Saturday, June 14, 2025
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

देवीची ओटी कशी भरावी ?

पालघर दर्पण by पालघर दर्पण
October 20, 2020
in ताज्या बातम्या, राज्य
0
देवीची ओटी कशी भरावी ?
0
SHARES
2k
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

खण-नारळाने देवीची ओटी भरणे, हा देवीच्या दर्शनाच्या वेळी करावयाचा एक प्रमुख उपचार आहे. हा उपचार शास्त्र समजून अन् भावपूर्ण केला, तर त्याचा आध्यात्मिक लाभ अधिक प्रमाणात भाविकाला होतो. सनातन संस्थेद्वारा संकलित लेखातील पुढील ज्ञान (माहिती) वाचून देवीची ओटी योग्यरित्या भरून पूजकांनी देवीची कृपा संपादन करावी !

१. देवीची ओटी भरण्याचे महत्त्व काय ?
‘देवीपूजनाची सांगता देवीची ओटी भरून (खण आणि साडी अर्पण करून) करणे, म्हणजे देवीच्या निर्गुण तत्त्वाला आपल्या आध्यात्मिक उन्नतीचे वा कल्याणाचे कार्य करण्यासाठी सगुणात येण्यास आवाहन करणे होय. देवीला खण आणि साडी अर्पण करतांना देवीला प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रार्थना केल्याने त्या आधी केलेल्या पंचोपचार विधीतून कार्यरत झालेल्या देवीच्या निर्गुण तत्त्वाला साडी आणि खण यांच्या रूपाने मूर्त सगुण रूपात साकार होण्यास साहाय्य होते.’

हे पण वाचा

घिवली गावाचा सरपंच बनावट…

गडचिंचले नंतर बदनाम झालेला पालघर नव्या वाटेवर..

२. देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत
अ. ‘देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी; कारण देवतेकडून येणार्‍या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक असते.

आ. एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण, नारळ आणि थोडे तांदूळ ठेवावेत. नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी. नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील, अशा पद्धतीने देवीसमोर उभे रहावे.

इ. ‘देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी’, अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी. यामुळे देवीतत्त्व जागृत होण्यास साहाय्य होते.

ई. ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ वहावेत.

उ. देवीला अर्पण केलेली साडी शक्य असल्यास परिधान करावी, तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे.

३. विशिष्ट देवीला विशिष्ट रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्याने काय लाभ होतो ?

‘त्या त्या देवीला तिचे तत्त्व जास्तीतजास्त आणि लवकर आकृष्ट करून घेणार्‍या रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्याने त्या त्या देवीचे तत्त्व जिवासाठी अल्प कालावधीत कार्यरत होते. पुढील सारणीत काही देवींची नावे आणि त्या देवींचे तत्त्व जास्तीतजास्त अन् लवकर आकृष्ट करणारे रंग (त्या त्या देवीच्या तत्त्वाशी संबंधित रंग) दिले आहेत.

४. देवीला सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी अर्पण करणे अधिक योग्य का ठरते ?
देवीला नऊवारी साडी अर्पण करणे, हे पूजा करणार्‍याच्या आवश्यकतेप्रमाणे देवीने नऊ रूपांच्या माध्यमातून कार्य करण्याचे प्रतीक असणे
देवतेप्रती भाव असणार्‍या आणि गुरुकृपायोगाप्रमाणे समष्टी साधना करणार्‍या पूजकाने त्याच्या भावानुसार देवीला कोणत्याही प्रकारची साडी अर्पण केली, तरी चालू शकते; कारण त्याच्या भावामुळे अपेक्षित फळाचा लाभ त्याला होतोच. मात्र प्राथमिक टप्प्याच्या साधकाची किंवा कर्मकांडाप्रमाणे साधना करणार्‍यांची प्रत्येक गोष्ट नियमानुसार होणे महत्त्वाचे असल्याने त्यांनी देवीला सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी अर्पण करणे योग्य आहे. नऊवारी साडी अर्पण करणे, हे पूजा करणार्‍याच्या आवश्यकतेप्रमाणे देवीने नऊ रूपांच्या माध्यमातून कार्य करण्याचे प्रतीक आहे. नऊवारी साडीतील नऊ वार (स्तर) हे देवीची कार्य करणारी नऊ रूपे दर्शवतात. नऊवारी साडी अर्पण करणे, म्हणजे मूळ निर्गुण शक्‍तीला, जिच्यात देवीतत्त्वाची, म्हणजेच शक्‍तीची सर्व रूपे सामावलेली आहेत, त्या श्री दुर्गादेवीला तिच्या नऊ अंगांसह (नऊ रूपांसह) प्रगट होऊन कार्य करण्याचे आवाहन करणे होय. ‘९’ हा आकडा श्री दुर्गादेवीच्या कार्य करणार्‍या प्रमुख नऊ रूपांचे प्रतिनिधीत्व करतो.’

५. देवीला अर्पण केल्या जाणार्‍या खणाचा आकार त्रिकोणी का असतो ?
‘त्रिकोणी आकार हा ब्रह्मा-विष्णु-महेश यांपैकी ब्रह्माच्या इच्छाशक्‍तीशी निगडित आहे. ब्रह्मांडातील इच्छालहरींचे भ्रमणही उजवीकडून डावीकडे त्रिकोणी आकारात संक्रमित होत असते. देवीला त्रिकोणी आकारातील खण अर्पण करणे, म्हणजे ‘आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी’, यासाठी आदिशक्‍ती श्री दुर्गादेवीची इच्छाशक्‍ती प्रबळ करून तिची कृपादृष्टी संपादन करणे होय.’

संदर्भ : सनातन संस्थेचा लघुग्रंथ ‘देवीपूजनाशी संबंधित कृतींचे शास्त्र’
संपर्क : 9920015949

आजच शेअर करा

Related Posts

घिवली गावाचा सरपंच बनावट…
जिल्हा

घिवली गावाचा सरपंच बनावट…

May 5, 2025
गडचिंचले नंतर बदनाम झालेला पालघर नव्या वाटेवर..
जिल्हा

गडचिंचले नंतर बदनाम झालेला पालघर नव्या वाटेवर..

May 5, 2025
वाणगावच्या घोटाळेबाज कोरे कुटुंबीयांवर कारवाई कधी?
जिल्हा

वाणगावच्या घोटाळेबाज कोरे कुटुंबीयांवर कारवाई कधी?

May 1, 2025
कोलंबी प्रकल्पात बस्तान मांडलेल्या भरत वर प्रशासन मेहेरबान
जिल्हा

कोलंबी प्रकल्पात बस्तान मांडलेल्या भरत वर प्रशासन मेहेरबान

April 24, 2025
भरतच्या बुडत्या विमानाला कोणाचा टेकू
जिल्हा

भरतच्या बुडत्या विमानाला कोणाचा टेकू

April 24, 2025
डहाणू बॅक पोखरून खाणारा पुन्हा निवडणूक उभा..
जिल्हा

डहाणू बॅक पोखरून खाणारा पुन्हा निवडणूक उभा..

April 22, 2025
Next Post
दसरा सणाचे महत्त्व

दसरा सणाचे महत्त्व

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

October 17, 2021
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

February 25, 2021

EDITOR'S PICK

पत्रकारामुळे गांजा माफिया पोलिसांच्या ताब्यात

पत्रकारामुळे गांजा माफिया पोलिसांच्या ताब्यात

April 8, 2022
प्रदुषणकारी रामदेव केमीकल कारखान्यावर प्रशासन मेहरबान!

प्रदुषणकारी रामदेव केमीकल कारखान्यावर प्रशासन मेहरबान!

May 24, 2020
चर्चेच्या ९ फेऱ्या होऊन देखील तोडगा नाही

चर्चेच्या ९ फेऱ्या होऊन देखील तोडगा नाही

January 17, 2021
लाईट नाही उपचार होणार नाही.. बोईसर ग्रामीण रुग्णालयात डाँक्टरांचे अजब व्यक्तव्य

लाईट नाही उपचार होणार नाही.. बोईसर ग्रामीण रुग्णालयात डाँक्टरांचे अजब व्यक्तव्य

October 12, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • घिवली गावाचा सरपंच बनावट…
  • गडचिंचले नंतर बदनाम झालेला पालघर नव्या वाटेवर..
  • वाणगावच्या घोटाळेबाज कोरे कुटुंबीयांवर कारवाई कधी?
  • कोलंबी प्रकल्पात बस्तान मांडलेल्या भरत वर प्रशासन मेहेरबान
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!