Thursday, April 9, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

कामगारच निघाले रेमडेसिविर चोर

पालघर दर्पण by पालघर दर्पण
May 25, 2021
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
रेमडेेसिवीरच्या उपलब्धतेबाबत अन्न व औषधमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली माहिती
0
SHARES
475
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾ कमला लाईफ साईन्सेस कारखान्यातील रेमडेसिविर चोरणाऱ्या तिघांवर नाशिक पोलिसांची कारवाई नंतर प्रकार उघडकीस; समाजमाध्यमातून मात्र देशाला रेमडेसिविर पुरवठा करणाऱ्या कारखान्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न

पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी

हे पण वाचा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

बोईसर: करोनामध्ये अतिशय महत्त्वाच्या ठरलेल्या रेमडेसिविर औषधांची कारखान्यातुन चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तारापूर मधील रेमडेसिविर उत्पादन घेणाऱ्या कारखान्यातुन कामगारांनीच हा चोरीचा प्रकार केला असून नाशिक पोलिसांनी केलेल्या कारवाई मध्ये हे उघड झाले आहे. रेमडेसिविर ची काळाबाजारी करताना नाशिक मध्ये पोलिसांनी काहींना ताब्यात घेतले होते. मात्र आता समाजमाध्यमांवर कारखान्यांचे नाव बदनाम करण्याचा जोरदार प्रयत्न केला जात असल्याने याबाबत सविस्तर पत्रक कारखान्याकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.

नाशिक पंचवटी भागात रेमडेसिविर चढ्या दराने विक्री करत असल्याच्या आरोपाखाली तीन तरुणी व एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले होते. त्यावेळी दोन इंजेक्शन जप्त केले होते. नाशिक आडगाव पोलिस ठाण्यात अन्न व औषध प्रशासनाने गुन्हा दाखल केल्यानंतर बुधवारी 19 मे रोजी आडगाव पोलिसांनी यातील मुख्य आरोपी सिद्धेश पाटील याला पालघर तालुक्यातील उमरोळी येथील राहत्या घरातून अटक करण्यात आली होती. यावेळी त्यांच्या घरातून 63 व्हायल्स जप्त केले असून त्यातील 62 व्हायल्स वरती कंपनीचे कोणत्याही प्रकारचे कंपनीचे लेबल नसल्याचे समोर आले होते. सिद्धेश पाटील यांने रेमडेसिविर हे कमला लाईफ साईन्सेस या काम करत असलेल्या कारखान्यातुन चोरले असल्याचे पोलिस तपासणी मध्ये समोर आले. त्यानंतर मात्र समाजमाध्यमांवर जोरदार रेमडेसिविर चर्चा सुरू होऊन कारखान्यांच्या काही लोक यामध्ये सहभागी असल्याचे संदेश फिरू लागले होते. यातच कारखाना मालका विषयी देखील उलटसुलट चर्चा समाजमाध्यमांवर केली जात होती. मात्र या सर्व चर्चेला कंपनी व्यवस्थापकांनी पुर्णविराम लावला असून याबाबतचे प्रसिद्ध पत्रक कारखान्याकडून जाहीर करण्यात आले आहे.

करोना रुग्णांना अतिशय महत्त्वाच्या असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शन चा तुटवडा राज्यासह देशभरात भासला होता. सुरूवातीला औषध विक्रेत्यांनी चढ्या भावाने याची विक्री देखील केली होती. तारापूर मधील कमला लाईफ सायन्सेस या औषध निर्मिती कारखान्यांत रेमडेसिविर उत्पादन सुरू झाल्यानंतर राज्या बरोबरच देशातील रेमडेसिविर चा तुटवडा हळूहळू कमी झाला. दिवसरात्र याठिकाणी कामगार काम करून अधिक उत्पादन घेण्याचे प्रयत्न करत होते. मात्र यातीलच एक दोन कामगारांनी अतिशय हुशारीने काही रेमडेसिविर ची चोरी करून त्याची बेकायदेशीर पणे विक्री केल्याचा प्रकार नाशिक पोलिसांनी उघडकीस आणल्यानंतर पालघर मध्ये या औषध निर्मिती करणाऱ्या कारखान्यांची बदनामी सुरू करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे अशाप्रकारे चोरी केल्या प्रकरणी दोषींना कठोर कारवाई व्हावी अशी मागणी अनेक स्थरावरून केली जात आहे. कारखान्याकडून पोलिसांना सर्व कागदपत्रे सह तपास कामात संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे कारखान्या व्यवस्थापना कडून सांगण्यात आले आहे.

आजच शेअर करा

Related Posts

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

March 20, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?
जिल्हा

“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?

March 20, 2026
वाढवण पोर्टकडून स्थानिकांसाठी स्वतंत्र रस्ता
जिल्हा

वाढवण पोर्टकडून स्थानिकांसाठी स्वतंत्र रस्ता

July 29, 2025
Next Post
छुप्या सुरू असलेल्या सलून मध्ये चार बेशुद्ध !

छुप्या सुरू असलेल्या सलून मध्ये चार बेशुद्ध !

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

March 20, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

February 25, 2021
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

अमरावतीत एका शेतकऱ्याची आत्महत्या

अमरावतीत एका शेतकऱ्याची आत्महत्या

December 23, 2020
पालघर जिल्हा पुन्हा तिसऱ्या स्तरात

पालघर जिल्हा पुन्हा तिसऱ्या स्तरात

June 19, 2021
नालासोपाऱ्यात धोकादायक इमारतींना जमीनदोस्त करण्याचे काम सुरू

नालासोपाऱ्यात धोकादायक इमारतींना जमीनदोस्त करण्याचे काम सुरू

September 4, 2020
रिक्त पदांची माहिती संकलित करण्याचे निर्देश

रिक्त पदांची माहिती संकलित करण्याचे निर्देश

July 7, 2021

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
  • वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!