पालघर कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेल्या पालघरला सुस्थितीत आणण्यासाठी पालघर पोलिस तत्पर
पालघर दर्पण: प्रतिनिधी
पालघर: छुपा नक्षलवाद आणि हिंदू विरोधी गट यामुळे पालघर जिल्ह्यात 2020 मध्ये गडचिंचले येथे झालेल्या साधू हत्याकांडानंतर जिल्ह्याचे नाव पूर्ण देशभरामध्ये बदनाम झाले होते. या हत्याकांडा नंबर बदनाम झालेले पालघर पोलिस दलाने देखील तत्पर होऊन सर्व क्षेत्रात आपला नावलौकिक वाढवून देशभरात चांगल्या कार्यासाठी पोलिस दलाचे नाव पुढे आले आहे.
गुन्हेगारीचे वाढलेले वास्तव्य व जिल्ह्यात वाढलेले ड्रग्स माफियांचे जाळे मुळापासून नष्ट करण्यासाठी पालघर पोलिस दलाने गेल्या तिन वर्षात अनेक कारवाया केल्याचे दिसून आले आहे. सर्वसामान्य नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी असलेल्या कंट्रोल रूम व ११२ या नंबर वरून मिळणारी तात्काळ मदत यामुळे पोलिसांन सोबत जनतेचा विश्वास वाढला. कितीही दुर्गम भाग असला तरीही ११२ या क्रमांकावर फोन केल्यावर तात्काळ मदत मिळते आणि पालघर पोलिस देखील गांभीर्याने याकडे बघत असल्याचे आजवर नागरिकांना आलेल्या अनुभवावरून दिसून आले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी शंभर दिवसाचा प्रशासकीय सुधारणे संदर्भात दिलेल्या सात कलमी कार्यक्रम यामध्ये पालघर जिल्हा पोलीस दलाने 50 दिवसांमध्ये व शंभर दिवसांमध्ये सर्वच क्षेत्रांमध्ये बाजी मारून प्रशासकीय सेवेमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये सर्वोत्कृष्ट आहोत हे पुन्हा एकदा निर्विवादपणे सिद्ध करून दाखवले आहे.
देशाचे महत्वकांक्षी प्रकल्प पालघर जिल्ह्यात सध्या सुरू असून वाढवण बंदराचा 25 वर्षाचा प्रलंबित प्रश्न अतिशय शांततामय मार्गाने सोडवण्यामध्ये पालघर पोलीस दलाचा मोठा वाटा आहे. याभागात असलेले तणावपूर्ण वातावरण स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यांनी केलेले आंदोलन यामध्ये कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी पोलिसांनी घेतली आहे. वाढवण बंदरा बरोबरच जिल्ह्यामध्ये सुरू असणारे फ्रेट कॉरिडॉर ,बुलेट ट्रेन ,बडोदरा मुंबई एक्सप्रेस हायवे इत्यादी मोठे प्रकल्प आज व्यवस्थीत पणे सुरू आहेत.
पोलिस संकेतस्थळावरील सुधारणा, स्वच्छता, कार्यालयीन तत्परता ,ई-ऑफिस ,सायबर संदर्भातील “सायबर सुरक्षित पालघर जिल्हा” जनसंवाद अभियान तसेच वाहनांचे निर्गमतीकरण व विजिटर्स मॅनेजमेंट सिस्टीम, इंडस्ट्री तक्रार निराकरण टॅब,लॉस्ट अँड फाउंड टॅब , AI चॅटबॉट ,व्हाट्सअप चॅट बॅक्स ,COP bot फोर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एफिशियन्सी या सर्व गोष्टी महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्याने केलेल्या नव्हत्या त्या सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पालघर पोलीस दलाने शक्य करून दाखवल्या आहेत. जिल्ह्यातील पोलीस दल हे पालघर जिल्ह्यातील आदिवासीबहुल जनतेसाठी सातत्याने काम करत असून पूर्ण महाराष्ट्राने याची दखल घेतलेली आहे आणि या जिल्ह्यामध्ये सुरू असणारे योजना संपूर्ण राज्यांमध्ये लागू करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासन लवकरच याबाबत शासन निर्णय करणार असल्याचे पोलिस दलाकडून सांगण्यात आले आहे.