Monday, May 25, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

महामार्गाच्या दुरवस्थे विरोधात श्रमजीवी संघटना रस्त्यावर

पालघर दर्पण by पालघर दर्पण
September 7, 2021
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
महामार्गाच्या दुरवस्थे विरोधात श्रमजीवी संघटना रस्त्यावर
0
SHARES
282
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾महामार्गावर चौदा ठिकाणी रस्ता रोको; महामार्गवरील खड्डे आणि वाहतूक कोंडी विरोधात आंदोलन

पालघर दर्पण: वार्ताहर

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

पालघर: मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या दुरावस्थे विरोधात श्रमजीवी मंगळवारी संघटनेने महामार्ग रोखून धरला होता.महामार्गाएकाच वेळी चौदा ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.खड्डे आणि सततच्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक आणि प्रवाश्यांना होणाऱ्या गैरसोय होत आहे.रस्त्याच्या दुरावस्थे कडे महामार्गाची ठेकेदार कंपनी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत आयडियल रोड बिल्डर कंपनी विरोधात श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडित यांच्या आदेशाने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत प्रतिकात्मक पद्धतीने काही वेळ महामार्ग रोखण्यात आला होता.कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मुंबई अहमदाबाद महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने महामार्गाची दुरवस्था झाली आहे. महामार्गावर वर्सोवा ब्रिजलगत,ससू नवघर,मालजी पाडा नवीन उड्डाणपूलावर तसेच चिंचोटी भागात महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.दिवसेंदिवस वाहतूक कोंडीत वाढ होत असल्याने वाहनचालक आणि प्रवाश्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.निर्बंधांमुळे लोकल ट्रेन मधून प्रवास न करू शकणाऱ्या चाकरमान्यांनाही वाहतूक कोंडीचा त्रास होत असून नोकरीच्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर होत आहे. नेहमीच्या वाहतूक कोंडी मुळे अतिरिक्त इंधन जळत असल्याने व्यावसायिक माल वाहतूकदारांचे आर्थिक नुकसान होत असल्याच्या तक्रारी श्रमजीवी संघटनेला प्राप्त झाल्या होत्या.त्यामुळे गुरुवारी (ता.02) आयडियल रोड बिल्डर विरोधात श्रमजीवी संघटनेकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.

मंगळवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास पालघर तालुक्यातील वरई फाटा, जव्हार फाटा, चिल्हार फाटा आणि बऱ्हाणपूर फाट्यावर श्रमजीवी संघटनेकडून आंदोलन करण्यात आले.जव्हार फाटा येथे दहा मिनिटे महामार्गावरील वाहतूक आंदोलन कर्त्यांना रोखून धरली होती.यावेळी आयडियल रोड बिल्डर विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.पोलिसांच्या विनंतीनुसार आंदोलन कर्ते रस्त्यावरून हटले आणि मनोर जव्हार रस्त्यावर ठाण मांडून बसले होते.श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चिल्हार फाटा येथे उड्डाणपूलाखाली एक मार्गिका अडवली होती.याठिकाणी गाणी आणि घोषणाबाजी केली जात होती. वरई फाटा येथे वरई पारगाव रस्ता काही वेळ आंदोलन कर्त्यांनी अडवला होता.

दरम्यान श्रमजीवी संघटनेच्या आंदोलनाची दखल घेत आयडियल रोड बिल्डरचे अधिकारी,पोलीस आणि श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सोमवारी सायंकाळी बैठक पार पडली.बैठकीत आयडियल रोड बिल्डरच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ महामार्गावर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात सांगितले होते.

मंगळवारी दुपारी महामार्गावरील मालजी पाड्याजवळच्या पठार येथे संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा,सरचिटणीस विजय जाधव यांची आयडियल रोड बिल्डरच्या अधिकाऱ्यांनी भेट घेत चर्चा केली.महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू असून गणेशोत्सव सुरू होण्याआधी महामार्गावरील खड्डे बुजवण्यात येतील असे आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.

आयडियल रोड बिल्डरच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या यशस्वी चर्चेनंतर दुपारी एक वाजताच्या सुमारास आंदोलन मागे घेण्यात आले. तलासरी तालुक्यातील आंदोलनाचे नेतृत्व श्रमजीवी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड यांनी केले,तर पालघर तालुक्याच्या हद्दीतील आंदोलन श्रमजीवी संघटनेचे तालुका अध्यक्ष दिनेश पवार,नरेश वरठा यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

■वसई तालुक्यात ससूनवघर, चिंचोटी, शिरसाड, पेल्हार, सकवार, खनिवडे टोल नाका, पालघर तालुक्यातील वरई फाटा, मस्तान नाका,चिल्हार फाटा, सोमटा,डहाणू तालुक्यात चारोटी टोल नाका तलासरी तालुक्यात दापचरी,आमगाव आणि आच्छाड फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

◾महामार्गवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. मालजी पाडा उड्डाणपूलावर पाउस थांबल्या नंतर डांबराचा नवीन थर टाकण्यात येणार आहे.वर्सोवा ब्रिजच्या सुरुवातीचा रस्ता नवीन पूल तयार करणाऱ्या वी.एम.सी या कंत्राटदाराकडे आहे.त्यांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा कडून दुरुस्ती बाबत सुचना देण्यात आल्या आहेत.
— प्रवीण भिंगारे, जनसंपर्क अधिकारी, आयडियल रोड बिल्डर.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
गणपतीला गावी जाणाऱ्या गाडीचा अपघात

गणपतीला गावी जाणाऱ्या गाडीचा अपघात

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

रुग्णालय व्यवस्थापकावर हात उचलणे आले अंगलट!

रुग्णालय व्यवस्थापकावर हात उचलणे आले अंगलट!

May 9, 2021
पालघर जिल्ह्यात दिसणार एकनाथांचा करिष्मा!

पालघर जिल्ह्यात दिसणार एकनाथांचा करिष्मा!

July 6, 2022
वाड्यात ग्रामीण रुग्णालयात रुग्णाची संख्या वाढली

वाड्यात ग्रामीण रुग्णालयात रुग्णाची संख्या वाढली

January 16, 2021
बावडा तलाव घोटाळ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी धुतले हात

बावडा तलाव घोटाळ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी धुतले हात

March 24, 2025

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!