Wednesday, June 17, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

तारापुरची विषारी हवा

पालघर दर्पण by पालघर दर्पण
November 2, 2020
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
तारापुरची विषारी हवा
0
SHARES
131
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾ भरदिवसा होणाऱ्या वायू प्रदूषणाकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष; विराजच्या वायू प्रदूषणामुळे परिसरातील नागरिक हैराण

पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यातून सोडल्या जाणाऱ्या विषारी वायूमुळे औद्योगिक क्षेत्रात आणि परिसरातील गावांमध्ये वायुप्रदूषणाचा स्तर वाढला आहे. राष्ट्रीय हरित लवादाची कारखान्यांवर कारवाईची टांगती तलवार असताना देखील याचे कोणतेही भय प्रदूषणकारी कारखान्यांना उरलेले नाही. परिणामी तारापूर मध्ये नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून वायूप्रदूषणाचा सामाना रोजच करावा लागत आहे. मात्र भरदिवसा सुरू असलेल्या वायू प्रदूषणाकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते.

बोईसर परिसरात दिवस असो किंवा रात्र शुध्द हवा कधीच मिळत नाही. कधी रस्त्यावर उडणारी धुळ तर रात्रीच्या वेळी हवेत पसरलेला रासायनिक वायू याचा त्रास नागरिकांना करावा लागतो. मात्र आता भरदिवसा देखील वायू प्रदूषण पाहायला मिळत आहे. येथील विराज प्रोफाईल या स्ट्रील उद्योग कारखान्यातुन रोज मोठ्या प्रमाणात लालसर असलेला धुर सोडला जात असल्याने सभोवताली परिसरात मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे. लोखंडावर प्रक्रिया करताना हा निघणारा रासायनिक व धुळीकण असलेला वायू संपूर्ण परिसरात पसरला जातो. रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना देखील याचा त्रास होत असताना देखील त्याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांन कडून वारंवार केला जात आहे.

कारखान्यातून निघणाऱ्या धुरामुळे वायुप्रदूषण होऊ नये यासाठी स्क्रबर सिस्टमचा वापर करणे आवश्यक असते. परंतु ही प्रक्रिया खर्चीक असल्याने कारखान्यांकडून तिचा वापर केला जात नाही. यामुळे तारापूर औद्योगिक परिसरातील बोईसर, सरावली, कोलवडे, कुंभवली, पाम, पास्थळ व सालवड या गावांतील रहिवाशांना रात्रीच्या वेळी होणाऱ्या वायुप्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे येथील रहिवार आरोग्यांच्या अनेक समस्या भेडसावत आहेत. नियमांचे उल्लंघन करून रासायनिक वायूचे उत्सर्जन करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी जोरधरू लागली आहे. विराज प्रोफाइल कारखान्याला याअगोदर देखील अनेकदा नोटीसा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावल्या असून कारखान्यात स्क्रबर सिस्टम उभारण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. मात्र कारखानदाराकडून प्रदूषणाबाबत उपकरणे बसविण्यासाठी दुर्लक्ष केले जात असून मोठ्या प्रमाणात कारखान्यांचे वायू प्रदूषण सुरूच आहे.

◾ काय उपाययोजना करणे अपेक्षित

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कार्यालयावर असलेले प्रदूषणमापक यंत्र अनेक वर्षांपासून बंद असून याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष झालेले आहे. औद्योगिक क्षेत्रातील काही रासायनिक कारखान्यांमध्ये रात्रीच्या वेळी उत्पादने घेतली जातात. याचवेळी घातक अशा प्रक्रिया केल्या जात असल्याने त्यातून निघणारे विषारी वायू रात्रीच्या वेळी हवेमध्ये सोडले जातात. कारखान्यातून सोडला जाणारा विषारी वायू याबाबत प्रदूषणमापक यंत्र रासायनिक प्रदूषण असलेल्या भागात बसवणे अपेक्षित आहे. यामुळे कोणत्याही भागात सर्वात जास्त प्रदूषण आहे याबाबत प्रदूषणाचा स्थर समजू शकतो.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
धरणात बुडून तरुणाचा बुडून मृत्यू

धरणात बुडून तरुणाचा बुडून मृत्यू

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

सराईत गुन्हेगारांनी टाकला शिवसेना कार्यालयात दरोडा!

सराईत गुन्हेगारांनी टाकला शिवसेना कार्यालयात दरोडा!

October 21, 2022
प्रेमविवाहाला कुटुंबीयांचा नकार, जोडप्यांनी केली आत्महत्या

प्रेमविवाहाला कुटुंबीयांचा नकार, जोडप्यांनी केली आत्महत्या

January 25, 2021
विराज प्रोफाइल विरोधात वाड्यात मोर्चेबांधणी

विराज प्रोफाइल विरोधात वाड्यात मोर्चेबांधणी

April 13, 2026
महामार्गावर उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत लाखोंचा मद्यसाठा जप्त

महामार्गावर उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत लाखोंचा मद्यसाठा जप्त

December 12, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.