Sunday, August 23, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

31 डिसेंबरच्या धांगडधिंग्याला हिंदू जनजागृती समितीचा विरोध

पालघर दर्पण by पालघर दर्पण
December 28, 2020
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
31 डिसेंबरच्या धांगडधिंग्याला हिंदू जनजागृती समितीचा विरोध
0
SHARES
86
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

नववर्षारंभाच्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदू जनजागृती समितीने दिले बोईसर व पालघर पोलिसांना निवेदन

पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

पालघर: नववर्षारंभाच्या नावाखाली ३१ डिसेंबरच्या रात्री केेल्या जाणाऱ्या धांगडधिंग्याला हिंदू जनजागृती समितीचा विरोध करत त्यासाठी बोईसर व पालघर पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे. नववर्षाचे स्वागत करताना मोठ्या प्रमाणात धूम्रपान, मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन केले जात असल्याने अशा बाबींवर प्रतिबंध करण्याचा आदेश काढावा अशी मागणी हिंदू जनजागृती समिती कडून पोलीस विभागाला करण्यात आली आहे.

हिंदू जनजागृती समितीने दिलेल्या निवेदनात पार्टी मध्ये रात्री मद्यपान करून भरधाव वाहने चालवल्याने अपघातही होत आहेत. गंभीर बाब म्हणजे या रात्रीपासून मद्य पिण्यास आरंभ करणार्‍या युवापिढीचे प्रमाण लक्षणीय असून यामध्ये अल्पवयीन मुले आणि महिला यांचाही समावेश आहे. रात्रभर मोठ्या आवाजाचे फटाके उडवून प्रदूषण करणे, तसेच कर्णकर्कश ध्वनीवर्धक लावणे, बीभत्स गाण्यांच्या तालावर अश्लील अंगविक्षेप करून नाचणे, शिवीगाळ करणे, मुलींची छेडछाड-विनयभंग-बलात्कार आदी कुकृृत्ये करून एकूणच कायदा अन् सुव्यवस्था यांच्या दृष्टीने गंभीर स्थिती निर्माण होत आहे. त्याचा अतिरिक्त ताण पोलीस आणि प्रशासन यांवर येतो. यासाठी ३१ डिसेंबरच्या दिवशी पालघर जिल्ह्यातील किल्ले, पर्यटनस्थळे, ऐतिहासिक आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे, धूम्रपान करणे आणि पार्ट्या करणे यांस प्रतिबंध करण्याचा आदेश काढावा तसेच या ठिकाणी पोलिस दलाचे नियोजन करण्याची मागणी करणारी निवेदने हिंदू जनजागृती समितीच्या वतीने पालघर जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कार्यालय, पालघर जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय आणि बोईसर पोलिस ठाणे येथे देण्यात आली.

यंदाच्या वर्षी कोरोना महामारीने सर्वत्र कहर केला आहे. अनेक तज्ञ कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवत आहे. अशा वेळी ३१ डिसेंबरला पार्ट्यांच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यताही अधिक आहे. या काळात सार्वजनिक आरोग्य धोक्यात घालणे परवडणारे नाही. त्यामुळे ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी किंवा ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने होणार्‍या सर्व प्रकारच्या सार्वजनिक साजरीकरणावर बंदी घालावी, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.

नववर्ष ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नव्हे; तर गुढीपाडव्याला साजरे करण्याचे ऑनलाईन व्याख्याने आणि धर्मशिक्षणवर्गांतून हिंदूंना आवाहन

हिंदू बांधवांनी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नव्हे; हिंदु संस्कृतीनुसार नववर्ष हे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला साजरे करावे ! असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने या आठवड्यात घेण्यात आलेली व्याख्याने आणि साप्ताहिक धर्मशिक्षणवर्गांतून करण्यात आले. या ऑनलाईत कार्यक्रमांतून पालघर जिल्ह्यातील शेकडो लोकांमध्ये जागृती करण्यात आली. १ जानेवारी खरेतर ख्रिस्ती नववर्षाचा आरंभ आहे. आजमितीला जगभरात ख्रिस्ती राष्ट्रे बहुसंख्य असल्याने आणि या राष्ट्रांनी जगातील बहुसंख्य देशांवर आपले अधिपत्य गाजवल्याने तेथील संस्कृतीचा पगडा जगभर पहायला मिळतो. त्यामुळे ‘१ जानेवारी हे जागतिक नववर्ष आहे’, असा अपसमज निर्माण झाला आहे; भारतीय संस्कृतीनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याला नववर्षारंभ साजरा करणे हे नैसर्गिक, ऐतिहासिक, आध्यात्मिक या सर्वच दृष्टीने श्रेयस्कर आणि फायदेशीर आहे.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
मराठी पत्रकार परिषदेची पालघर जिल्हा कार्यकारिणी जाहीर

मराठी पत्रकार परिषदेची पालघर जिल्हा कार्यकारिणी जाहीर

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

परतीच्या पावसाचा जोर; कांदा महागला

परतीच्या पावसाचा जोर; कांदा महागला

October 22, 2020
प्रदुषणकारी रामदेव केमीकल कारखान्यावर प्रशासन मेहरबान!

प्रदुषणकारी रामदेव केमीकल कारखान्यावर प्रशासन मेहरबान!

May 24, 2020
153 वर्षे जुना ब्रिटिश कालीन पूल तोडण्यास सुरुवात

153 वर्षे जुना ब्रिटिश कालीन पूल तोडण्यास सुरुवात

November 20, 2020
महाराष्ट्राचा कर्नाटकव्याप्त प्रदेश पुन्हा राज्यात आणणारच; मुख्यमंत्री ठाकरे

महाराष्ट्राचा कर्नाटकव्याप्त प्रदेश पुन्हा राज्यात आणणारच; मुख्यमंत्री ठाकरे

January 27, 2021

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.