पालघर दर्पण वार्ताहर
बोईसर: डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी बोईसर परिसर रस्ते, शासकीय कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवीली. या मोहिमेमध्ये 2 हजार 363 श्री सदस्य यांनी सहभाग घेतला.बोईसर परिसरातील सुमारे 31हजार चौरस मात्र क्षेत्रफळ व सुमारे 36 किलोमीटर लांबीचे शहरातील रस्ते पोलीस ठाणे , सरकारी कार्यालय, बस, स्थानके, रुग्णालय, हा परिसर स्वच्छ करण्यात आला. या स्वच्छता अभियान 21.24 टन ओला कचरा व 36.29 टन सुका कचरा डम्पिंगपर्यंत पोहचविण्यत आला .
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे एक सामाजिक सेवाभावी प्रतिष्ठान असून बालसंस्कार मार्गदर्शन, व स्त्री-पुरुष आध्यत्मिक समाजप्रबोधन सोबत सामाजिक व पर्यावरण संतुलन राखण्याच्या हेतून जनजागृती करण्याचे महत्वपूर्ण योगदान प्रतिष्ठान देत आहे. त्याचबरोबर उत्तम विचारांच्या माध्यमातून वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन , अंधश्रद्धा निर्मुलन आरोग्य शिबीर, प्रौढ साक्षरता, व्यसन निर्मूलन सामाजिक घटकांवर मार्गदर्शन हे प्रतिष्ठान देत आले आहे