Wednesday, June 17, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

पालघर जिल्हा पुन्हा कुपोषणाच्या विळख्यात

पालघर दर्पण by पालघर दर्पण
July 6, 2021
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
पालघर जिल्हा पुन्हा कुपोषणाच्या विळख्यात
0
SHARES
168
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾दोन महिन्यात 40 बालमृत्यू तर 5 मातामृत्यू; मातामृत्यूची संख्या वाढली

पालघर दर्पण: प्रतिनिधी

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

पालघर: करोनाकाळात जिल्ह्यातील कुपोषणग्रस्त भागात अंगणवाड्या, ग्राम बाल विकास केंद्रे,आरोग्य व्यवस्था आदींवर प्रशासनाने हवा तसा भर न दिल्यामुळे पालघर जिल्ह्यात पुन्हा एकदा कुपोषण फोफावले आहे. कुपोषणासह बालमृत्यू व
मातामृत्युच्याही विळख्यात जिल्हा सापडत चालला आहे. जिल्ह्यात आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या एप्रिल, मे या दोन महिन्यातच पाच मातामृत्यूची नोंद झाली तर 40 बालमृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीच्या याच दोन महिन्यांच्या तुलनेत दोन मातामृत्यू ची वाढ झाली असल्याने आरोग्य विभाग चिंतेत आहे.

पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये जव्हार, मोखाडा, डहाणू तलासरी व वाडा अशा भागांमध्ये कुपोषणाबरोबरीने बालमृत्यूचे प्रमाण लक्षणीय आहे. गेल्या वर्षी पालघर जिल्ह्यात 296 बालमृत्यू तर बारा मातामृत्यूची नोंद झाली होती. यंदा आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच पाच माता मृत्यूची व 40 बालमृत्यूची नोंद झाल्यामुळे जिल्हा कुपोषणाच्या खाईत अडकून पडला आहे. माता मृत्यूचे प्रमाण वाढत असल्यामुळे जिल्ह्यासाठी ही चिंतेची बाब असल्याचे सांगितले जात आहे.

करोना काळात जिल्हा परिषदेमार्फत गरोदर माता व बालकांना गृहभेटी देऊन सकस व पोषण आहार देण्यात आल्यानंतर ही कुपोषणाचा आकडा कमी का होत नाही हा संशोधनाचा विषय असल्याचे सांगितले जात आहे. पालघर जिल्ह्यामध्ये कमी वजनाच्या बाळांचे मृत्यू होण्याचे प्रमाण मोठे आहे. याचबरोबरीने श्वास गुदमरणे आदी कारणामुळेही अनेक बालकांचा मृत्यू झाला आहे. अल्पवयीन वयात लग्न करणे, गरोदर पणात आरोग्याची जनजागृती नसल्यामुळे मातामृत्यू होत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून होत आहे.

ठाणे जिल्ह्यापासून पालघर जिल्ह्याचे स्वतंत्र विभाजन झाल्याच्या सहा वर्षांनंतरही कुपोषणाची समस्या जैसे थेच आहे. प्रशासन कोट्यावधीचा निधी कुपोषण निर्मूलनासाठी खर्च करत असेल तर कुपोषण कमी का होत नाही असे प्रश्न विविध स्तरातून उपस्थित केले जात आहेत. जिल्ह्याला मातामृत्यूसह बालमृत्यूची समस्या भेडसावत असली तरी अति तीव्र कुपोषित बालके व तीव्र कुपोषित बालकांच्या वाढत्या आकडेवारीमुळे ही समस्या अधिक जटील बनत आहे. पालघर जिल्ह्यात एकट्या एप्रिल महिन्यात 146 अति तीव्र कुपोषित तर 1609 तीव्र कुपोषित बालके आढळून आली आहेत. मे महिन्यात यामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. या महिन्यामध्ये 139 अतितीव्र तर 1679 अतितीव्र बालके आढळली आहे.

पावसाळा सुरू झाल्यानंतर अति तीव्र कुपोषित, तीव्र कुपोषित, मातामृत्यू ,बालमृत्यूचा आलेख वाढतच जात असतो, याचे नेमके कारण शोधण्यासाठी प्रशासनाला अपयश आले आहे. हे दरवर्षी होत असते. स्थलांतर हे यामागचे मोठे कारण असून गेल्या दोन वर्षात प्रशासकीय यंत्रणा करोनाच्या नियोजनात असल्याने कुपोषणाकडे दुर्लक्ष झाल्याने ही आकडेवारी वाढली असल्याचे यंत्रणेने म्हटले आहे. मातामृत्यू,बालमृत्यू व कुपोषण थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासनासमोर आव्हान आहे.

◾बालमृत्यू वर्षनिहाय

15-16 – 565
16-17 – 557
17-18 – 469
18-19 – 348
19-20 – 303
20-21 – 296
21-22 – 40 (एप्रिल-मे)

◾एप्रिल व मे दोन महिन्यातील बालमृत्यू व मातामृत्यू

तालुका बालमृत्यू मातामृत्यू
मोखाडा 1 —
जव्हार 12 3
विक्रमगड 6 —
वाडा 3 —
पालघर 5 —
तलासरी 2 1
डहाणू 9 —
वसई 2 1
एकूण 40 5

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
वाड्यात स्मशान भुमीचा रस्त्यावरच कचरा भूमी

वाड्यात स्मशान भुमीचा रस्त्यावरच कचरा भूमी

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

नागझरीत मातीचे बेकायदा उत्खनन

नागझरीत मातीचे बेकायदा उत्खनन

May 26, 2020
मनोर परिसरात मोहर्रम साधेपणाने साजरा.

मनोर परिसरात मोहर्रम साधेपणाने साजरा.

September 1, 2020
बोईसर चिल्लार रस्त्यांच्या रखडलेल्या कामाकडे दुर्लक्षच

बोईसर चिल्लार रस्त्यांच्या रखडलेल्या कामाकडे दुर्लक्षच

April 12, 2021
नालासोपाऱ्यात धोकादायक इमारतींना जमीनदोस्त करण्याचे काम सुरू

नालासोपाऱ्यात धोकादायक इमारतींना जमीनदोस्त करण्याचे काम सुरू

May 5, 2026

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.