Monday, May 25, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

बंदराचा विरोध डावळून जिल्हा प्रशासन डोंगराच्या शोधात

पालघर दर्पण by पालघर दर्पण
April 13, 2026
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
बंदराचा विरोध डावळून जिल्हा प्रशासन डोंगराच्या शोधात
0
SHARES
506
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾ एकीकडे वाढवण बंदराला तिव्र विरोध असताना जिल्हा प्रशासन शोधतेय बंदर उभारणीसाठी दगड; खदानीमुळे पर्यावरण नष्ट होत चालेल्या बोईसर पुर्वे भाग होणार उध्वस्त

पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

बोईसर: पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदराला स्थानिकांचा जोरदार विरोध डावळून बंदराला लागणारा दगड शोधण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन करत आहे. बंदराच्या भरावासाठी लागणाऱ्या दगडासाठी कोणता डोंगर फोडावा याबाबत बैठक 4 डिसेंबर रोजी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात पार पाडल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे स्थानिकांना धुडकावून केंद्र सरकार हे बंदर रेटून उभारणार असल्याचे अधिक स्पष्ट झाल्याची दिसत आहे.

वाढवण बंदराच्या उभारणी साठी मोठ्या प्रमाणात गौणखनिज लागणार असून जिल्हा प्रशासन यासाठी सज्ज झाल्याचे दिसून आले आहे. या बदंरासाठी लागणारे विविध गौणखनिज कशा पद्धतीने व कुठून पुरविता येईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती त्यामुळे बंदराचे प्रत्यक्ष कामास जानेवारी 2021 मध्ये सुरू होण्याची शक्यता अधिक प्रबळ होत चालल्याची चित्र दिसत आहे. वाढवण बंदराच्या उभारणीसाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) तर्फे पालघरच्या जिल्हाधिकार्‍यांना 27 नोव्हेंबर 2020 रोजी एक पत्र पाठविण्यात आले आहे. या पत्राच्या अनुशंगाने पालघरचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर किरण महाजन यांच्या अध्यक्षतेखाली 4 डिसेंबर 2020 रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास एक बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीत बंदर उभारण्यासाठी लागणारे गौण खनिज, माती, मुरूम व दगड उपलब्ध करून देण्यासंदर्भात विविध विभागाचे अधिकारी यांच्याकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीसाठी जिल्ह्याचे महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी, उपवनसंरक्षक तसेच जेएनटीचे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट अधिकारी, पालघर उपविभागीय महसूल उपजिल्हाधिकारी, तसेच महसूल विभागातील तहसीलदार मंडळ अधिकारी, तलाठी तसेच वन विभागांचे वन अधिकारी आदी या बैठकीत उपस्थित राहिले होते. वाढवण बंदराचा प्रस्तावित भाग पाच चौरस किलोमीटर असल्याने किनाऱ्या पासून आत समुद्रामध्ये भराव करण्यासाठी दगड, माती, मुरूम, या गौण खनिजाचा प्रचंड वापर करावा लागणार असल्याने त्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर हे सर्व साहित्य कुठे उपलब्द होऊ शकेल याचा तपास करण्याचे व शोधण्याचे काम या बैठकीस उपस्थित असलेल्याच्या कडे सोपविण्यात आले आहे.

◾पालघर जिल्ह्यातील डहाणू व पालघर तालुक्यात डोंगर – जंगल वन क्षेत्र मोठया प्रमाणात असले तरी ते शासकीय मालकीचे म्हणजेच वन विभागाचे आहे. या दोन्ही तालुक्यात खाजगी वन अथवा डोंगर खूपच कमी असून त्याची संख्या अगदी नगण्यच आहे. त्यामुळे येथील गौण खनिज या बंदराच्या उभारणी करीत अतिशय अल्प उपलब्ध होऊ शकणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या मालकीचे किंवा राज्य शासनाच्या वन विभागाच्या मालकीचे किंवा केंद्र सरकारच्या मालकीचे व वन विभागाच्या मालकीचे डोंगर उपलब्ध करावे लागतील असा एक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

◾ बोईसर पुर्वेकडील नागझरी भागात मोठ्या प्रमाणात खदानी खोदकाम सुरू असून याभागातील संपूर्ण पर्यावरण धोक्यात आले आहे. बेकायदेशीर खदानींन कडे देखील महसूल विभाग दुर्लक्ष करत असून प्रमाणापेक्षा अधिक खोल खदानी खोदकाम करण्यात आले आहे. याभागातील लहान मोठे डोंगर नष्ट करण्यात आले असून जर याभागात बंदरासाठी डोंगर नष्ट झाले तर संपूर्ण परिसर बकाल होण्याच्या वाटेवर आहे.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
वसईतील रुग्णालयात महिलेचा विनयभंग

वसईतील रुग्णालयात महिलेचा विनयभंग

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

153 वर्षे जुना ब्रिटिश कालीन पूल तोडण्यास सुरुवात

153 वर्षे जुना ब्रिटिश कालीन पूल तोडण्यास सुरुवात

November 20, 2020
विक्रमगडमध्ये भाताच्या 55 जातीच्या देशी वाणांची शेती

विक्रमगडमध्ये भाताच्या 55 जातीच्या देशी वाणांची शेती

October 7, 2020
महामार्गावर सीएनजी इंधनावर धावणाऱ्या कारला आग

महामार्गावर सीएनजी इंधनावर धावणाऱ्या कारला आग

April 13, 2026
देदाळे- भेंडवड रस्त्याचे काम दर्जाहीन

देदाळे- भेंडवड रस्त्याचे काम दर्जाहीन

March 20, 2026

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!