Monday, July 13, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

ड्रग्स माफिया निल्या मोकाट

पालघर दर्पण by पालघर दर्पण
April 13, 2026
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
ड्रग्स माफिया निल्या मोकाट
0
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾️बोईसर शहरात अमली पदार्थ विकणाऱ्या कडे पोलिसांचा कानाडोळा

पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

बोईसर: शहरात अमली पदार्थ विक्री मोठ्या प्रमाणात होत असताना देखील बोईसर पोलिसांना याकडे पाहण्यासाठी वेळच मिळालेला नाही. स्थानिक गुन्हे शाखा असो किंवा बोईसरचे पोलिस यांना सर्वांना माहीत असलेल्या एका माफियांवर दुर्लक्ष का केले जाते हा सवाल उपस्थित राहत आहे. यामुळेच बोईसरची तरूणाई नशेच्या आहारी जात ड्रग्स च्या नशेत उडत असल्याने गुन्हेगारी देखील वाढत चालली असून यावर कारवाई कोण करणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे ड्रग्स माफियांना मोकळे रान मिळाले आहे.

बोईसरच्या काटकर पाडा येथील भवानी चौकाच्या बाजूला असलेल्या एका चाळीच्या खोलीतून सुरू झालेला गांजा विक्रिचा गोरखधंदा आता ड्रग्स पर्यंत पोचला आहे. या ठिकाणी असलेली रेल्वेची भिंत आणि त्याठिकाणी लपवून ठेवले जाणारे अमली पदार्थ मोठ्या प्रमाणात रोजच विक्री केली जात असल्याची माहिती खात्रीशीर सुत्रांकडून समोर आली आहे. महत्त्वाचे म्हणजे हा संपूर्ण कारोबार चालवणारा निल्या नावाचा म्हणजेच निलेश सुर्वे याला राजकीय पाठबळ देखील आहे. याबाबत काही अधिक तपशील पालघर दर्पण आपल्या समोर आणत असून यामध्ये अधिक माहिती अशी की, बोईसर काटकर पाडा भवानी चौक येथे निल्या नावाचा इसम अमली पदार्थ विक्री करत असून त्याच्या सोबत काही महिला देखील या कामात सहभागी असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे बोईसर युनिटला देण्यात आली होती. तसेच काही महिन्यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटच्या कर्मचाऱ्यांनी याठिकाणी धाड टाकल्याची माहिती समोर आल्यावर याबाबत पोलिस उपनिरीक्षक आशिष पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी याठिकाणी काहीही सापडले नसल्याचे प्रत्यक्षात भेटी दरम्यान सांगितले होते. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटने अधिक तपास नेमका काय केला याबाबत अद्यापही उलघडा होऊ शकलेला नाही.

अमली पदार्थ विक्री करणारा निल्या या टोपन नावाने नशा करणारे युवक त्याला ओळखता असून काही मुलींचा देखील या कामामध्ये सहभाग आहे. खात्रीशीर सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई हुन चार ते पाच मुली निलेश सुर्वेच्या भवानी चौक येथील रूममध्ये येत असल्याची माहिती समोर येत आहे. अतिशय हुशारकीने हा ड्रग्स चा गोरखधंदा चालवला जात असून यामध्ये मोठे रँकेट सहभागी असल्याचे बोलले जात आहे. नशा करणारे ड्रग्स ची मागणी करताना “लंगडी घोडी” या शब्दाचा वापर करतात. यानंतर लहान पुडीत असलेले अमली पदार्थ नशा करणाऱ्यांना दिले जाते. निलेश सुर्वे कडे एक पिस्तूल असल्याचे देखील समोर आले असून याबाबत छायाचित्र देखील उपलब्ध झाले आहे. एकदा नशेत असताना या सुर्वेने पिस्तूल बाहेर काढून फोटो सेशन केले असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे असल्या गुन्हेगारी इसमावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांन कडून होत असली तरी पोलिसांनी या प्रकाराकडे गंभीरपणे पाहिलेले दिसत नसल्याने निलेश सुर्वे हा गुन्हेगार मोकाट आहे.

◾️अमली पदार्थांचे सेवन करून एकाची हत्या

बोईसरमध्ये अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या तरूणाने रस्त्यावरून चालत असलेल्या नागरिकांवर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना काही दिवसापूर्वी घडली होती. या हल्ल्यात राणी-शिगाव मधील रहिवाशी असलेल्या एकाचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर आक्रमक झालेल्या गावकऱ्यांनी ड्रग्स माफियांवर कारवाई करावी यासाठी बोईसर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला होता. यावेळी बोईसरचे उपविभागीय पोलिस अधिकारी के. एस. हेगाजे यांनी याबाबत कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले होते.

◾️ड्रग्स माफियांचे एक लाखाचे सुर्वे चषक

सरावली ग्रामपंचायत हद्दीत शिवसेनेचे फलक लावून एक लाखाचे पारितोषिक जाहीर करून सुर्वे चषक भरवण्यात आले होते. याठिकाणी सरावली सरपंच, उपसरपंच अशोक साळुंखे व शिवसेना लोकसभा समन्वयक प्रभाकर राऊळ यांचे फोटो या फलकावर असल्याने एकच खळबळ माजली आहे. निलेश सुर्वे करत असलेल्या अमली पदार्थ विक्री बाबत व त्यांने शिवसेनेच्या नेत्यांच्या सहकार्याने सुरू केलेल्या नाईट क्रिकेट सामन्यांचे वृत्त समोर आल्यानंतर शिवसेना नेत्यांनी सावरा सावर करत आम्हाला न सांगता आमचे फोटो लावल्याचे स्पष्टीकरण काही समाज माध्यमातून दिले आहे.

◾️सुर्वेचे आर्थिक व्यवहार चालतात दुसऱ्याच्या नावाने

अमली पदार्थ विक्री मधुन येणारे लाखो रूपये व त्याचे मोठे अर्थकारण हे इतर लोकांच्या बँक खात्यातून करत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. विशेष म्हणजे निलेश सुर्वे वापत असलेली सुझुकी कार ही मुकेश राँय नावाच्या व्यक्तीच्या नावाने रजिस्टर आहे. अनेक फोटो मध्ये या कारचे फोटो असून आता या गोरखधद्यात नेमकी कोण माया व कोण राँय याचा शोध बोईसर पोलिसांनी घेणे गरजेचे आहे. तसेच अशा अमली पदार्थाचे माफिया राज चालवणाऱ्या इसमाच्या संपर्कात राजकीय असो किंवा पोलिस या सर्वांचे भ्रमणध्वनी संपर्क गेल्या अनेक वर्षांचे तपासणी केल्यास बोईसर मधील मोठे घबाड बाहेर येण्याची शकता आहे.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
मुजोर विराज उद्योजका विरोधात कामगार आक्रमक

मुजोर विराज उद्योजका विरोधात कामगार आक्रमक

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

पालघर शहरात मुंबईतून कोरोना!

संशयित रुग्णांनी चाचणी करून घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

August 25, 2020
अखेर बोईसर झाले शांत..

अखेर बोईसर झाले शांत..

May 5, 2026
महसूल विभागाच्या आर्शीवादाने उभारलेल्या बांधकामावर पडणार हातोडा

महसूल विभागाच्या आर्शीवादाने उभारलेल्या बांधकामावर पडणार हातोडा

April 13, 2026
उद्यापासून राज्यात कठोर निर्बंध

उद्यापासून राज्यात कठोर निर्बंध

April 4, 2021

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.