Sunday, August 23, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला धुडकावून दस्तऐवज नोंदणी

पालघर दर्पण by पालघर दर्पण
January 28, 2025
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला धुडकावून दस्तऐवज नोंदणी
0
SHARES
1.9k
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला धुडकावून दस्तऐवज नोंदणी

डहाणू च्या उपनिबंधकाचा प्रताप उघडकीस

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज कोरे व भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांचा दस्तऐवज नोंदणीत समावेश

पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी

पालघर: शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय वर्ग दोनच्या जमीनींचे साठे करार खरेदी विक्री बेकायदेशीर असल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. डहाणू तालुक्यात वर्ग दोनच्या जमिनींचे साठे करार तसेच कुलमुखत्यार पत्रांची नोंदणी करण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या दस्तामध्ये राजकीय पक्षाच्या पालघर जिल्हा स्तरावरील पदाधिकारी आणि नगरसेवकांची नावे असल्यामुळे उपनिबंधक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे बेकादेशीर दस्तऐवज नोंदणी केल्याचे उघडकीस आले आहे.

पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी 10 डिसेंबर 2024 रोजी वर्ग दोनच्या जमिनी बाबत मनाई आदेश काढत या जागेचे साठे करार, खरेदी विक्री व कोणत्याही प्रकारचे दस्तऐवज नोंदणी करू नये यासाठी तातडीचे आदेश बजावले होते. मात्र जिल्हाधिकारी यांचे आदेश धुडकावून 1 जानेवारी रोजी डहाणू उप निबंधक कार्यालयात आसनगाव येथील वर्ग दोनच्या जमिनीच्या तीन कुलमुखत्यार पत्रांची नोंदणी करण्यात आली आहे. साठे करार आणि जमीन मालकांच्या सह्यानी 49 हेक्टर पैकी साडे तीन हेक्टर क्षेत्राचे कुलमुखत्यार पत्राची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

डहाणू तालुक्यात आशिया खंडातील सर्वात मोठे वाढवण बंदराचे काम लवकरच सुरु होणार असल्यामुळे वाढवण परिसरातील गावांमधील जमिनींचा भाव वधारला आहे. जमिनी ताब्यात घेण्यासाठी सत्ताधारी पक्षांचे पदाधिकारी शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून नियमबाह्य पद्धतीने कामे करत असल्याचे आता उघडकीस आले आहे. वाढवण बंदरातून जाणारा महामार्ग यासाठी आसनगाव येथील जागेचे भाव दुप्पट वाढले असून येथील जागेवर राजकारण्यांचे विशेष लक्ष लागले आहे.

आसनगाव येथील वर्ग दोनच्या जमीनींचे बेकायदेशीर करण्यात आलेले साठे करार कुलमुखत्यार पत्रांची नोंदणी मध्ये पालघर जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज कोरे व भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या नावाचा समावेश असल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांचा वर्ग दोनच्या जमिनी बाबत नोंदणीसाठी मनाई आदेश असताना डहाणू उपनिबंधक कार्यालयातुन कुलमुखत्यार पत्राची नोंदणी करण्यात आल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग झाला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशानंतरही उप निबंधक कार्यालया कडून वर्ग दोन जमिनींची नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जात असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
आसनगाव भुखंड घोटाळा प्रकरणात राजकीय दबाव?

आसनगाव भुखंड घोटाळा प्रकरणात राजकीय दबाव?

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

प्रदूषणकारी कारखान्या विरोधात सामाजिक संघटने कडून तक्रार

प्रदूषणकारी कारखान्या विरोधात सामाजिक संघटने कडून तक्रार

November 5, 2020
बोईसर ग्रामीण रुग्णालयाचा मार्ग मोकळा

बोईसर ग्रामीण रुग्णालयाचा मार्ग मोकळा

May 5, 2026
सागरी किनारा व्यवस्थापन आराखडयाच्या ऑनलाइन जनसुनावणीला मनसेचा विरोध

सागरी किनारा व्यवस्थापन आराखडयाच्या ऑनलाइन जनसुनावणीला मनसेचा विरोध

May 5, 2026
कारच्या आगीत होरपळून राष्ट्रवादी कार्यकर्तांचा मृत्यू

कारच्या आगीत होरपळून राष्ट्रवादी कार्यकर्तांचा मृत्यू

October 15, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.