Monday, May 25, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

फसवणूक करणाऱ्या युवासेनेच्या पिंपळेला वाचवण्यासाठी नेते हतबल

पालघर दर्पण by पालघर दर्पण
December 20, 2021
in ताज्या बातम्या
0
फसवणूक करणाऱ्या युवासेनेच्या पिंपळेला वाचवण्यासाठी नेते हतबल
0
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾️ शिवसेना युवासेनेचा पदाधिकारी असलेल्या सुमित पिंपळेने उद्योजकांचे 1 कोटी 28 लाख केले परस्पर लंपास

पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

बोईसर: शिवसेना सत्तेवर असल्याने पक्षाच्या मंत्र्यांचे नाव वापरून सद्या औद्योगिक क्षेत्रात कार्यकर्तांनी धुमाकूळ घातला आहे. असाच प्रकार बोईसर मध्ये घडला असून तारापुर औद्योगिक क्षेत्रातील एका उद्योजकाला युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांने कोट्यवधी रूपयाचा गंडा घालत पैसे परस्पर लंपास केले आहेत. याबाबत उद्योजकांने तक्रार केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटने चौकशी साठी ताब्यात घेत नंतर राजकीय दबावाखाली येत तक्रारदार यांच्या सोबत तडजोड करावी याठिकाणी सोडून दिले आहे.

तारापुर औद्योगिक क्षेत्रातील एका उद्योजका कडून कोट्यवधी रूपयाच्या मशीन भंगार भावाने विक्री साठी काढण्यात आल्या होत्या. शिवसेना युवासेनेचा पालघर विधानसभा उपजिल्हा युवा अधिकारी सुमित पिंपळे यांने उद्योजकाच्या मशीन विक्री करून देतो यासाठी सौदा केला होता. या सौद्यात दलाली म्हणून साधारण 68 लाख रूपये पिंपळे यांना मिळणार होते. मात्र सुमित पिंपळे यांची नियत खराब झाल्यावर त्यांने उद्योजकाला मशीन साठी देण्यात येणारे सुमारे 1 कोटी 28 लाख देखील आपल्या साथीदाराच्या मदतीने परस्पर लंपास केले. उद्योजकांने मशीनच्या पैशा बाबत विचारना केली असता पिंपळे यांने राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले होते. उद्योजकाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांने स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटला वसुली करण्याची जबाबदारी देत तक्रार दाखल केली. याच तक्रारीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सुमित पिंपळे यांना चौकशी साठी ताब्यात घेतले होते.

बोईसर स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी युवासेनेच्या पिंपळे यांना चौकशी साठी 17 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास ताब्यात घेतले होते. त्यानंतर या फसवणूक करणाऱ्या महाशयांवर कारवाई होऊ नये यासाठी बोईसर मधील शिवसेनेचे हताश असलेले नेते मंडळी गुन्हे शाखेच्या कार्यालयाबाहेर तळ ठोकून बसले होते. विशेष म्हणजे ठाण्यावरून देखील मायबाप असलेल्या नेत्यांचे राजकीय दबावाचे फोन स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांवर आणल्यानंतर रात्री उशिरा सुमित पिंपळे यांना सोडून देण्यात आले. यासर्व नाट्यमय घटनेबाबत अधिक तपशील स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांने देण्यासाठी नकार दर्शविला होता. यावेळी शिवसेनेचे बोईसर विधानसभा संघटक निलम संखे, शहर प्रमुख मुकेश पाटील यांच्या सह मोठ्या संखेने कार्यकर्ते उपस्थित होते.

◾️ कोट्यवधी रूपयाच्या फसवणुकी बाबत तक्रार दाखल असताना देखील आजवर गुन्हा दाखल झालेला नसून राजकीय दबावाखाली पोलिस नेमका काय तपास करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे शिवसेनेची मलीन होत असलेली प्रतिमा बोईसर मध्ये राहावी यासाठी प्रसार माध्यमांवर आलेल्या बातम्या खोट्या असल्याचा केविलवाणा प्रयत्न सुमित पिंपळे व त्यांच्या हताश नेत्यांन कडून केला जात आहे.

◾️स्थानिक गुन्हे शाखाने घेतली होती का 1 कोटी 28 लाख वसुलीची जबाबदारी

उद्योजकांने तक्रार दाखल केल्यानंतर सर्व पुरावे हे बोईसरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांन कडे होते तर त्यांनी गुन्हा दाखल का केला नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. यातच चौकशीच्या दबाव आणुन राजकीय दबावाखाली येवुन गंभीर प्रकरणात सुवर्णमध्य काढण्याचे काम नेमकी कोणी केले हा देखील चौकशीचा विशेष आहे. या प्रकरणावरून मात्र राजकीय दबावाखाली येवून पोलिस विभाग आरोपींना कशी मोकळीक देत याचे उत्तम उदाहरण आहे

◾️ ठाण्याच्या फाटकांन समोर झाला समझोता

सुमित पिंपळे यांना वाचवण्यासाठी बोईसरचा फौजफाटा 18 डिसेंबर रोजी ठाण्याच्या फाटका समोर दाखल झाला. यावेळी उद्योजकला बोलवून तडजोड करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे. यामध्ये दोन दिवसात पैसे देण्याचे देखील मान्य केल्याची चर्चा बोईसर मध्ये राजकीय वर्तुळात रंगली आहे. यामुळे ठाण्याच्या फाटका समोरचा समझोता खरा की नुसती उडती उडती चर्चा यावर येणाऱ्या दोन दिवसात शिक्कामोर्तब होईल.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?
जिल्हा

“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?

March 20, 2026
Next Post
अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी शिवसेना नेते सरसावले

अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी शिवसेना नेते सरसावले

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

दगडी पावडरने श्वास कोंडला!

दगडी पावडरने श्वास कोंडला!

December 2, 2020
प्रत्येकाने भारताचे संविधान समजून घेतलेच पाहिजे त्याशिवाय पर्यायच नाही

प्रत्येकाने भारताचे संविधान समजून घेतलेच पाहिजे त्याशिवाय पर्यायच नाही

August 15, 2020
बोईसरच्या बेटेगाव चौकीवरील हप्तेखोरी उघड

बोईसरच्या बेटेगाव चौकीवरील हप्तेखोरी उघड

December 5, 2020
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोकण विभागातील जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

मुख्यमंत्र्यांचा पालघर दौरा अजूनही अनिश्चित

August 17, 2021

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!