Thursday, June 18, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

वाणगावच्या घोटाळेबाज कोरे कुटुंबीयांवर कारवाई कधी?

पालघर दर्पण by पालघर दर्पण
May 1, 2025
in जिल्हा, ताज्या बातम्या, राज्य
0
वाणगावच्या घोटाळेबाज कोरे कुटुंबीयांवर कारवाई कधी?
0
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

मेलेल्या माणसाची जागा खरेदी विक्री करणारे मोकाट

पोलिसांन कडे तक्रार दाखल करूनही अद्याप कारवाई नाही.

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील

पालघर: मेलेल्या माणसाची जागा खरेदी करून ती विक्री करणाऱ्या वाणगावच्या कोरे कुटुंबीयांचा जमीन घोटाळा उघडकीस आला आहे. याबाबत पोलिसांन कडे तक्रार दाखल करण्यात आली असून आजवर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. विशेष म्हणजे या कुटुंबातील मास्टरमाईंड हा सत्ताधारी पक्षाचा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष असल्याने राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिस देखील आपले कर्तव्य बजावताना दिरंगाई करत असल्याचे एकंदरीत दिसून येत आहे.

तारापूर येथील धर्मा सुकऱ्या सावे यांनी आपल्या जागेचे विश्वासाने दिलेले कुलमुखत्यार पत्राचा गैरवापर करून भानुदास रघुनाथ सावे व वाणगावच्या कोरे कुटुंबीयांनी जमीन घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे. डहाणू तालुक्यातील मौजे डेहणे येथील गट क्रमांक ८ क्षेत्र ४-१५.०० हे. आर क्षेत्राची जमीन मयत खातेदार धर्मा सुकऱ्या सावे यांच्या नावे असलेली जागा पैकी २-०१.०० हे. आर क्षेत्र जागा बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मयत असलेल्या धर्मा सुकऱ्या सावे यांनी आपल्या जागेचे कुलमुखत्यार पत्र भानुदास रघुनाथ सावे यांना दिले होते. परंतु धर्मा सावे यांचा मृत्यू झाल्यावर जागेचे पैसे लाटण्याच्या उद्देशाने मयताच्या २४ दिवसातच अवैध असलेल्या कुलमुखत्यार पत्राच्या आधारे आपसात संगणमत करून ही जागा वाणगाव येथील वृषाली दिनेश कोरे व तिची आई दिपा दिनेश कोरे यांना विकल्याचे समोर आले होते.

मेलेल्या माणसाची बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदी केलेली जागा भविष्यात अडचणीची ठरू नये यासाठी २९ मार्च २००७ रोजी डिड ऑफ कन्व्हेयन्स या दस्तऐवजाने ऍबी जॉर्ज यांना विक्री केली आहे. ही विक्री करताना साक्षीदार म्हणून दिपा दिनेश कोरे यांचा मुलगा व वृषाली दिनेश कोरे यांचा भाऊ तसेच माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज कोरे यांची सही दिसून येते. तक्रारदार गीतांजली सावे यांनी भानुदास सावे तसेच वृषाली दिनेश कोरे व तिची आई दिपा दिनेश कोरे, ए. बी. जॉर्ज यांनी केलेल्या बेकायेदशीर कृत्याबाबत त्यांचे विरूध्द गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई मागणी केली असून पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या तक्रारीत कागदोपत्री पुरावे ही जोडलेले आहेत. मात्र महिना उलटून गेला असला तरी कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.

प्रकरणातील मास्टरमाईंड राजकीय सत्ताधारी पक्षांचा पदाधिकारी असल्याने पोलिसांवर दबाव?

बेकायदेशीर पणे जागा विकत घेणारे व विक्री करणाऱ्या दिपा दिनेश कोरे यांचा मुलगा व वृषाली दिनेश कोरे यांचा भाऊ हा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष व सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी असल्याने या प्रकरणी कारवाई होऊ नये यासाठी राजकीय दबाव आणला जात असल्याचा आरोप केला जात आहे. यातच मंत्री प्रताप सरनाईक यांच्या लोक दरबारात तक्रार दाखल करून देखील याबाबत पोलिसांनी कोणतीही साधी चौकशी देखील केलेली नाही.

नेमकं प्रकरण काय..

मौजे डेहणे येथील बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री केलेली जागा सावे कुटूंबाचे सामईक मालकीची जमीन व यातील तक्रारदार गीतांजली सावे यांचे सासरे हरिश्चंद्र सुक-या सावे, धर्मा सुकऱ्या सावे व अन्य खातेदार यांचे सामाईक मालकीची व कब्जेवहिवाटीची असून त्यांचे जमीनीचे सहहिस्सेदार धर्मा सुकऱ्या सावे हे १ फेब्रुवारी १९९८ रोजी मयत झाले होते. असे असतानाही सन १९९८ रोजी सदरहू जमीनीचे ७/१२ दप्तरी हरिश्चंद्र सुकऱ्या सावे, धर्मा सुकऱ्या सावे, हरेश्वर सुकऱ्या सावे व इतर यांची नावे मालक व कब्जेदार ७/१२ सदरी नोंद होती.

बनावट कागदपत्रांच्या आधारे जागा विकणारा भानुदास रघुनाथ सावे यांनी वृषाली दिनेश कोरे व तिची आई दिपा दिनेश कोरे यांच्या सोबत आपसांत संगनमत करून सदरची जमीनी व अन्य जमीनीचे, जमीन मालकांचे नावाचे खोटे व बोगस कुलमुखत्यार पत्र तयार करून २-०१.०० हे. आर क्षेत्राच्या जमीनचे कुलमुखत्यार धारक असल्याचे भासवून भानुदास रघुनाथ सावे यांनी २४ फेब्रुवारी १९९८ रोजी कोरे कुटुंबीयांना बेकायदेशीर दुय्यम निबंधक डहाणू यांच्या कडे नोंदणी करत ही जागा विक्री केली आहे.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
गडचिंचले नंतर बदनाम झालेला पालघर नव्या वाटेवर..

गडचिंचले नंतर बदनाम झालेला पालघर नव्या वाटेवर..

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

ऐतिहासिक मांडवी कोटावर माहिती फलक मोहीम सुरुवात

ऐतिहासिक मांडवी कोटावर माहिती फलक मोहीम सुरुवात

November 30, 2020
पालघरच्या कृषी संशोधन केंद्रात शास्त्रज्ञांच्या खुर्च्या रिकाम्या

पालघरच्या कृषी संशोधन केंद्रात शास्त्रज्ञांच्या खुर्च्या रिकाम्या

October 20, 2020
वाड्यातील शेतकरी कलिंगडाच्या शेतीकडे

वाड्यातील शेतकरी कलिंगडाच्या शेतीकडे

December 14, 2020
पालघर गडचिंचले साधू हत्या प्रकरणात ८९ आणखीन जणांचा जामीन मंजूर

पालघर गडचिंचले साधू हत्या प्रकरणात ८९ आणखीन जणांचा जामीन मंजूर

January 16, 2021

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.