Monday, May 25, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

वाडा तालुक्यातील पोलीस दुरक्षेत्रांना कुलूप

पालघर दर्पण by पालघर दर्पण
February 13, 2021
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
वाडा तालुक्यातील पोलीस दुरक्षेत्रांना कुलूप
0
SHARES
201
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

तक्रारदारांचा तालुका पोलिस ठाण्यात हेलपटा

पालघर दर्पण: वार्ताहर

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

वाडा: येथील मुख्य पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत येत असलेल्या कुडूस, खानिवली, गो-हे व परळी या चार पोलिस दूरक्षेत्रापैकी कुडूस पोलीस दुरक्षेत्र वगळता अन्य तीन पोलीस दुरक्षेत्र नेहमीच कुलूप बंद असतात. यामुळे या परिसरातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.

वाडा तालुक्यात 159 लहान मोठी गावे आहेत. सव्वादोन लाख लोकसंख्या असलेल्या वाडा तालुक्यात वाडा येथे मुख्य पोलीस ठाणे आहे. या पोलीस ठाणे अंतर्गत तालुक्यातील कुडूस, खानिवली, गो-हे व परळी या चार ठिकाणी पोलीस दुरक्षेत्र आहेत. मात्र या चार पोलीस दुरक्षेत्रांपैकी खानिवली, गो-हे व परळी ही तीन पोलीस दुरक्षेत्रे नेहेमीच कुलूप बंद अवस्थेत असताना दिसुन येत आहेत.

वाडा या तालुका मुख्यालयी असलेल्या मुख्य पोलीस ठाण्यापासुन अनेक गावांचे अंतर हे 30 ते 40 किलोमीटर लांबीचे आहे. या ठिकाणी एखादी घटना, वादाचा प्रसंग घडल्यास संबंधीत व्यक्तींना गावाजवळील पोलीस दुरक्षेत्र कुलूप बंद अवस्थेत दिसून येत असल्याने या तक्रारदारांना सरासरी 15 ते 20 किलोमीटर अंतराची पायपीट करावी लागत आहे. या भागात गेल्या चाळीस वर्षांपासुन पोलिस दुरक्षेत्रांची अशी अवस्था आहे. येथील पोलीस दूरक्षेत्राच्या अंतर्गत 20 ते 25 गावे असून साठ ते 70 हजार लोकसंख्या आहे. येथील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विभागवार असलेल्या पोलिस दूरक्षेत्रांकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे अशी मागणी येथील नागरीकांनी केली आहे.

तालुक्यातून भिवंडी-वाडा-मनोर हा राज्य महामार्ग जात असून या महामार्गावर दररोज अनेक लहानमोठे अपघात घडतात. अशा वेळी वेळेवर पोलिस घटनास्थळी पोहचत नाहीत त्यामुळे अपघातग्रस्तांना वेळेवर उपचार मिळत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत. पोलिस दूरक्षेत्रात पोलिसच नसल्याने अवैध धंदेवाल्यांचे फावले आहे. पोलिस दूरक्षेत्रे बंद असल्याने भुरट्या चो-यांचे प्रमाणही वाढले आहे. याशिवाय अवैद्य धंद्यातसुध्दा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एकंदरीत कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची भिती नागरिक व्यक्त करीत आहेत.

◾ वाडा पोलीस ठाण्यात अनेक पोलिस अधिकारी व 40 हुन अधिक पोलिस कर्मचारी यांच्या जागा रिक्त आहेत, यामुळे काही पोलीस दुरक्षेत्र काही वेळेसाठी बंद रहातात.
— सुधीर संख्ये, पोलिस निरीक्षक, पोलीस ठाणे वाडा

◾ स्वातंत्रपुर्व काळापासून असलेल्या परळी पोलीस दुरक्षेत्र कार्यालय सद्या पोलिस कर्मचाऱ्यांअभावी नेहमीच बंद दिसून येते.
— तारक जाधव, सामाजिक कार्यकर्ते, परळी, ता.वाडा.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
दहिसर गावात दहा वर्षांपासून समाज मंदिरात भरतेय अंगणवाडी

दहिसर गावात दहा वर्षांपासून समाज मंदिरात भरतेय अंगणवाडी

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

बोईसर येथील गुटख्याच्या गोदामावर छापा

बोईसर येथील गुटख्याच्या गोदामावर छापा

December 18, 2021
रुग्णवाहिकेमुळे पालघर ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा मिळेल — मंत्री एकनाथ शिंदे

रुग्णवाहिकेमुळे पालघर ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा मिळेल — मंत्री एकनाथ शिंदे

April 13, 2026
रिक्त पदांची माहिती संकलित करण्याचे निर्देश

रिक्त पदांची माहिती संकलित करण्याचे निर्देश

July 7, 2021
गौणखनीजाचा कोट्यावधींचा जिएसटी लोचा

गौणखनीजाचा कोट्यावधींचा जिएसटी लोचा

October 13, 2021

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!