Monday, August 24, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

प्रदूषण प्रकरणी ग्रामपंचायतीचा घुमजाव!

पालघर दर्पण by पालघर दर्पण
April 13, 2026
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
प्रदूषण प्रकरणी ग्रामपंचायतीचा घुमजाव!
0
SHARES
774
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾विधानसभेच्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना दिशाभूल करण्याचा प्रयत्न; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व कोलवडे ग्रामपंचायतीने केमिकल माफियाला वाचविण्यासाठी केलेला प्रयत्न उघड

पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यातील रसायन युक्त प्लॅस्टिक व ड्रम धुवून होणाऱ्या प्रदूषणाबाबत ग्रामपंचायतीने केलेल्या तक्रारी मध्ये ग्रामपंचायतीने घुमजाव केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत लेखी पत्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला देवून आता प्रदूषण होणाऱ्या जागेवर कोणत्याही प्रकारचे काम सुरू नसल्याचा उल्लेख असलेले पत्र दिले आहे. मात्र प्रत्येक्षात याठिकाणी रोजच खुलेआम प्रदूषण सुरू असल्याचे निदर्शनास आले असल्याने तारांकित प्रश्नाला उत्तर देताना कसा बनाव केला जातो हे उघडकीस आले आहे.

औद्योगिक क्षेत्रातील राजकीय कारखान्यातुन निघणारा घनकचरा व प्लास्टिक ड्रम औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या लगतच्या कोलवडे येथील शेतजमीनीत धुतले जात असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात रासायनिक प्रदूषण होत आहे. यातून निघणारे घातक रसायन नैसर्गिक नाल्यात सोडले जात असल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानुसार कोलवडे ग्रामपंचायतीच्या समितीने 2 नोव्हेंबर रोजी प्रदूषण होत असलेल्या जागेवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती. ग्रामपंचायतीने तसेच प्रदूषण विभागाने कोणत्याही प्रकारची परवानगी दिली नसल्याचे यावेळी निदर्शनास आले होते. यामुळे पर्यावरणाला धोका पोचण्याची शक्‍यता पाहता तसेच जमिनीमध्ये रासायनिक केमिकल पाण्यामुळे जलस्रोत खराब होण्याची शक्यता असल्याने आता प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधितांविरुद्ध तातडीने कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायतीने 4 नोव्हेंबर रोजी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली होती. मात्र याबाबत विधानसभेत तारांकित प्रश्न सादर झाल्याने याठिकाणी कोणत्याही प्रकारचा व्यवसाय सुरू नसल्याचे पत्र ग्रामपंचायतीने दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

कोलवडे ग्रामपंचायतीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिलेल्या तक्रारी नुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाने येथील केमिकल माफियांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नव्हती. याठिकाणी “वाहब” नावाचा एक भंगार व केमिकल माफिया प्रदूषण करत असताना देखील कोणत्याही प्रकारची फौजदारी कारवाई आजवर झालेली नाही. मात्र विधानसभेत तारांकित प्रश्न सादर झाल्यानंतर 4 डिसेंबर रोजी महिनाभरानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व ग्रामपंचायत सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी प्रदूषण सुरू असलेल्या जागेवर जाऊन पाहणी केल्याचे पत्रात म्हटले आहे. यानुसार कोलवडे ग्रामपंचायतीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूर 2 चे उपप्रादेशिक अधिकारी यांना पत्र देऊन त्यामध्ये आपल्या सोबत केलेल्या पाहणी मध्ये कोणत्याही प्रकारचा व्यवसाय शेती जागेवर सुरू नसल्याचे पत्र दिले आहे. याठिकाणी प्रत्यक्षात भंगार व केमिकल माफियांचे प्रदूषण सुरूच असताना ग्रामपंचायतीने बनावट पत्र दिले तरी कसे असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कोलवडे ग्रामपंचायत हद्दीत शेती भागात केमिकल युक्त प्लॅस्टिक धुवून प्रदूषण सुरू असल्याबाबत माहिती मिळाल्या नंतर याभागात जाऊन वस्तुस्थिती पाहणी केली. त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूर 2 चे उपप्रादेशिक अधिकारी दिपक बनसोड यांना विचारणा केली असता. त्यांनी याबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार ग्रामपंचायतीची आता नाही, याठिकाणी सुरू असलेले प्लॅस्टिक धुवण्याचे काम बंद असल्याचे उत्तर देत प्रकरणातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र याबाबत संशय आल्याने अधिक माहिती मिळावी यासाठी प्रादेशिक अधिकारी राजेंद्र राजपूत यांना भेटून ग्रामपंचायतीने केलेल्या पत्रव्यवहाराची माहिती घेतल्या नंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे विधानसभा तारांकित प्रश्नाला उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांन सोबत ग्रामपंचायतीने केलेला बनाव उघडकीस आला असून विधीमंडळाची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

◾ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूर 2 चे उपप्रादेशिक अधिकारी दिपक बनसोड यांना बातमी बाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी बातमी छापु नका असे उत्तर दिले. त्यानंतर त्यांना आपली प्रतिक्रिया काय हे पुन्हा विचारले असता 4 डिसेंबर रोजी प्रत्येक्ष जागेवर जाऊन तपासणी केली असता एक गोडाऊन सुरू होते व दोन भंगार गोडाऊन बंद असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे ग्रामपंचायतीने दिलेले पत्र व त्यात उल्लेख असलेला मजकूर खोटा असल्याचा एकप्रकारे खुलासा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून होत आहे.

◾कोलवडे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी नितीन मोकाशी यांना संपर्क व मोबाईल वर संदेश पाठवून देखील त्यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. तसेच दुपार नंतर पुन्हा प्रतिक्रिया जाऊन घेण्यासाठी संपर्क साधला असता फोन बंद ठेवण्यात आला होता.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
बंदराचा विरोध डावळून जिल्हा प्रशासन डोंगराच्या शोधात

बंदराचा विरोध डावळून जिल्हा प्रशासन डोंगराच्या शोधात

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

यामुळे गुगलच्या सेवा झाल्या होत्या बंद.

यामुळे गुगलच्या सेवा झाल्या होत्या बंद.

December 15, 2020
ठाकुरांच्या इमारतीवर प्रशासन मेहरबान

ठाकुरांच्या इमारतीवर प्रशासन मेहरबान

October 3, 2022
दारूच्या नशेत बोईसरचे दोन पोलिस पोचले आनंद मेळ्यात?

दारूच्या नशेत बोईसरचे दोन पोलिस पोचले आनंद मेळ्यात?

March 10, 2023
जेष्ठ कलाकार रवी पटवर्धन यांचं निधन

जेष्ठ कलाकार रवी पटवर्धन यांचं निधन

December 6, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.