Thursday, October 8, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

आषाढी वारीसाठी नियमावली जाहीर

पालघर दर्पण by पालघर दर्पण
June 15, 2021
in ताज्या बातम्या, राज्य
0
आषाढी वारीसाठी नियमावली जाहीर
0
SHARES
150
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

■देहू व आळंदी येथील प्रस्थान प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी.

पालघर दर्पण, प्रतिनिधी

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

मुंबई : यंदा मानाच्या दहा पालखी सोहळ्यांच्या आषाढी वारी सोहळ्यास परवानगी देण्यात आली आहे. यावर्षी देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० व उर्वरीत आठ सोहळ्यासाठी प्रत्येकी ५० वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल असे आपत्ती व्यवस्थापन तसेच मदत व पुनर्वसन विभागाने स्पष्ट केले आहे. याबाबत पंढरपूर येथील आषाढी वारीसंदर्भातील नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

यंदाच्या आषाढी वारीचे आयोजन करताना कोविड-१९ च्या प्रतिबंधासाठी केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घ्यावी असे आपत्ती व्यवस्थापन तसेच मदत व पुनर्वसन विभागाने नियमावलीत नमूद केले आहे. मानाच्या पालखी सोहळ्यांना पायी वारी प्रस्थान ठिकाणापासून विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोहोचल्यानंतर तेथून पंढरपूरकडे १.५ किमी. अंतर प्रातिनिधिक स्वरूपात पायीवारी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

सर्व मानाच्या पालखी सोहळ्यांचे पंढरपूरमध्ये दशमीच्या दिवशी आगमन होऊन पैार्णिमेच्या दिवशी प्रस्थान करण्यास मान्यता देण्यात आली आहे. शासकीय महापूजा व विठ्ठल संतांच्या भेटीस गेल्यावर्षी प्रमाणे मान्यता देण्यात आली आहे. तर ‘श्रीं’चे नित्योपचार परंपरेनुसार सुरू ठेवून आषाढी यात्रा कालावधीमध्ये भाविकांसाठी दर्शन बंद ठेवण्यात येईल. तर संत भानुदास महाराज यांच्या पुण्यतिथीसाठी २+२ असे एकूण चार व्यक्तींच्या उपस्थितीत सध्या पद्धतीने साजरा करण्यास व श्रीविठ्ठलाच्या पादुकांची मिरवणूक १-१५ व्यक्तीसह साध्या पद्धतीने साजरी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ह.भ.प. गुरुदास महाराज देगलूरकरांचे चक्रीभवनसाठी ह.भ.प. देगलूकर महाराज व अन्य चार व्यक्ती असे एकूण पाच व्यक्तींना वैद्यकीय तपासणीच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे. ह.भ.प. अंमळनेरकर व ह.भ.प. कुकुरमुंडेकर महाराज यांचे सोबत प्रत्येकी दोन व्यक्तींना वैद्यकीय तपासणीच्या अटींच्या अधीन राहून परवानगी देण्यात येत आहे.

महाद्वार काला उत्सवासाठी व श्री.संत नामदेव महाराज समाधी सोहळा १+१० व्यक्तीसह सामाजिक अंतर राखून व योग्य ती खबरदारी घेऊन साजरा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. एकादशीच्या दिवशींच्या रथोत्सवासाठी रथाऐवजी मंदिराच्या स्वतंत्र वाहनाने १० मानकरी व मंदिर समितीचे पाच कर्मचारी असे १५ व्यक्तींसह सामाजिक अंतर राखून व योग्य ती खबरदारी घेऊन साजरा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. वारकरी संख्येच्या निकषानुसार संतांच्या पादुका भेटीसाठी मानाच्या पालखीसाठी ४० वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. यावर्षी दोन बस व प्रत्येकी बसमध्ये २० प्रमाणे ४० संख्या निश्चित केली आहे. गोपाळकालासाठी मानाच्या पालखी सोहळयाला १+१० या प्रमाणात गोपाळपूर येथे भजन व कीर्तनास परवानगी देण्यात आली आहे. संताचे नैवेद्य व पादुकासाठी यावर्षी दशमी ते पैार्णिमा असे ६ दिवस २ व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. श्रीविठ्ठलाची प्रक्षाळपूजा समिती सदस्य यांच्या हस्ते सपत्नीक २+३ श्री रूक्मीणी मातेची प्रक्षाळपूजा २+३, श्रीविठ्ठलाकडे ११ पुजाऱ्यांकडून श्रीस रूद्राचा अभिषेक व श्री रूक्म‍िणिमातेस ११ पुजाऱ्यांकडून पवनमान अभिषेक करण्यास परवानगी देण्यात आली आहे

आषाढी एकादशी दिवशी २० जुलै २०२१ रोजी स्थानिक महाराज अशा 195 मंडळींना श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे मुखदर्शन घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत त्यांना वेळ व प्रवेशपत्रिका देण्याबाबतची कार्यवाही मंदिर समितीने करावयाची आहे. यासोबतच गेल्यावर्षी मंदीर खुले करण्याबाबत जी स्थिती होती तीच कायम राहील. तसेच या सोहळ्यासाठी आयोजनाबाबत एखादी बाब राहून गेल्यास त्या बाबी संदर्भात मागील वर्षी जो निर्णय घेण्यात आला होता तोच निर्णय यंदाही घेण्यात यावा असे आपत्ती व्यवस्थापन तसेच मदत व पुनर्वसन विभागाने काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
बेकायदेशीर घातक रसायन वाहतूक करणारे वाहन ताब्यात

बेकायदेशीर घातक रसायन वाहतूक करणारे वाहन ताब्यात

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्राचा कर्नाटकव्याप्त प्रदेश पुन्हा राज्यात आणणारच; मुख्यमंत्री ठाकरे

महाराष्ट्राचा कर्नाटकव्याप्त प्रदेश पुन्हा राज्यात आणणारच; मुख्यमंत्री ठाकरे

January 27, 2021
केळवे समुद्र किनाऱ्याची धूप रोखण्यासाठी अभिनय उपक्रम

केळवे समुद्र किनाऱ्याची धूप रोखण्यासाठी अभिनय उपक्रम

August 7, 2021
कोरोना रुग्णाच्या संख्येत बोईसरमध्ये वाढ!

कोरोना रुग्णाच्या संख्येत बोईसरमध्ये वाढ!

May 24, 2020
अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचा ३४ वा वर्धापनदिन

अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचा ३४ वा वर्धापनदिन

July 23, 2021

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.