◾ गलिच्छ राजकारणामुळे पिळवटून निघालेल्या नागरिकांना जिजाऊ संघटनेचा आधार
◾ हेमेंद्र पाटील
धार्मिक पिळावळ, विशिष्ट समाज, मोजके नेते व आपलेच वर्चस्व बोईसर मध्ये राहिल यासाठी सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणाऱ्या सर्वांना एकच चपराक बसली आहे. याचे कारण म्हणजे ग्रामीण भागात गरिबांना साठी धावुन जाणारी जिजाऊ संघटनेचा प्रसार बोईसर मध्ये जोमाने सुरू झाला आहे. काही दिवसांपूर्वी बोईसर मध्ये जिजाऊ चा झंझावात सुरू झाला एकाच दिवशी घेतलें अनेक कार्यक्रम राजकीय प्रस्थापितांना मनात धडकी भरविणारे आहे. जिजाऊ संघटनेच्या छत्रछायेखाली हजारोंच्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. यामध्ये युवा वर्ग व महिलांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात असल्याने येणाऱ्या काळात सामाजिक व राजकीय दृष्टीने जिजाऊ संघटनेचा दबदबा वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागांसह संपूर्ण कोकणात जिजाऊ संघटनेचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात नागरिकांच्या हाकेला धावून जाणारी संघटना म्हणून जिजाऊ संघटनेचा नावलौकिक वाढला आहे. संघटनेचे सर्वेसर्वा निलेश सांबरे यांनी जनसेवेचा घेतलेला वसा गोरगरीब जनतेला अतिशय उपयुक्त ठरला आहे. पालघर जिल्ह्यातील बोईसर या आदिवासी उपाययोजनेच्या शहरात गेल्या अनेक वर्षांपासून सत्ता उपभोगत असलेल्या सत्ताधारी यांनी नेमका कोणता विकास केला हा प्रश्न सर्वांना सतावत आहे. फक्त निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाकडे रस्ते व काही भागात दर्जाहीन गटारे बांधुन मतांचे राजकारण करण्यापलीकडे आजवर कोणीही लक्ष दिलेले नाही. नागरिकांना नेमके काय हवे आहे त्यांच्या काय समस्या याकडे पुर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. यातच आता बोईसरच्या रहिवाशांना जिजाऊ संघटनेचा आधार मिळाला असुन गेल्या दोन महिन्यातच शेकडो नागरिकांनी जिजाऊ संघटने कडे आपले मार्ग वळवला आहे. मतांच्या राजकारणासाठी नागरिकांना वेठीस धरणाऱ्या सत्ताधाऱ्यांना येणाऱ्या काळात तोडीसतोड उत्तर देण्यासाठी जिजाऊ संघटनेचे नवे चेहरे बोईसर मध्ये समोर आले असल्याने सत्ताधारी नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी आपले लक्ष बोईसर कडे वळवले असुन याठिकाणी संघटनेचे पदाधिकारी देखील नेमले आहेत. शिवसेनेचे बोईसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक उमेदवारी मिळेल यासाठी प्रयत्न करत असलेले डॉ. विश्वास वळवी यांच्या सोबत असलेले व आताच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी यांना घाम फोडणारे नरेश धोंडी यांनी निवडणूक नंतर अचानक जिजाऊ संघटनेत प्रवेश केल्याने चर्चेला उधाण आले होते. बोईसरच्या दांडी पाडा भागात राहत असलेल्या नरेश यांच्या कडे युवकांना सोबतच स्थानिक लोकांचा पाठींबा देखील चांगलाच आहे. यातच बोईसरचे सरपंच दिलीप धोंडी यांच्या सोबत देखील नरेश यांनी सुत जुळले असल्याने आता खऱ्या अर्थाने राजकीय खेळीची सुरूवात झालेली दिसून येते. जिजाऊ संघटनेचे मिळालेले बळ समाज उपयोगी कामासाठी नरेश यांनी वापरले तर येणाऱ्या काळात जिजाऊ संघटने मुळे बोईसर मधील सत्ता समीकरणात बदल झालेला दिसून येईल शकतो. संघटनेचे सर्वेसर्वा निलेश सांबरे नियोजनबद्ध पद्धतीने संघटनेचे कामकाज करत असल्याने बोईसरच्या गलिच्छ राजकारणात नागरीकांना नवा पर्याय जिजाऊ संघटनेचा उपलब्ध झाला आहे.