Sunday, May 10, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

बोईसरच्या मुस्लिम तरूणांचे कुवेत मध्ये ब्रेन वॉश

पालघर दर्पण by पालघर दर्पण
February 11, 2023
in ताज्या बातम्या, देश
0
बोईसरच्या मुस्लिम तरूणांचे कुवेत मध्ये ब्रेन वॉश
0
SHARES
1.9k
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾ दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आलेला बोईसर मधील तरूण राष्ट्रीय तपास संस्था(एनआयए) व आयबी च्या ताब्यात

पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

बोईसर: शहरातील एक तरूणांचे थेट दहशतवादी संघटने सोबत संबंध आल्याच्या संशयावरून एका उच्चशिक्षित तरूणाला राष्ट्रीय तपास संस्था(एनआयए) व आयबी च्या टीमने शनिवारी सकाळी ताब्यात घेतले आहे. यातील एक तरूण कुवेत येथे काम करत असताना त्याचा संपर्क दहशतवादी संघटने सोबत झाला असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली होती. यातच यावेळी आणखी एकाला चौकशी साठी बोईसर मधुन ताब्यात घेतले होते.

राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) ने आयएसआय आणि अल कायदा या जागतिक आतंकवादी संघटनेसोबत संबंध असल्याच्या संशयावरून शनिवारी बंगळूरू आणि मुंबई येथे धाडसत्र सुरू केले होते. बोईसर शहरातील सोमनाथ पॅराडाईज येथे राहणारा हमराज शेख (वर २४) नावाचा उच्चशिक्षित मुस्लिम तरूण कुवेत येथे कामाला होता. यावेळी त्यांचा संपर्क दहशतवादी संघटने सोबत झाल्याची खात्रीशीर माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती. यातच या तरूणांचे कुवेत मध्ये ब्रेन वॉश देखील झाले असल्याची माहिती सूत्रांनी कडून प्राप्त झाली आहे. हमराज शेख हा तरूण बोईसर येथील सोमनाथ पॅराडाईज येथे कुटुंबा सोबत राहत होता. तसेच कुवेत वरून एक महिन्यापूर्वी तो बोईसर मध्ये आपल्या घरी आला होता. तसेच अवधनगर येथील एक इसम देखील त्यांच्या संपर्कात होता. राष्ट्रीय तपास संस्था(एनआयए) व आयबी च्या टीमने बोईसरच्या सोमनाथ पॅराडाईज येथून हमराज शेख यांने सकाळी नमाज केल्यानंतर ताब्यात घेतले. तसेच हमराज ला ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या संपर्कात असलेल्या आणखी एकाला ताब्यात घेतले असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.

राष्ट्रीय तपास संस्थेने संशयित तरूणांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना बोईसर पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते. यावेळी मोठी गुप्तता बाळगण्यात आली होती. तसेच दहशतवादी संघटने सोबत असलेले तरूणांचे संबंध याबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती केंद्रीय गुप्तचर विभागाकडून अद्यापही उघडपणे सांगण्यात आले नाही. हमराज ला शनिवारी सकाळी ८.३० वाजेच्या दरम्यान बोईसर अवधनगर येथील वडीलांच्या चप्पल दुकानात देखील नेण्यात आले होते. हमराज राहत असलेल्या सोमनाथ पॅराडाईज येथील घराची देखील पोलिसांनी तपासणी केली. संध्याकाळी ४ वाजेपर्यंत बोईसर पोलिस स्टेशनच्या बाहेर असलेल्या खोलीत त्याची चौकशी सुरू होती. त्याच्याकडून मोबाईल आणि लॅपटॉप ताब्यात घेण्यात आला असून त्याला अधिक चौकशीसाठी मुंबई येथे नेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

◾हमराज शेख चे कुटुंब हे ३० वर्षापासून बोईसर येथे राहत असून त्याच्या वडीलांचे अवधनगर येथे चप्पलांचे दुकान आहे. हमराजचे माध्यमिक शिक्षण चिन्मय स्कूल येथे तर १० वी ते १२ वी पर्यंतचे शिक्षण टीव्हीएम स्कूल बोईसर येथे झाले आहे. त्याने रुस्तमजी स्कूल डहाणू येथून हॉटेल मॅनेजमेंटची पदवी घेतली असून शिक्षणानंतर तो केरळ आणि सौदी अरेबिया येथे ३ वर्षे नोकरीसाठी गेला होता. मागील नोव्हेंबर महिन्यातच तो भारतात पतला होता.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?
जिल्हा

“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?

March 20, 2026
Next Post
जिजाऊचा आधारवड बोईसरकरांन साठी सामाजिक पर्याय!

जिजाऊचा आधारवड बोईसरकरांन साठी सामाजिक पर्याय!

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव येथील उड्डाणपूलाची मागणी

राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव येथील उड्डाणपूलाची मागणी

May 24, 2020
ग्रामीण भागात गाजतेय ‘आदिवासी राजाची’ धूम

ग्रामीण भागात गाजतेय ‘आदिवासी राजाची’ धूम

May 5, 2026
झाड कोसळल्याने अंगणवाडी जमिनदोस्त

झाड कोसळल्याने अंगणवाडी जमिनदोस्त

May 5, 2026
सिटी स्कँन सेंटर वरील लुट थांबवली

सिटी स्कँन सेंटर वरील लुट थांबवली

April 27, 2021

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!