Thursday, June 18, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

पालघरच्या कृषी संशोधन केंद्रात शास्त्रज्ञांच्या खुर्च्या रिकाम्या

पालघर दर्पण by पालघर दर्पण
October 20, 2020
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
पालघरच्या कृषी संशोधन केंद्रात शास्त्रज्ञांच्या खुर्च्या रिकाम्या
0
SHARES
787
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾ तक्रारींचे निवारण होत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

पालघर दर्पण: रमेश पाटील

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

वाडा: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी संशोधन केंद्र पालघर हे एकमेव शासकीय कृषी संशोधन केंद्र पालघर जिल्ह्यात कार्यरत आहे. येथे कृषी संशोधन आणि विस्ताराचे कार्य चालते. मात्र पालघर जिल्हा अस्तित्वात आल्यापासून गेल्या सहा वर्षांत या ठिकाणी शेतपिकांवरील किडरोग उपाय योजना करण्यासाठी तसेच नवनवीन पिकांच्या जाती विकसित करण्यासाठी या संशोधन केंद्रात शास्रज्ञच नाहीत. यामुळे येथील कृषी संशोधन केंद्र रिकाम्या खुर्च्यांचे कार्यालय बनले आहे.

शेतकऱ्यांना बियाणे पुरविणे, शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करणे, पिकावरील कीड आणि रोगांबद्दल मार्गदर्शन करणे, त्यांच्या बियाण्याबाबतीत तक्रारींचे निवारण करणे इत्यादी कामे कृषी संशोधन केंद्र कार्यालयातून केली जातात. मात्र गेल्या सहा वर्षांपासून पालघर येथील संशोधन केंद्रावर भात पैदासकार, वनस्पती रोग शास्त्रज्ञ, चारसुत्री पीक शास्त्रज्ञ इत्यादी महत्वाच्या शास्त्रज्ञांची पदे रिक्त आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भात आणि इतर पिकांबाबतच्या भेसळ आणि किडरोग याबाबतच्या तक्रारींचे योग्य ते निवारण होत नाही. पालघर जिल्ह्यात भात हे एकमेव पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या पिकासाठी बाहेरुन आलेले हायब्रीड महागडे वाणांचे बियाणे शेतकरी खरेदी करतात. मात्र येथील शेतकऱ्यांसाठी कुठलेही स्थानिक नवीन भाताच्या वाणांचे संशोधन झालेले नाही.

पालघर जिल्ह्यातील मुख्य पीक भात असल्याने आणि आधीच भातशेती तोट्यात असल्याने शेतकरी कठीण परिस्थिती कर्ज घेऊन विविध बियाणे निर्मात्या कंपन्यांकडून बियाणे खरेदी करतो. हे बियाणे शेतात लावल्यानंतर पिकातील भेसळ, निकृष्ठ उगवण, कीड आणि रोग यांचा प्रादुर्भाव होऊन पिकाचे नुकसान होते. त्यावेळी हे शेतकरी कृषी विभागाकडे तक्रार करतात. त्यानंतर त्या तक्रारींच्य अनुषंगाने कृषि विभाग, पंचायत समिती आणि कृषी संशोधन केंद्र पालघर येथील संबंधित शास्त्रज्ञ यांची समिती तयार करून शेतकऱ्यांच्या शेतावर त्या पिकाची तपासणी केली जाते. परंतु कृषी संशोधन केंद्र पालघरकडे मागील सहा वर्षांपासून संबंधित विषयातील विषय तज्ञ उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारींचे योग्य ते निवारण होत नाही.

शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण होत नसल्याने झालेल्या नुकसानीचा योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना मिळत नाही. पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी संशोधन केंद्राने वा-यावर सोडल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये कृषी संशोधन केंद्र पालघर आणि डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ यांच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान शेतीबाबत समृद्ध असणाऱ्या पालघर जिल्ह्यात भात, चिकू, नारळ व भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. येथील शेतीला अधिक फायदेशीर ठरावे यासाठी जिल्ह्यात कृषी महाविद्यालय उभारण्याची आवश्यकता असल्याने तशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. राज्य सरकारमध्ये कृषिमंत्री म्हणून कार्यरत असणारे दादा भुसे यांच्याकडेच पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री पद आहे. त्यामुळे त्यांनी या मागणीचा विचार करून पालघर जिल्ह्यासाठी कृषी महाविद्यालय मंजूर करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. तसेच येथील विविध विभागांतील कृषी शास्त्रज्ञ ही रिक्त पदे भरण्यात यावीत अशी मागणी येथील शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
देवीची ओटी कशी भरावी ?

देवीची ओटी कशी भरावी ?

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

मुंबईत स्टंट करणाऱ्या तरुणाला अटक.

मुंबईत स्टंट करणाऱ्या तरुणाला अटक.

October 16, 2020
पास्थळ मध्ये अनधिकृत बांधकामात तेजीत!

पास्थळ मध्ये अनधिकृत बांधकामात तेजीत!

January 30, 2022
कृषी संजीवनी प्रकल्पाच्या पोर्टलचे लोकार्पण

कृषी संजीवनी प्रकल्पाच्या पोर्टलचे लोकार्पण

June 4, 2021
महामार्गावरील धाब्यावर माफिया राज उघड

महामार्गावरील धाब्यावर माफिया राज उघड

December 16, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.