Wednesday, June 3, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

रस्ता रुंदीकरणात बेसुमार वृक्ष तोड

पालघर दर्पण by पालघर दर्पण
January 2, 2021
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
रस्ता रुंदीकरणात बेसुमार वृक्ष तोड
0
SHARES
360
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾ वनविभागाच्या संगनमताने ठेकेदारांने तोडलेली वृक्ष केली लंपास; तोडलेल्या वृक्षांचा पंचनामा न करताच हजारो टन लाकुड गायब

पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

बोईसर: रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली बेसुमार वृक्ष तोडून लाकूड लंपास करण्याचा प्रकार बोईसर मध्ये घडला आहे. येथील बोईसर-तारापूर रस्त्यांच्या रूंदीकरणासाठी वनविभागाने वृक्ष तोडण्याची परवानगी दिली होती. मात्र मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणात आड न येणाऱ्या वृक्षांची देखील कत्तल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही वृक्ष तोडताना व तोडल्यानंतर वनविभागाने याचा पंचनामा देखील केला नसुन तोडण्यात आलेली वृक्ष परस्पर ठेकेदारांने लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बोईसर- तारापूर मुख्य रस्त्यांचे रुंदीकरणाचे काम राष्ट्रीय रस्ते विकास प्रकल्पाअंतर्गत सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी काही भागात रस्त्यांचे रुंदीकरणात आडवी येणाऱ्या झाडांना तोडण्यासाठी वनविभागाने परवानगी दिली होती. मात्र ठेकेदारांने बेसुमार पणे वृक्षतोड सुरू केली असून रस्त्यांच्या मध्ये अडथळा नसलेल्या झाडांची कत्तल देखील करण्यात आली आहे. चित्रालय भागात दुसऱ्या बाजूने रस्ता रुंदीकरण करण्यासाठी जागा असताना देखील 70 ते 80 वर्षे जुने असलेल्या वटवृक्षांवर घाव घालण्यात आला. यातच पास्थळ येथील देखील याठिकाणी असलेल्या मोठ्या वृक्षांचा रस्त्यामध्ये अडथळा नसताना देखील वृक्षतोड केल्याने वृक्ष प्रेमींन कडून संताप व्यक्त केला जात आहे. यातच परवानगी च्या नावाखाली बेसुमार वृक्ष तोड करणाऱ्या ठेकेरावर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांन सोबत संगनमत करून ही बेसुमार वृक्ष तोड केल्याचा आरोप वृक्ष प्रेमींन कडून केला जात आहे.

रस्त्यांच्या बांधकामात अडथळा निर्माण करणाऱ्या वृक्षांची तोड करण्यासाठी वनविभागाने परवानगी दिली होती. यानुसार रस्त्यांचे सिमांकन करून मध्ये येणारी वृक्षांची संख्या व कोणते वृक्ष कापायचे हे ठरवणे गरजेचे असताना वनविभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. यातच कापलेल्या वृक्षांचे पंचनामा करून त्यावर वनविभागाची मोहर लावून ती लाकडे वनविभाग आपल्या ताब्यात घेते. मात्र हे सर्व नियम धुडकावून कापलेली हजारो टन वृक्षांची लागडे परस्पर ठेकेदारांने गायब केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत दोन दिवसापासून वनविभागाच्या अधिकाऱ्यांंन कडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना याबाबत अधिकृतपणे प्रतिक्रिया देता आली नाही. यामुळे वृक्षांची बेकायदेशीर पणे वाहतूक करून लंपास केलेल्या लाकडात वनविभागाची भुमिका संशयास्पद असल्याचे दिसून आले आहे. यामुळे या वृक्षतोड प्रकरणाची चौकशी करून आवश्यकता नसताना देखील ठेकेराला फायदा होईल अशा प्रकारे वृक्षतोड सुरू असताना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांनवर कारवाई करण्याची मागणी वृक्षप्रेमींन कडून केली जात आहे.

◾ बोईसर तारापूर मुख्य रस्त्यावर तोडण्यात आलेल्या वृक्षांच्या बदल्यात त्याठिकाणी झाडे लावण्याचे बंधनकारक असताना देखील त्याकडे दुर्लक्ष ठेकेराने केल्याचे दिसून येते. याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराने त्याठिकाणी वृक्षारोपण केल्याचा दावा केला जात असला तरी याठिकाणी नवीन लावण्यात आलेली वृक्ष कुठेही दिसून येत नाहीत.

◾ रस्त्यांचे रुंदीकरणात आड येणारी वृक्ष कापण्यात आली असली तरी याभागात रस्त्याच्या कडेला असलेली अतिक्रमणे काढण्यात आलेली नाही. याभागातील एका बाजूला असलेली अतिक्रमणे काढली असती तरी शेकडो वृक्षांची कत्तल वाचवता आली असती.

◾वनविभागा कडे तोडलेल्या वृक्षांची लाकडे ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने बोईसर तारापूर रस्त्यावरील तोडलेली वृक्ष ठेकेराने आपल्या कडे ठेवली आहेत. ही लाकडे ताब्यात घेवून सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत त्याला लिलाव केला जाईल.
— निलेश मोरे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनविभाग डहाणू

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
दहशदवादी लखवीला अटक

दहशदवादी लखवीला अटक

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

आर्थिकदृष्ट्या भक्कम ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभाराकडे दुर्लक्ष

आर्थिकदृष्ट्या भक्कम ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभाराकडे दुर्लक्ष

November 5, 2020
बोईसरमध्ये शासनाचे नियम पाळून दत्त जयंती साजरी

बोईसरमध्ये शासनाचे नियम पाळून दत्त जयंती साजरी

December 30, 2020
६३ हजार ८४२ करोना रुग्ण बरे

६३ हजार ८४२ करोना रुग्ण बरे

May 6, 2021
palghar darpan

पालघरमध्ये प्रशासकीय विभागात ७५% पदे रिक्त!

May 24, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.