Tuesday, May 5, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

मानवजन्माचे सार्थक करण्याचा उपदेश करणारे संत नामदेव यांचे अभंग

पालघर दर्पण by पालघर दर्पण
November 25, 2020
in ताज्या बातम्या, राज्य
0
मानवजन्माचे सार्थक करण्याचा उपदेश करणारे संत नामदेव यांचे अभंग
0
SHARES
899
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

श्रीविठ्ठलाची अनन्यसाधारण भक्ती करणारे भक्तशिरोमणि संत नामदेव महाराज ! खूप लहान असतांना संत नामदेव यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले ‘आज तू देवाला प्रसाद दाखव. त्या दिवशी नामदेवांनी नुसता नैवेद्य दाखविला नाही, तर देवापुढे वाट बघत बसले की, केव्हा हा खाईल ! बाल नामदेवाच्या भोळ्या भावाला प्रसन्न होऊन प्रत्यक्ष विठ्ठल त्यांच्यासमोर प्रगट झाले आणि नामदेवांनी दिलेला प्रसाद त्यांनी भक्षण केला. ‘नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग’, या ओवीतून संत नामदेव यांच्या भक्तीभावाचा स्तर लक्षात येतो. एकदा एका कुत्र्याने पोळी पळवली. त्याला ती कोरडी खावी लागू नये, म्हणून संत नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन त्याच्यामागे गेले. सतत ईश्‍वराच्या अनुसंधानात असणार्‍या संत नामदेवांना त्या कुत्र्यातही विठ्ठलाचे दर्शन झाले होते.

संत नामदेव महाराजांनी जीवनभर भगवंताच्या नामाचा प्रसार केला. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले. संत नामदेवांचे अनुमाने २५०० अभंग असलेली अभंगगाथा प्रसिद्ध आहे. त्यांनी हिंदी भाषेत काही अभंगरचना (अनुमाने १२५ पदे) केली. त्यातील साधारण ६२ अभंग ‘नामदेवजी की मुखबानी’ या शीख पंथाच्या ‘गुरुग्रंथ साहेब’मध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत. संत नामदेवांना मराठी भाषेतील पहिले आत्मचरित्रकार आणि चरित्रकार मानले जाते. संत नामदेवांनी आदि, समाधी आणि तीर्थावळी या गाथेतील तीन अध्यायांतून संत ज्ञानेश्‍वर यांचे चरित्र सांगितले आहे.

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

शेवटिली पाळी तेव्हां मनुष्य जन्म । चुकलीया वर्म फेरा पडे ॥१॥
एक जन्मीं ओळखी करा आत्मारामा । संसार सुगम भोगूं नका ॥२॥

संसारीं असावें असोनि नसावें । कीर्तन करावें वेळोवेळां ॥३॥
नामा म्हणे विठो भक्ताचिये द्वारीं । घेऊनियां करीं सुदर्शन ॥४॥

भावार्थ : ८४ लक्ष योनींनंतर जिवाला मनुष्यजन्म मिळतो, पण त्या वेळी चुका झाल्या की, पुन्हा फेरा पडतो. त्यामुळे या जन्मातच आत्मारामाची (ईश्‍वराची) ओळख करून घ्या ! संसारात रमण्यापेक्षा त्यात असूनही नसावे आणि सतत नामजप करावा. भक्ताच्या द्वारी त्याचा उद्धार करण्यासाठी विठ्ठल उभाच आहे.

दाही दिशा मना धांवसीं तूं सईरा । न चुकती येरझारा कल्पकोटी ॥१॥
विठोबाचे नामीं दृढ धरीं भाव । तेर सांडीं वाव मृगजळ ॥२॥

भक्तिमुक्ति सिद्धि जोडोनियां कर । करिति निरंतर वळगणें ॥३॥
नामा म्हणे मना धरीं तूं विश्‍वास । मग गर्भवास नहे तुज ॥४॥

भावार्थ : हे मना, जरी तू दाही दिशा धावलास, तरी जन्म-मृत्यूचे फेरे काळाच्या अंतीही तुला सुटणार नाहीत. विठ्ठलाच्या नामावर दृढ श्रद्धा ठेव ! हेच नाम संसाररूपी मृगजळ नष्ट करून भक्ती, मुक्ती आणि सिद्धी हे निरंतर तुझ्यापुढे हात जोडून उभ्या रहातील. तू विश्‍वास ठेव, मग तुला गर्भवास (पुनर्जन्म) नाही.

संत नामदेवांनी समाधी घेतलेली पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात नामदेव पायरी आहे. आपला अहं कधीच वाढू नये, म्हणून संत नामदेव भगवंताच्या चरणीच विलीन झाले.

संकलक : सौ. नयना भगत, प्रवक्ता, सनातन संस्था

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
तुळशी विवाह

तुळशी विवाह

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

तारापुरच्या केमिकल माफियांना आवर घालणार कोण

तारापुरच्या केमिकल माफियांना आवर घालणार कोण

July 7, 2020
पालघर जिल्ह्यात शिक्षकांच्या बेकायदेशीर नियुक्त्या!

पालघर जिल्ह्यात शिक्षकांच्या बेकायदेशीर नियुक्त्या!

May 24, 2020
बोईसरमध्ये एका दिवसात दोन चोऱ्या

बोईसरमध्ये एका दिवसात दोन चोऱ्या

May 18, 2022
पालघर जिल्ह्यातील विकास कामात संस्कृती व परंपरांचे जतन करावे– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पालघर जिल्ह्यातील विकास कामात संस्कृती व परंपरांचे जतन करावे– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

April 13, 2026

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!