Monday, May 25, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

प्रदुषणकारी बजाज हेल्थ केअरवर प्रदुषण मंडळ मेहरबान!

पालघर दर्पण by पालघर दर्पण
May 5, 2026
in जिल्हा, ताज्या बातम्या, राज्य
0
प्रदुषणकारी बजाज हेल्थ केअरवर प्रदुषण मंडळ मेहरबान!
15
SHARES
212
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾ बेकायदेशीर पणे रासायनिक सांडपाणी सोडल्या प्रकरणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची बजाज कारखान्याला नोटीस; प्रदुषण नियंत्रण मंडळ मात्र कारवाई करण्यासाठी उदासीन

पालघर दर्पण: विषेश प्रतिनिधी
बोईसर: तारापुर मधील प्रदुषणकारी कारखान्यांवर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मेहरबान असल्याचे दिसून येत असुन प्रदुषणकारी बजाज हेल्थ केअर कारखान्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. मात्र रासायनिक सांडपाणी खुलेआम नैसर्गिक नाल्यामध्ये सोडलं जात असल्याची बातमी पालघर दर्पण ने प्रसारित केलेल्या बातमी नंतर याची दखल घेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने या कारखान्याला नोटीस बजावली आहे. परंतु प्रदुषण नियंत्रण मंडळाने केलेले दुर्लक्षा मुळे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

तारापुर औद्योगिक क्षेत्रातील प्लाँट नं- इ 62/63 या बजाज हेल्थ केअर लि. कारखान्यातुन बाहेर असलेल्या नाल्यात व औद्योगिक क्षेत्राचे सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीत रात्रीच्या वेळी घातक रसायन सोडले जात असल्याचे पालघर दर्पणने उघडकीस आणले होते. याबाबत बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने बजाज हेल्थ केअर कारखान्याला नोटीस बजावुन तिन दिवसात उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. असे असले तरी प्रदुषणाची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने मात्र तक्रारी करून देखील या कारखान्या विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई आजवर केलेली नाही. दिवसेंदिवस तारापुर मधील प्रदुषण वाढत असताना देखील अशा प्रदुषणकारी कारखान्याला दिली जाणारी मोकळीक चिंताजनक असून प्रदुषणकारी कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

◾ बजाज हेल्थ केअर कारखान्यातुन रात्रीच्या वेळी कोणी नसल्याचे पाहुन मोठ्या प्रमाणात रसायन नाल्यात सोडुन दिल्याचे दिसुन आले आहे. याबाबत एक विडीओ समोर आला असुन प्रदुषण करणाऱ्या बजाज हेल्थ केअर कारखान्यांचा पर्दाफाश झाला आहे. परंतु सर्व प्रकारचे पुरावे समोर आले असताना देखील तसेच महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी यांच्या कडे तक्रार दाखल करण्यात आली असताना ही कारवाई कडे कोणाच्या दबावाखाली येवुन दुर्लक्ष केले जाते हा संशोधनाचा विषय आहे.

◾ खोटी कागदपत्रे दाखवुन वाहतूक प्रकरणी देखील दुर्लक्ष

तारापुर औद्योगिक क्षेत्रातील प्लाँट नंबर एल-11 ही पुर्वी न्यूट्रॉप्लस व आताची बजाज हेल्थ केअर च्या नावे असलेल्या कारखान्यातुन बुधवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास एम एच 43/ वाय 5600 या वाहनातुन कारखान्यातील साठवणूक करून ठेवलेला रासायनिक घनकचरा बाहेर काढण्यात आला होता. त्यानंतर एमएच 04/इएल 9268 या वाहनातुन देखील घनकचरा भरून बाहेर काढण्यात आले. बोईसर पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी बेटेगाव चौकीवर वाहन चौकशी साठी थांबविण्यात आले. कारखानदाराने खोटी कागदपत्रे सादर केल्यानंतर थांबवलेली मालवाहू वाहणे बोईसर पोलिसांनी सोडून दिली होती.

औद्योगिक क्षेत्रातील याअगोदर बंद असलेल्या प्लाँट नं एल 11 या कारखान्यात मोठ्या प्रमाणात रासायनिक घनकचरा साठवून करून ठेवला होता. कारखानदारांने आपल्या इतर कारखान्यांची कागदपत्रे दाखवुन चोरट्या पध्दतीने कारखान्यातील रासायनिक घनकचरा मुंबई वेस्ट मँनेजमेंट च्या वाहनातुन बाहेर काढण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे ज्यावेळी पोलिसांनी वाहन पकडले त्यावेळी न्यूट्रॉप्लस कारखान्याच्या प्लाँट नं टी- 30 व एन- 92 असा उल्लेख असलेली कागदपत्रे त्याच्या कडे उपलब्ध होती. मात्र रासायनिक घनकचरा हा प्लाँट नं एल 11 मधुन भरण्यात आला होता. याबाबत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी यांनी दोन चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत असे सांगितले होते मात्र आठवडा उलटून गेला असताना देखील कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
पर्यावरण दिन साजरा करताना देशातील सर्वात प्रदुषणकारी तारापुर कडे सरकारने लक्ष द्यावे

पर्यावरण दिन साजरा करताना देशातील सर्वात प्रदुषणकारी तारापुर कडे सरकारने लक्ष द्यावे

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

उद्योग विश्वाने निर्बंधांचे तंतोतंत पालन करावे; सुभाष देसाई

उद्योग विश्वाने निर्बंधांचे तंतोतंत पालन करावे; सुभाष देसाई

April 16, 2021
शिवसेनेच्या दैवताची विटंबना सेनेच्या नेत्यांन कडूनच!

शिवसेनेच्या दैवताची विटंबना सेनेच्या नेत्यांन कडूनच!

August 6, 2021
दुधाच्या टँकर मधुन कामगारांची वाहतूक

दुधाच्या टँकर मधुन कामगारांची वाहतूक

May 24, 2020
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

वेश्या व्यवसाय चालवणारा फरार आरोपी करतोय पत्रकारांची बदनामी

October 22, 2021

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!