Monday, August 24, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

तोक्ते चक्रीवादळग्रस्त मच्छिमारांसाठी आर्थिक मदत लवकरच

पालघर दर्पण by पालघर दर्पण
June 16, 2021
in ताज्या बातम्या, राज्य
0
तोक्ते चक्रीवादळग्रस्त मच्छिमारांसाठी आर्थिक मदत लवकरच
0
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

■मच्छिमारांच्या सर्व समस्यांवर लवकरच तातडीने कार्यवाही करू; मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

पालघर दर्पण, प्रतिनिधी

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

मुंबई : तोक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या वादळग्रस्त मच्छिमारांसाठी आर्थिक मदतीच्या निकषाबाबत मच्छिमारांच्या सर्व बाजू समजावून घेवून सर्वानुमते निर्णय  घेवून त्वरित कार्यवाही करण्यात येईल. असे आपत्ती व्यवस्थापन तसेच मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

मंत्रालयातील दालनात तोक्ते चक्रीवादळामुळे वादळग्रस्त मच्छिमारांना आर्थिक मदतीचे निकष बदलून मिळावे यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत ही बैठक पार झाली. या बैठकीत मच्छीमारांना तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात बँकासोबत देखील चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. वादळग्रस्त मच्छिमारांना शासनाकडून मंजूर झालेली नुकसानीची रक्कम तात्काळ वितरित करण्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेशही संबधित विभागाला देण्यात आले आहेत.

यापूर्वी निसर्ग चक्रीवादळावेळी शासनाने जुन्या निर्णयांमध्ये आमुलाग्र बदल करून घेतल्यामुळे आपदग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीत वाढ केली आहे. निसर्ग चक्रीवादळातील आपद्ग्रस्तांकरिता राज्य शासनाकडून केंद्र सरकारला १०४० कोटी रूपयांचा प्रस्ताव पाठविला होता. केंद्र शासनाने फक्त २६८ कोटी रूपयांची मदत केली तर राज्य शासनाने ७८० कोटी रूपयांची मदत आपदग्रस्तांना केली आहे. मच्छीमारांच्या बाबतीत शासन सकारात्मक असून त्यांनी केलेल्या मागण्यांबाबत सर्वानुमते योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार म्हणाले.

■ *तोक्ते चक्रीवादळग्रस्त मच्छिमारांना मदतीसाठी शासन सकारात्मक*

मच्छिमार बांधवांनी मांडलेल्या सर्व मुद्यांवर शासन सकारात्मक कार्यवाही करेल. निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेसही शासनाने अनेक नियम बदलून वादळग्रस्तांना मदत केली आहे. त्याचपद्धतीने तोक्ते चक्रीवादळग्रस्त मच्छिमार यांनाही मदत देण्याबाबत शासन सकारात्मक आहे. असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. महाराष्ट्र मच्छिमार कृति समितीने यावेळी मच्छिमार बांधवांच्या तोक्ते वादळातील झालेल्या नुकसानीबाबत माहिती दिली. वाढवून मिळणारी मदत रोख रक्कम अथवा एखाद्या योजनेमार्फत मिळावी. मासळी सुकविणारे छोटे मत्स्यव्यवासायिक यांनाही मदत करावी अशा विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मनसेचे अनोखे आंदोलन

रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मनसेचे अनोखे आंदोलन

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

बोईसकर नगरपरिषदेच्या प्रतिक्षेत!

बोईसकर नगरपरिषदेच्या प्रतिक्षेत!

October 12, 2020
पालघरच्या लाचखोर शिक्षणाधिकारी लाच स्विकारताना ताब्यात

पालघरच्या लाचखोर शिक्षणाधिकारी लाच स्विकारताना ताब्यात

April 25, 2022
वसईत गर्दुल्यांची लुटारू टोळी सक्रिय

वसईत गर्दुल्यांची लुटारू टोळी सक्रिय

October 15, 2020
विराज प्रोफाइल कडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष?

विराज प्रोफाइल कडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष?

January 24, 2022

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.