकी वरून पुढे गेले असताना देखील बेटेगाव येथील तपासणी नाक्यावर साधे वाहन तपासणी साठी देखील थांबविण्यात आले नाही.

घातक रसायन घेवुन जाणाऱ्या ट्रक ची माहिती मंगळवारी सायंकाळी पालघर कंट्रोल रूमला दिल्यानंतर मनोर पोलिसांनी रसायन ड्रम भरलेले वाहन चिल्लार फाटा येथे ताब्यात घेतले. यानंतर रसायन भरलेला ट्रक मनोर पोलीस ठाण्यात आणण्यात आला असुन महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी देखील पंचनामा करण्यासाठी त्याठिकाणी दाखल झाले. औद्योगिक क्षेत्रातुन टी-30 या कारखान्यातुन निघालेला ट्रक MH 04, JU 4919 या वाहन चालका कडे जी. आर एन्टरप्रायजेस अवधनगर बोईसर येथून रसायन ड्रम घेतल्याचे बनावट बिल असल्याचे उघड झाले आहे. यातच या ट्रक मध्ये सुमारे 33 ते 35 हे 200 लिटरचे ड्रम असल्याचे दिसून आले आहे. यामुळे घातक रसायन प्रकरणी नोटीस बजावलेल्या कारखान्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी जोरधरू लागली आहे.

◾ तारापुर औद्योगिक क्षेत्रातील प्लाँट नं. टी- 30 हा कारखाना बजाज हेल्थ केअर या उद्योगाने हस्तांतरित केला आहे. कारखान्याला आठ दिवसापूर्वी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने उत्पादन बंद करण्याचे आदेश देत कारखाना बंद केला होता. याठिकाणी 120 ड्रम घातक रसायन बेकायदेशीर पणे भरून ठेवले असल्याचे बजावलेल्या नोटीसीत म्हटले होते. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईतुन वाचण्यासाठी बेकायदेशीर पणे घातक रसायन ची वाहतूक केली जात होती. मात्र पोलिसांनी केलेल्या कारवाई मध्ये कारखान्याचा हा प्रकार समोर आला आहे. यातच याअगोदर देखील अशा प्रकारे घातक रसायन वाहतूक केली असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
गावकऱ्यांनीच उभारला लाकडी पुल

गावकऱ्यांनीच उभारला लाकडी पुल

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

प्रदूषणकारी कारखान्यांन कडून रसायनाची विल्हेवाट लावणे सुरूच

प्रदूषणकारी कारखान्यांन कडून रसायनाची विल्हेवाट लावणे सुरूच

August 16, 2020
रेमडेेसिवीरच्या उपलब्धतेबाबत अन्न व औषधमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली माहिती

रेमडेेसिवीरच्या उपलब्धतेबाबत अन्न व औषधमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली माहिती

April 30, 2021
खडसे पक्षांतर करण्याच्या विचारात?

खडसे पक्षांतर करण्याच्या विचारात?

October 15, 2020
साखर कारखान्यात विलीनिकरण करण्यास तत्वत: मान्यता

साखर कारखान्यात विलीनिकरण करण्यास तत्वत: मान्यता

March 17, 2021

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.