Thursday, April 9, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

बोईसरमध्ये महिला असुरक्षित

पालघर दर्पण by पालघर दर्पण
May 1, 2022
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
बोईसरमध्ये महिला असुरक्षित
0
SHARES
563
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾️अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या घटनेमध्ये वाढ

◾️शहराच्या नाक्या नाक्यावर उभे असलेले रोड रोमियो करतात नजरेने अत्याचार

हे पण वाचा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील

बोईसर: शहरात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या असून रोडरोमिओंच्या दहशती मुळे महिलांना घराबाहेर पडणे मुश्कीलीचे झाले आहे. मागणी तीन दिवसात बोईसर पोलिस ठाणे हद्दीत दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. यातच शहरात पोलिसांचा धाक उरला नसल्याने गुन्हेगारीकरण वाढलेल्या बोईसर शहरात महिला असुरक्षित असल्याने महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अमली पदार्थ विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या बोईसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आता महिला देखील असुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. यातच शहरात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटनेमध्ये वाढ झाली असुन पालक वर्ग चिंतेत आहेत. काही दिवसापूर्वी सालवड शिवाजी नगर येथील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिग अत्याचाराची घटना घडली होती तर धोडीपूजा येथील एका लहान मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह नाल्यात फेकण्यात आला होता. तारापूर औद्योगिक वसाहतीमुळे बोईसर आणि परीसरात लाखो कामगार राहत असून यामध्ये परप्रांतीय कामगारांची संख्या लक्षणीय असल्याने बोईसर भागात गुन्हेगारीकरण झपाट्याने वाढत चालले आहे. बोईसर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका नवीन वस्तीत राहणाऱ्या पाच वर्षीय चिमुरडीवर एका २४ वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी आहे. अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण बोईसर भागात खळबळ उडाली होती. बलात्कार करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी ही विकृती संपुष्टात आलेली नाही.

बोईसर पोलीस ठाणे हद्दीतील धनानी नगर, दांडीपाडा, गणेश नगर, काटकर पाडा, भैय्यापाडा,अवधनगर,आनंदी नगर, ओमसाई नगर, धोडीपूजा, सालवड शिवाजीनगर या भागात असलेल्या झोपडपट्टीमध्ये अनेक गावगुंड, पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार, अंमली पदार्थ विक्री करणारे, सोनसाखळी चोर सारखे अट्टल गुन्हेगार राहतात. तारापूर औद्योगिक क्षेत्र लगत असलेल्या गंगोत्री मैदान व त्याठिकाणी असलेल्या पडीत इमारती परिसरात देखील चर्सी तरूण गर्दूल्ले याठिकाणी दिवसभर असतात. त्यातच शहरातील विविध शाळा-कॉलेजेस आणि क्लासेसचा परीसर, एसटी बस डेपो परीसर, ओस्तवाल ड्रीम हाऊस, गोकुळ स्वीट कॉर्नर, यशपद्मा बैठक कॅफे, साईबाबा मंदीर, नवापूर नाका, यशवंतसृष्टी, चित्रालय परीसर, रेल्वे ट्रॅकनजीकची झोपडपट्टी, परमीट बार, पानटपटर्‍या आणि पडीक जागा या ठिकाणी रोडरोमिओ, गावगुंड, ड्रगिस्ट, चरशी, गांजाफूके, दारुडे, गर्दूल्ले यांचा दिवस-रात्र अड्डा जमत आहे. यामुळे औद्योगिक क्षेत्रात काम करणार्‍या महीला, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थीनी आणि बाजारात खेरेदीसाठी येणार्‍या महीला यांची छेडछाड, अश्लील हावभाव, घाणेरड्या कमेंटस करून महिलांना लज्जास्पद वाटणारे कृत्य या टोळक्यांन कडून केले जात आहे.

◾️गुन्हेगारांवर वचक ठेवण्यात बोईसर पोलिस कमी पडत असल्याची भावना नागरीकांमध्ये असून गर्दीच्या ठिकाणी तसेच गावगुंड आणि रोडरोमियोंच्या नेहमीच्या अड्ड्यावर साध्या वेशातील पोलीसांनी नियमीत गस्त घालणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अट्टल गुडांचे आश्रयस्थान असलेल्या संशयीत जागांवर वेळोवेळी कोंबिंग ऑपरेशन करून आपला धाक निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. बोईसर मध्ये वाढलेली गुन्हेगारी व रोडरोमिओंच्या दहशती मुळे संध्याकाळ नंतर महीला आणि मुलींना घराबाहेर पडणे मुश्कील झाले असून बाहेर गेलेली आपली मुलगी सहीसलामत घरी परतेल का या चिंतेत पालकवर्ग आहे.

◾️संध्याकाळी झाल्यावर पोलिसांचे दिखाऊ सेल्फी

पालघर पोलिस अधीक्षक यांनी काढलेल्या आदेशानुसार पोलिसांना आपण तैनात असलेल्या भागाचे सेल्फी फोटो व लोकेशन विशिष्ट पद्धतीने अँपवर टाकावे लागते. बोईसर शहरात देखील मुख्य बाजारपेठ, पोलिस चौक्या, तपासणी नाके अशा अनेक ठिकाणी तैनात असलेले पोलिस सेल्फी फोटोची प्रक्रिया पार पाडून आपल्या कामाचा पुरावा सादर करतात. दिवसभर कुठेही भटकत असले तरी त्या पोलिसाला सायंकाळी ही फोटोची प्रक्रिया करण्यासाठी धावाधाव करत आपल्या बंदोबस्त असलेल्या ठिकाणी जाऊन करावी लागते. या मागचा उद्देश पोलिस अधीक्षक कार्यालयाचा चांगला असला तरी प्रत्येक्षात चित्र हे वेगळेच असल्याचे दिसून येते.

आजच शेअर करा

Related Posts

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

March 20, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?
जिल्हा

“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?

March 20, 2026
वाढवण पोर्टकडून स्थानिकांसाठी स्वतंत्र रस्ता
जिल्हा

वाढवण पोर्टकडून स्थानिकांसाठी स्वतंत्र रस्ता

July 29, 2025
Next Post
अजानाच्या आवाजावर पोलिसांचा कंट्रोल?

अजानाच्या आवाजावर पोलिसांचा कंट्रोल?

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

March 20, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

February 25, 2021
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

शिवसेनेचे शिवबंध सोडून बोईसरचे दोन चेहरे शिंदेंच्या मांडीवर

शिवसेनेचे शिवबंध सोडून बोईसरचे दोन चेहरे शिंदेंच्या मांडीवर

September 19, 2022
खैराफाटक चौकीवर एका शिट्टीवर अर्थकारण

खैराफाटक चौकीवर एका शिट्टीवर अर्थकारण

October 13, 2021
एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत बोईसरमध्ये गटबाजी!

एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत बोईसरमध्ये गटबाजी!

May 19, 2023
मानवजन्माचे सार्थक करण्याचा उपदेश करणारे संत नामदेव यांचे अभंग

मानवजन्माचे सार्थक करण्याचा उपदेश करणारे संत नामदेव यांचे अभंग

November 25, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
  • वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!