Monday, May 25, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

ब्रेक दि चेन : आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे

पालघर दर्पण by पालघर दर्पण
April 10, 2021
in ताज्या बातम्या, राज्य
0
ब्रेक दि चेन : आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे
0
SHARES
78
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

■काय राहणार सुरू काय असणार बंद; नागरिकांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे.

पालघर दर्पण, प्रतिनिधी

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

मुंबई : राज्यात फेब्रुवारी २०२१ पर्यंत परिस्थिती ठीक झाली होती परंतू कोरोनाचा नवा विषाणु असा आहे जो वेगाने पसरतो. त्याला थांबवायचे असेल तर काही कडक निर्बंध आवश्यकच असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. राज्य शासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ब्रेक दि चेन अंतर्गत विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. या आदेशाच्या अनुषंगाने लोकांच्या मनातील शंकांचे निरसन करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने माहिती प्रसिद्ध केली आहे.

■ब्रेक द चेन आदेशा अनुषंगाने नागरिकांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे

१. डी मार्ट, रिलायंस, बिग बाजार सारखे मॉल्स उघडे राहणार का ?

४. आणि ५ एप्रिल रोजी राज्य शासनाने निर्बंधांबाबत आदेश काढले आहेत. जी दुकाने, मॉल्स यातील आवश्यक / जीवनावश्यक वस्तू विक्री करीत आहेत ते सुपर मार्केट्स, मॉल्स सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरु राहू शकतील. आवश्यक नसलेल्या वस्तूंचे विभाग बंद राहतील

२. आठवड्याच्या शेवटच्या दिवशीच्या (विकेंड) लॉकडाऊनमध्ये काय सुरु राहील आणि काय बंद ?

ब्रेक दि चेनच्या आदेशात म्हटल्याप्रमाणे आवश्यक सेवा सुरु राहतील. कोणताही व्यक्ती योग्य कारणांशिवाय फिरू शकणार नाही. ही कारणे आदेशात नमूद आहेत.

३. आठवड्याच्या शेवटच्या दिवशीच्या (विकेंड) लॉकडाऊमध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरु राहतील काय ?

कोविडसंदर्भातील सर्व आरोग्याचे नियम पाळून सुरु राहू शकतील. मात्र नियमांचे पालन होत नाही हे लक्षात आले तर स्थानिक राज्य शासनाची परवानगी घेऊन बाजार बंद करू शकतात. स्थानिक प्रशासनाने यासंदर्भात काटेकोर लक्ष ठेवणे अपेक्षित आहे.

४. बांधकाम दुकाने उघडी राहतील का ?

बांधकाम साहित्याची दुकाने बंद राहतील.

५. वाहनांची दुरुस्ती करणारे गॅरेजेस, ऑटोमोबाईल दुकाने उघडी राहतील का ?

वाहतूक सुरु असल्याने दुरुस्ती करणारी गॅरेजेस सुरु राहू शकतील. मात्र, त्यांनी कोविडविषयक आरोग्याच्या नियमांचे पालन करायचे आहे. याच्याशी संबंधित दुकाने मात्र बंद राहतील. कोविड नियम न पाळणारी गॅरेजेस कोविड संसर्ग असेपर्यंत बंद ठेवण्यात येतील.

६. केंद्रीय कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापना (पीएसयू) आवश्यक सेवा म्हणून संबोधता येतील का ?

नाही. सर्व केंद्रीय कर्मचारी आणि पीएसयू हे आवश्यक सेवेत येत नाहीत. आवश्यक सेवेत समाविष्ट असणारेच केंद्र शासनाचे विभाग किंवा सार्वजनिक क्षेत्रातील या सेवेतील समजले जातील.

७. नागरिक मद्य खरेदी करू शकतात का ?

हो. नागरिक हे ४ एप्रिल रोजी उपाहारगृहे आणि बारसाठी काढलेल्या आदेशाप्रमाणे निर्धारित वेळेत बारमधून टेक अवे पद्धतीने किंवा होमडिलिव्हरीने मद्य खरेदी करू शकतात.

८. मद्यविक्री दुकान सुरु राहू शकतील का ? होम डिलिव्हरी होऊ शकेल का ?

नाही.

९. रस्त्याकडेचा ढाबा सुरु राहू शकतो का ?

हो. पण उपाहारगृहांप्रमाणेच बसून जेवण करण्यास परवानगी नाही. पार्सल नेऊ शकतात.

१०. इलेक्ट्रिक उपकरणांची दुकाने (एसी, फ्रीज इत्यादी) सुरु राहू शकतील का?

नाही.

११. दूरसंचारशी सबंधित (डेस्कटॉप, मोबाईल इत्यादी) सुरु राहू शकतील ?

नाही.

१२. आपले सरकार, सेतू केंद्रे सुरु राहू शकतील ?

हो. आठवड्याच्या दिवशी (विक डेज) सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहू शकतात.

१३. आठवड्याच्या शेवटी रात्री ८ नंतर किंवा सकाळी ७ च्या आत उपाहारगृहे होम डिलिव्हरी करू शकतात का ?

आठवड्याच्या नियमित दिवशी ग्राहक उपाहारगृहांतून सकाळी ७ ते रात्री ८ यावेळेत पार्सल घेऊन जाऊ शकतात. या निर्धारित वेळेनंतर तसेच आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत (विकेंड) ग्राहक पार्सल घेऊ शकणार नाही. मात्र ई कॉमर्समार्फत तसेच उपहारगृहातून होम डिलिव्हरीमार्फत खाद्यपदार्थ मागवता येईल.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
कर्मचाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी बरोबर ॲन्टीजन चाचणीचा पर्याय

कर्मचाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी बरोबर ॲन्टीजन चाचणीचा पर्याय

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

दृष्टीक्षेपात पालघर जिल्हा

दृष्टीक्षेपात पालघर जिल्हा

May 24, 2020
फसवणूक करणाऱ्या युवासेनेच्या पिंपळेला वाचवण्यासाठी नेते हतबल

फसवणूक करणाऱ्या युवासेनेच्या पिंपळेला वाचवण्यासाठी नेते हतबल

December 20, 2021
पर्यावरण दिन साजरा करताना देशातील सर्वात प्रदुषणकारी तारापुर कडे सरकारने लक्ष द्यावे

पर्यावरण दिन साजरा करताना देशातील सर्वात प्रदुषणकारी तारापुर कडे सरकारने लक्ष द्यावे

May 5, 2026
यंत्रणा माखली तारापुरच्या रासायनिक प्रदूषणात!

यंत्रणा माखली तारापुरच्या रासायनिक प्रदूषणात!

April 13, 2026

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!