Thursday, July 9, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

डहाणू तालुक्यातील फटाके कारखान्याला आग

पालघर दर्पण by पालघर दर्पण
June 17, 2021
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
डहाणू तालुक्यातील फटाके कारखान्याला आग
0
SHARES
156
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

■ १० ते १५ किमी पर्यतच्या परिसरात फटाक्यांच्या आवाजाने हादरे बसले; देहणे येथे घरांचे नुकसान

पालघर दर्पण, प्रतिनिधी

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

पालघर: डहाणू तालुक्यात डेहणे पळे येथील एका फटाके कारखान्याला आग लागली असल्याची घटना गुरुवारी सकाळी १०च्या दरम्यान घडली आहे. या आगीत फटाके कारखाना संपूर्ण जळून गेला असून कारखान्यात काम करत असणारे १० कामगार जखमी आहेत. १० कामगारांपैकी ५ कामगार गंभीर जखमी आहेत. कारखान्यात लागलेली आग विजवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ४ गाड्या पाचारण करण्यात आल्या.

डहाणू तालुक्यात डेहणे पळे येथे विशाल फटका कारखान्याला वेल्डिंगच्या कामामुळे आग लागली. दिवाळी निमित्त काही दिवसांपूर्वीच कंटेनर भरून फटाके साठा आणण्यात आला होता. तसेच किरकोळ फटाके बनवण्याचे काम सुरू असताना सोमवारी वेल्डिंगचे काम करत असताना त्याची ठिणगी फटाके साठ्यावर उडाली फटाक्यांना आग लागताच काही क्षणातच आगीने भीषण रुप धारण केले. या कारखान्यात ४५ कामगार काम करीत होते. आगीची चाहूल लागताच कारखाना मालकासह कामगार बाहेर पळाले. मात्र आगीमध्ये ५ जण कामगार गंभीर जखमी असुन जखमींना डहाणू उपजिल्हा रुग्णालयात व सेवा नर्सिंग होम या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

फटाके पेटल्याने आसपासच्या ५ ते १० किलोमीटर पर्यत राहणाऱ्या नागरिकांना फटाके फुटण्याचे आवाज आले. सुरुवातीला नागरिकांमध्ये हे भूकंपाचे धक्के आहेत असा समज झाला. मात्र आगीने भीषण रूप धारण केल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. फटाके फुटण्याच्या मोठं मोठ्या आवाजामुळे आगवण, देदाळे, डेहणे, पळे, आशागड, डहाणू शहर, वाणगाव, साखरे व कासा चारोटी परिसरात हादरे बसले. यादरम्यान डेहणे येथे अनेक घरांचे नुकसान झाले आहे.

■ डहाणू कारखाना आग दुर्घटना ५ गंभीर जखमी. त्यातील ४  डहाणू येथील दवाखान्यात आणि १ वापी गुजरात ला पाठवण्यात आले आहेत.
१) नवनीत लोटे (वय ३२)

२) महेश मोरे (वय ४०)

३) असिफ खान (वय ३२)

४) प्रेमचंद चव्हाण (वय २५)

५) सुखदेव सिंग (वय ५०)

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
पालघर जिल्हा पुन्हा तिसऱ्या स्तरात

पालघर जिल्हा पुन्हा तिसऱ्या स्तरात

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

महामार्गावर सीएनजी इंधनावर धावणाऱ्या कारला आग

महामार्गावर सीएनजी इंधनावर धावणाऱ्या कारला आग

April 13, 2026
रस्त्यावर पडलेल्या पैशांमुळे नागरीक भयभीत!

रस्त्यावर पडलेल्या पैशांमुळे नागरीक भयभीत!

May 5, 2026
डहाणू तालुक्यातील फटाके कारखान्याला आग

डहाणू तालुक्यातील फटाके कारखान्याला आग

June 17, 2021
गुगल मॅप वरून महाराष्ट्र मधील गावे गुजरात हद्दीत

गुगल मॅप वरून महाराष्ट्र मधील गावे गुजरात हद्दीत

April 13, 2026

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.