Monday, June 22, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

तारापुरच्या प्रदुषणाकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष

पालघर दर्पण by पालघर दर्पण
May 24, 2020
in जिल्हा, ताज्या बातम्या, राज्य
0
तारापुरच्या प्रदुषणाकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष
0
SHARES
77
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

प्रदुषणकारी मस्तावलेल्या उद्योजकांना शासनाच्या उदासीन धोरणामुळे मोकळीक; तारापुर बरोबरच महाराष्ट्रांचे प्रदुषणाबाबतीत देशात नावलौकिक
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
पालघर: प्रदुषणाच्या बाबतीत देशात नावलौकिक झाल्यानंतर तारापुरच्या प्रदुषणाकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. सर्वाधिक प्रदुषणाचा स्थर तारापुर मध्ये वाढल्याने येथील प्रदुषणकारी कारखान्यांवर निर्बंध लावण्यासाठी शासनाने कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना केलेली नाही. दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या प्रदूषणामुळे येथील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. असे असले तरी राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने तारापुर कडे पुर्णपणे दुर्लक्ष केल्याने तारापुरचे प्रदुषण सुरूच राहिले आहे.

तारापुर मधील प्रदुषणाला जबाबदार असलेल्या महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आजवर केलेल्या दुर्लक्षामुळे येथील प्रदुषणाचा स्थर वाढलेला आहे. यातच तारापुर मधील काही अति प्रदुषण करणारे उद्योजक येथील प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर आर्थिक वजन ठेवत आल्याने तारापुर देशातील सर्वाधिक प्रदुषणाचा भाग झाला आहे. गेल्या वर्षी तारापुर हे देशातील प्रदुषणकारी भाग असल्याचे जाहीर झाल्यानंतर एकाही यावेळीच्या पर्यावरण मंत्र्यांनी तारापुरची पाहणी देखील केली नव्हती. सुदैवाने यावेळी देखील पर्यावरण मंत्री पद शिवसेनेच्या युवराजांकडे असल्याने ते आता येथील प्रदुषणाकडे लक्ष देतील या भाबड्या आशेने असलेल्या तारापुर वासीयांचा भ्रमनिरास झाला आहे. यामुळे राज्यात सत्तेवर असलेली शिवसेना यावेळी तरी तारापुरच्या प्रदुषणाकडे लक्ष देईल का हे पाहणेच सोईचे ठरेल.

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

तारापुर औद्योगिक क्षेत्रात गेल्या वर्षभरापासून कारखाने बंद सुरू करण्याचा खेळ सुरूच आहे. एखाद्या कारखान्याला प्रदूषण केले म्हणून कारखाना बंद करण्याची नोटीस दिली जाते. त्यानंतर कारखान्याचे 72 तासाच्या नंतर विज व पाणी बंद करून कारखाना बंद केला जातो. मात्र याच वेळेत कारखानदार कायद्याची पळवाट शोधून बँकेची हमी देऊन एक-दोन दिवसातच आपले कारखाने पुन्हा सुरू करण्याचे आदेश प्रादेशिक अधिकारी ठाणे यांच्याकडून घेऊन येतात. यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने कितीही नोटीसा बजावण्याचा कांगावा केला असला तरी तारापुर मधील प्रदुषणाचा स्थर दिवसेंदिवस वाढलेलाच दिसतो. यातच अटीशर्तीवर कारखाने तात्पुरते सुरू करण्यासाठी जरी परवानगी दिली जात असली तर ज्या कारणांमुळे कारखाने बंद केले त्याबाबत उपाययोजना केली नसताना देखील कारखाने सुरू केले जात असल्याने उपाययोजना होईपर्यंत प्रदुषण सुरूच राहते.यामुळे प्रदुषणकारी घातक कारखान्यांवर ठोस कारवाई करण्याकडे पर्यावरण विभाग मोठमोठ्या उद्योजकांन कडे पाहुन प्रदुषणाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते.

⚫ तारापुर औद्योगिक क्षेत्रात बेकायदेशीर पणे विषारी वायु हवेत सोडणे, सांडपाणी प्रक्रिया न करताच नैसर्गिक नाल्यात सोडणे व क्षमतेपेक्षा लहान असलेले सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया क्रेंद्र यामुळे तारापुर भागातील नैसर्गिक नाले, खाडी, शेतजमीन व समुद्र संपूर्ण पणे प्रदुषित झाला आहे. यातच अस्वच्छ सांडपाणी वाहिन्या यामुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात रस्त्यावर रासायनिक सांडपाणी वाहत असल्याचे रोजच दिसुन येते.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
श्री सदस्यांनी राबविली स्वच्छता मोहीम बोईसर परिसर केला स्वच्छ

श्री सदस्यांनी राबविली स्वच्छता मोहीम बोईसर परिसर केला स्वच्छ

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

ड्रग्स माफिया निलेश सुर्वेला सोमवार पर्यंत पोलिस कोठडी

ड्रग्स माफिया निलेश सुर्वेला सोमवार पर्यंत पोलिस कोठडी

April 16, 2022
शिवकृपा सहकारी पतपेढीने केला महिलांचा सन्मान

शिवकृपा सहकारी पतपेढीने केला महिलांचा सन्मान

May 24, 2020
करोनामुळे मृत्यु पावलेल्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी; सर्वोच्च न्यायालय

करोनामुळे मृत्यु पावलेल्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी; सर्वोच्च न्यायालय

June 30, 2021
लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला दीड कोटींचा टप्पा

लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला दीड कोटींचा टप्पा

April 27, 2021

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.