डहाणूत वाल्मीकी कराड पॅटर्न
राजकीय पदाचा गैरवापर करत अवैध कामांचा म्होरक्या सुसाट
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
पालघर: सत्ताधारी पक्षांचे पद मिळवून आपली अवैध कामे मार्गी लावणाऱ्या भरत वर प्रशासन देखील मेहेरबान असल्याने कोलंबी प्रकल्प बाबत तक्रारी करूनही कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. डहाणू येथील लोणी पाडा भागात कोलंबी प्रकल्पाच्या जागेवर अनधिकृत फार्महाऊस उभारले असताना देखील राजकीय दबावापोटी या अनधिकृत बांधकामाला साधी नोटीस देखील बजावलेली नाही. यामुळे राजकीय पक्षाचा फायदा घेत अवैध कामांचा म्होरक्या सुसाट सुटलेला दिसून येतो.
डहाणू तालुक्यातील लोणीपाडा येथील गट नंबर १६६ मधील १० हेक्टर क्षेत्र कोळंबी संवर्धनासाठी माजी आमदाराच्या मुलाला देण्यात आले होते. मात्र याठिकाणी कोलंबी प्रकल्प उभारायचे सोडून माजी आमदारांच्या मुलाने ही शासनाची जागा चक्क डहाणू येथील भरत राजपूत यांच्या ताब्यात दिली. विशेष म्हणजे या कागदोपत्री असलेल्या कोलंबी प्रकल्पाच्या जागेचा कर भरताना पावती वर भरत राजपूत यांच्या हस्ते पैसे भरल्याची नोंद आहे. यायच टाळेबंदी मध्ये या प्रकल्पावर कारवाई साठी जात असलेले डहाणू नगरपरिषद चे सीईओ यांना भर रस्त्यात राजपूत यांनी दम भरत याचे परिणाम वाईट होतील असा इशारा दिला होता. याबाबत विडीओ समाज माध्यमांवर वायर झाला असल्याचे दिसून आले होते. कालांतराने याच नगरपरिषद सीईओ चा संशयास्पद मृत्यू झाल्याने नवीन आलेला कोणाताही अधिकारी या प्रकल्पावर कारवाई करण्यासाठी गेलेला नाही.
पालघर येथे झालेला पालकमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार व मंत्री प्रताप सरनाईक यांच्या लोक दरबारात देखील या कोलंबी प्रकल्प जागेवर उभारलेल्या फार्महाऊस बाबत तक्रार दाखल केली असताना देखील कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. एखाद्या राजकीय पक्षांच्या दबावाखाली येऊन फरफट जाणारे काही भ्रष्ट अधिकारी पालघर जिल्ह्याला लाभले असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी कितीही तक्रारी केल्या तरीही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांन कडून अनेकदा केला जात होता. मात्र ही वस्तुस्थिती असल्याचे दिसून येते असल्याने या अवैध कामांच्या म्होरक्याला प्रशासन लगाम कधी लावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
◾ कोलंबी प्रकल्पात बस्तान मांडलेल्या भरत ने याठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध बांधकाम करून फार्महाऊस उभारले आहे. रात्रीच्या वेळी याठिकाणी लख्ख रोषणाई केली जात असून राजकीय पार्ट्याचा अड्डा निर्माण केल्याचे स्थानिक सांगतात.