Tuesday, May 26, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

75 लाखाची नळपाणी योजनेनंतर देखील वेहेलपाडा तहानलेलाच

पालघर दर्पण by पालघर दर्पण
February 11, 2021
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
75 लाखाची नळपाणी योजनेनंतर देखील वेहेलपाडा तहानलेलाच
0
SHARES
114
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी

पालघर: विक्रमगड तालुक्‍यातील सुमारे अडीच हजार लोकवस्तीच्या वेहेलपाडा गावासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत सुमारे 75 लाख रुपये खर्च करून पेयजल योजना राबवण्यात आली. मात्र गेल्या दोन वर्षापासून या योजने मधून ग्रामस्थांना एकही थेंब पाणी मिळाले नसल्याने एप्रिल ते जून महिन्यात गावातील नागरिक टँकरद्वारे पाणीपुरवठा वर अवलंबून आहेत. संबंधित ठेकेदाराविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून या गावांमध्ये चार नवीन विंधन विहिरी प्रस्तावित केल्या आहेत.

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

विक्रमगड पासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या वेहेलपाडा पाटीलपाडा नळ पाणीपुरवठा योजना करण्यासाठी सन 2013-14 मधील आर्थिक तरतुदींमधून 73.49 लक्ष रुपये किमतीत योजना प्रस्तावित करण्यात आली. या योजने अंतर्गत नवीन विहीर, पंपगृह, पंपिंग यंत्र सामुग्री, उर्धव वहिनी, उंच साठवणूक टाकी, वितरण वाहिनी, शुद्धीकरण व्यवस्था तसेच महाराष्ट्र विद्युत महामंडळाचे जोडणी करणे अपेक्षित होते. या कामासाठी 2015 मध्ये संबंधित ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आले व 24 महिन्यात योजना पूर्ण करणे अपेक्षित होते. योजना सन 2018 मध्ये पूर्ण झाली असली तरीही या योजनेतील लाभार्थी असणाऱ्या पाच ते सहा पाड्यातील ग्रामस्थांना पाणी पुरवठा होत नसल्याचे येथील नागरिकांनी तालुका प्रशासनाच्या कडे तक्रारी केल्या आहेत.

विशेष म्हणजे ही योजना कार्यान्वित झाल्याचे कागदोपत्री दिसत असले तरी विक्रमगड तालुक्याचा दरवर्षी तयार करण्यात येणाऱ्या संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा मध्ये या योजनेतील काही पाड्यांचा समावेश केला जात आहे. त्यामुळे ७५ लाख रुपये खर्च करून हे गाव पाणी टंचाई भागात येत असून पेयजल योजना प्रत्यक्षात कार्यरत नसल्याचे स्पष्ट होते. त्याचबरोबरीने वेहेलपाडा येथील काचपाडा, आळीव पाडा, कलमपाडा व तळ्याचापाडा या पेयजल योजनेअंतर्गत पाड्यांवर नवीन विंधन विहीर उभारण्यासाठी प्रत्येकी ६८ हजार रुपयांची तरतूद आराखड्यात प्रस्तावित करण्यात आली आहे. या या योजने संदर्भात पाणी पुरवठा विभागामार्फत चौकशी सुरु करण्यात आली आहे.

◾बंद योजनेसाठी दुरुस्ती खर्च

या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना कार्यान्वित होऊ शकली नसली तरीही या योजनेमध्ये टाकलेले जलवाहिन्या चोरीस गेल्याने व दुरुस्तीचे कारण पुढे करून या योजनेवर दहा लाख रुपयांचा अतिरिक्त खर्च करण्यात आला असे सांगण्यात येत.

◾विक्रमगड तालुक्यातील वेहेलपाडा येथे 75 लक्ष किमतीची राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत योजना राबविण्यात आली. असे असताना सन 2020- 21 च्या संभाव्य पाणी टंचाई कृती आराखड्यात वेहेलपाडतील पाच पाड्यांमध्ये पाणी टचाई असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ही योजना पूर्ण झाली नसली तरी ठेकेदाराला संपूर्ण पैसे अदा करण्यात आले आहेत. या संबंधात संबंधितांविरुद्ध कारवाई होणे आवश्यक आहे.

  • परेश रोडगे, युवा प्रहार ग्रुप विक्रमगड
आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
वाडा तालुक्यातील पोलीस दुरक्षेत्रांना कुलूप

वाडा तालुक्यातील पोलीस दुरक्षेत्रांना कुलूप

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

डहाणूत कोरोनाचा शिरकाव; तीन वर्षीय मुलीला संसर्ग

डहाणूत कोरोनाचा शिरकाव; तीन वर्षीय मुलीला संसर्ग

May 24, 2020
ड्रग्स माफिया निलेश सुर्वेला सोमवार पर्यंत पोलिस कोठडी

ड्रग्स माफिया निलेश सुर्वेला सोमवार पर्यंत पोलिस कोठडी

April 16, 2022
३७ तासात तिन्ही मुलींचा शोध

३७ तासात तिन्ही मुलींचा शोध

November 30, 2020
पाच दिवस उलटून देखील बोईसर अंधारात

पाच दिवस उलटून देखील बोईसर अंधारात

May 20, 2021

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.