Sunday, August 23, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचा ३४ वा वर्धापनदिन

पालघर दर्पण by पालघर दर्पण
July 23, 2021
in ताज्या बातम्या, राज्य
0
अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचा ३४ वा वर्धापनदिन
0
SHARES
422
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अन्नछत्र मंडळाचा वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा उत्सव साधेपणाने होणार साजरा

पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

अक्कलकोट: देश-विदेशात अन्नदान सेवेत अग्रगण्य असलेल्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट या न्यासाचा यंदाचा ३४ वा वर्धापन दिन आणि श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त संपन्न होणारे धर्मसंकिर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम हे कोरोना राष्ट्रीय आपत्तीमुळे रद्द करण्यात आल्याची माहिती न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी दिली आहे.

कोरोनाच्या राष्ट्रीय आपत्तीमुळे २०२० या वर्षाचा न्यासाचा वर्धापन दिन व श्री गुरुपौर्णिमा उत्सव इ. संपन्न होणारे १० दिवसाचे धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. यंदाही २०२१ या वर्षी कोरोनाचा प्रादूर्भाव कमी न झाल्याने जनजीवन ठप्प आहे.यास्तव यावर्षीचा ३४ वा वर्धापन दिन आणि श्री गुरुपौर्णिमा उत्सव काळातील १० दिवसांचे धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम पूर्णपणे रद्द करून ३४ वा वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा उत्सव कसलाही डामडौल न करता कोरोना विषाणूचा संसर्ग व गर्दी टाळणेसाठी साधेपणाने साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुपौर्णिमा दिवशी श्रींची नित्योपचार पूजा व महानैवेद्य अर्पण करण्यात येणार आहे.

न्यासाच्यावतीने गेल्या २१ वर्षापासून धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदाचे २२ वे वर्ष आहे. दरम्यान न्यासाचे स्वामी भक्तांसाठी अन्नदानाचे स्वामीकार्य कोरोना विषाणुच्या राष्ट्रीय आपत्तीमुळे गेल्या पाच महिन्यापासून थांबले आहे. या महामारीमुळे अन्नदान सेवा तात्पुरती स्थगित आहे. येथे सेवा करणारे ३०० सेवेकरी आहेत. जरी अन्नदानाचे कार्य थांबले असले तरी न्यासाच्या उद्देशाप्रमाणे, सामाजिक, आरोग्य विषयक, पर्यावरणपूरक, जलसंधारण, महिला सक्षमीकरण, वृक्षारोपण-संवर्धन, आपत्ती व्यवस्थापन मदतकार्य आदी उपक्रम चालु आहेत.

या कोवीड-१९ ला हरविण्यासाठी वैद्यकीय उपचारासाठी वैद्यकीय साधन सामुग्री स्वच्छतेसाठी लागणारे साधनसामुग्री आदींची मदत हे न्यास सातत्याने करीत आहे. नागरिकांना मास्क, सॅनिटाझरचे वाटप करण्यात येत आहे. अक्कलकोट येथील दोन कोविड सेंटर्स येथील रुग्णांना दररोज सलग ४ महिने अल्पोपहाराचे वाटप केले आहे. लॉकडाऊन कालावधीत सलग ५५ दिवस शहरामध्ये गरीब,निराधार व गरजूंना दैनंदिन जेवण वाटप करण्याचे अन्नदानाचे कार्य न्यासाने केले आहे. जवळपास ६० हजार गरजूंना लाभ झाला आहे. तालुक्यात ज्यांना जेवण पोच करता येत नव्हते अशा गरजूंना ग्रामीण भागात जाऊन १५ ते २० दिवस पुरेल इतके अन्नधान्य शिधा किटचे वाटप केले. १ हजार २०० कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप केले आहे. तसेच पुण्यातील व सोलापुरात ५०० गरजू व कलाकारांना अन्नधान्य किटचे वाटप केले आहे. कोरोना विषाणू संदर्भात न्यासाच्या वतीने गेल्या वर्षी यात्रीनिवासमध्ये कोविड केअर सेंटर ६ महिने सुरु होते. या वर्षी सुद्धा मार्च २०२१ पासून यात्रीनिवास येथे कोविड केअर सेंटर चालू आहे. न्यासाचे वतीने कोविड केअर सेंटर मधील रुग्णांना चहा, नाष्टा व जेवण पुरविण्यात आले. त्याचप्रमाणे शहर व खेडेगवात निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करण्यात येत आहे. वैद्यकीय मदत व सेवा पुरविण्यात येत आहे. २६ मार्च पासून अन्नदान सेवा, तात्पुरती स्थगित असून महाप्रसाद गृह, यात्रीभुवन, यात्रीनिवास, निवासी व्यवस्था पुर्णपणे बंद आहे. परगावच्या भाविकांनी सदर उत्सवास न येता आपल्या घरातच स्वामी पूजा आराधाना करावी असे आवाहन मंडळाच्यावतीने न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांनी केले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धर्मसंकिर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करुन श्री गुरुपौर्णिमा व वर्धापन दिनाचा कार्यक्रम साधेपणाने साजरे करणेबाबतचा अन्नछत्र मंडळाने निर्णय घेतला आहे, याची सर्व भाविकांनी कृपया नोंद घ्यावी असे आवाहन संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांनी केले आहे.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
शेल्टे बंधारा प्रकरणी अभियंता निलंबित

शेल्टे बंधारा प्रकरणी अभियंता निलंबित

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

नार्वे देशात नागरिकांना मिळणार मोफत करोना लस

नार्वे देशात नागरिकांना मिळणार मोफत करोना लस

October 15, 2020
दृष्टीक्षेपात पालघर जिल्हा

दृष्टीक्षेपात पालघर जिल्हा

May 24, 2020
महामार्गावर बर्निग कारचा थरार

महामार्गावर बर्निग कारचा थरार

April 13, 2026
शरद पवारांनी केल्या मोदींवर टीका

शरद पवारांनी केल्या मोदींवर टीका

March 7, 2021

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.