Sunday, May 3, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

प्रत्येकाने भारताचे संविधान समजून घेतलेच पाहिजे त्याशिवाय पर्यायच नाही

पालघर दर्पण by पालघर दर्पण
August 15, 2020
in जिल्हा, ताज्या बातम्या, देश
0
प्रत्येकाने भारताचे संविधान समजून घेतलेच पाहिजे त्याशिवाय पर्यायच नाही
0
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾ संजीव जोशी

येत्या काही दिवसांनी स्वातंत्र्यदिन येत आहे. ह्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे आपल्याला स्वातंत्र्यदिन साजरा करण्यातही अडचणी आहेत. कदाचित ध्वजवंदनासाठीही गर्दी करता येणार नाही. नाही ध्वजवंदनाला जाऊ शकलो तरी खंत बाळगायचे कारण नाही. गर्दी टाळून देखील आपण देशासाठी कार्य करणार आहोत. त्या निमित्ताने एक निश्चय आपण निश्चित करु शकतो. तो म्हणजे स्वातंत्र्यदिनानिमित्त भारताचे संविधान समजून घेण्याचा संकल्प.

हे पण वाचा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

भारताचे संविधान हा आपल्या देशाचा सर्वोच्च असा कायदा आहे. आपल्या देशाचा कारभार हा संपूर्णपणे भारताच्या संविधानावर आधारित असा चालतो. संविधानामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कशी करायची, राज्यसभा व लोकसभेची निर्मिती कशी करायची, प्रशासनाचा कारभार कसा चालवायचा, न्यायालयाची व्यवस्था कशी असेल, जिल्हा परिषदेचा कारभार कसा चालेल, थेट अगदी ग्रामपंचायतीचा कारभार कसा चालेल यासंदर्भात इत्यंभूत माहिती दिलेली आहे. देशाच्या कुठल्याही कारभारासंदर्भात सर्व व्यवस्था भारताच्या संविधानामध्ये नमूद केलेली आहे. आणि म्हणून संविधान जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत आपल्या देशाची लोकशाही व्यवस्था आपल्याला समजू शकत नाही. आणि लोकशाही व्यवस्था जर समजून घ्यायची असेल तर भारताचे संविधान समजून घ्यायला पर्याय नाही.

भारताच्या संविधानामध्ये समजण्यासारखं काय आहे? अगदी आपल्याला त्यातल्या सर्वच तपशील समजला पाहिजेच असे आवश्यक नाही. त्यामध्ये 25 प्रकरणे, 448 कलमे आणि 12 अनुसूची आहेत. त्यातील अनेक अनुसूची आणि अनेक कलमे याची आपल्याला लगेच काही आवश्यकता भासत नाही. परंतु सुरुवातीची प्रकरणे आहेत या प्रकरणांमध्ये नागरिकत्व कसे प्राप्त होते, राज्यांसंदर्भात आणि त्यांच्या सीमांसंदर्भात माहिती असते. आणि आपल्याला जे समजून घ्यायचे आहे, ते सर्वात महत्वाचे म्हणजे भारतीय संविधानाने आपल्याला दिलेले मुलभूत अधिकार. यासंदर्भात प्रकरण-3 आहे ते आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे. या प्रकरण 3 मध्ये साधारणपणे अनुक्रमांक 12 ते 36 अशी मूलभूत अधिकारांची कलमे आहेत आणि त्याच्यानंतर 51 पर्यंत ही आपल्याला मार्गदर्शक तत्त्वे दिलेले आहेत. देशाचा कारभार कसा चालवायचा यासंदर्भात ही मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत. आणखी एक महत्त्वाचे म्हणजे 4 क हे प्रकरण, त्या प्रकरणामध्ये आपल्या भारतीय नागरिकांना मूलभूत कर्तव्यांची जाणीव करून दिलेली आहे. त्यामध्ये साधारण अकरा उप कलमे आहेत. 51 क नावाचे हे जे कलम आहे त्याला 11 उप कलमे आहेत ती प्रत्येकाने वाचावी अशी आहेत. थोडक्यात म्हणजे तीस चाळीस ज्या ओळी आहेत त्या ओळी ह्या प्रत्येक नागरिकाला माहिती पाहिजेत. त्या शिवाय त्याला देशाच्या कारभाराविषयी किंवा नागरिक म्हणून घडण्यासाठी किमान माहिती उपलब्ध होणार नाही. यानंतर मग जी अनेक प्रकरणे आहेत ती प्रकरणे आपल्याला जशी गरज असेल, जशी आवश्यकता भासेल त्या प्रमाणे आपण समजून घेऊ शकतो.

जोपर्यंत प्रत्येक नागरिक मूलभूत कर्तव्य समजून घेत नाही तो पर्यंत खऱ्या अर्थाने तो काही या देशाचा नागरिक झाला असे आपण म्हणू शकत नाही. आपल्याला मतदानाचा अधिकार मिळतो परंतु लोकशाही व्यवस्थेविषयी आपल्याला माहीतीच नसेल तर त्यामुळे लोकशाहीचे खूप मोठे नुकसान होते. आणि म्हणून एकीकडे भारतीय संविधातून आपले अधिकार समजून घेत असतानाच, आपली देशासाठीची कर्तव्ये समजून घेणे आवश्यक आहे.

भारताचे संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा आहे, आणि जे जे कायदे होतील, केंद्राचे किंवा राज्याचे, ते सर्व भारतीय संविधानातल्या मूळ ढाच्याप्रमाणेच बनतात. म्हणजे जी मूलभूत कर्तव्ये आहेत किंवा आपल्याला जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारांची प्राप्ती होण्यासाठी, ते अधिकार संरक्षित होण्यासाठी वेगवेगळे कायदे बनवले जातात. आणि ते जे कायदे आहेत, ते कायदे संविधानाशी सुसंगत आहेत किंवा नाही हे सर्वोच्च न्यायालयाकडून तपासले जाऊ शकते. सविधान हा सर्वोच्च कायदा अशासाठीच मानला जातो की संविधानाला विसंगत असे जे काही कायदे आहेत ते स्वातंत्र्यानंतर रद्द करण्यात आले आणि इथून पुढे जे सगळे कायदे तयार होतील ते मात्र संविधानाला अनुरूप असेच असले पाहिजेत. त्यातून नागरिकाचा मूलभूत अधिकाराचा भंग होतो असे वाटले किंवा तो अन्यायकारक वाटला, किंवा नैसर्गिक न्यायाला ते विसंगत ठरले, नैसर्गिक न्याय न देणारे ठरले तर मात्र ते न्यायालयाकडून रद्द केले जातात. भारताचे संविधान हा सर्वोच्च कायदा असल्या कारणाने तो समजल्यास आपल्याला एक कायदेशीर समज प्राप्त होते. कुठलाही कायदा त्याला सहज समजू शकतो. म्हणजे एखादा कायदा सुद्धा अन्यायकारक आहे किंवा कसा ते आपल्याला समजू शकते. हे आपल्याला समजल्यास आपण त्या कायद्याला भविष्यात विरोधही करु शकतो. असा कायदा बदलू ही शकतो. तो रद्द करायला भाग पाडू शकतो. कारण या लोकशाही व्यवस्थेमध्ये अंतिमतः आपणच राजे असतो. आणि हा देश आपणच चालवणार असतो. पण हा देश कसा चालतो हे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही, तो पर्यंत आपण देश चालवू शकणार नाही किंवा आपण राजा या वर्गामध्ये बसू शकत नाही. राजाला जर आपल्या राज्याचा कारभार कसा चालतो हे समजले नाही तर तो देश महासत्ता वगैरे बनू शकत नाही. आणि म्हणून आपण मतदार राजाच्या भुमीकेत येण्यासाठी भारतीय संविधान समजून घेतले पाहिजे.

भारतीय संविधान समजून नाही घेतले तर आपल्याला स्वाभिमानाने जगणे जमणार नाही. आपण लोकप्रतिनिधी जर जबाबदारीने निवडून देणार नसू तर आपण पारतंत्र्यातच आहोत. आपल्या हातामध्ये आपले आणि देशाचे भवितव्य सुरक्षित अशा पद्धतीने राहू शकत नाही. आणि म्हणून देशाचे भवितव्यपण जर सुरक्षित ठेवायचे असेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टींचे बारकावे समजून घेतले पाहिजेत. त्यासाठी प्रत्येकाने भारताचे संविधान समजून घेतलेच पाहिजे. त्याशिवाय पर्यायच नाही.

आजच शेअर करा

Related Posts

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?
जिल्हा

“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?

March 20, 2026
वाढवण पोर्टकडून स्थानिकांसाठी स्वतंत्र रस्ता
जिल्हा

वाढवण पोर्टकडून स्थानिकांसाठी स्वतंत्र रस्ता

July 29, 2025
Next Post
पालघर दर्पणच्या मोबाईल अँड्रॉइड अँपने अनावरण

पालघर दर्पणच्या मोबाईल अँड्रॉइड अँपने अनावरण

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

डहाणूत कोरोनाचा शिरकाव; तीन वर्षीय मुलीला संसर्ग

डहाणूत कोरोनाचा शिरकाव; तीन वर्षीय मुलीला संसर्ग

May 24, 2020
घोलवडच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून कोविड लसीचा काळाबाजार

घोलवडच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून कोविड लसीचा काळाबाजार

September 24, 2021
सर्वपित्री अमावस्येचे महत्त्व

सर्वपित्री अमावस्येचे महत्त्व

September 15, 2020
विक्रमगड-पाली रोडवर बस -कंटेनर अपघातात ११ जण जखमी

विक्रमगड-पाली रोडवर बस -कंटेनर अपघातात ११ जण जखमी

September 3, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
  • वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!