डहाणू बॅक पोखरून खाणारा पुन्हा निवडणूक उभा..
विरोधात असलेले देखील आले एकत्र बॅक पोखरून खायला?
घोटाळेबाज उमेदवारांन विरोधात प्रगती जनता पॅनल खंबीर पणे उभे.
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
पालघर: सर्वसामान्य गरीब जनतेची समजली जाणारी व ग्रामीण भागातील नाविन्यपूर्ण बॅक असलेल्या डहाणू जनता सहकारी बँकेवर डल्ला मारण्यासाठी घोटाळेबाज उमेदवार पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यावेळी सुरूवातीला विरोधकांना हाताशी धरून राजकीय पक्षांच्या युत्यांचा आधार घेत एकत्रित बॅकेवर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा उद्देश होता मात्र हा उद्देश डहाणूकरांनी हाणून पाडला आहे. सर्वसामान्य नागरिकांनी एकत्रित येऊन नवीन पॅनल बनवलं असून हे पॅनल घोटाळेबाजांन विरोधात खंबीर पणे उभे असल्याचे दिसून येते.
डहाणू जनता सहकारी बँकेवर सन २००९ साली तत्कालीन अध्यक्ष भरत राजपूत सह १७ जनांनी ५ कोटी ९६ लाख रूपयाचा दरोडा टाकत घोटाळा केला होता. या घटनेला १६ वर्षाचा कार्यकाळ उलटून गेला असला तरी सहकार विभागाने घोटाळा करणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केलेली नाही. यामुळे हे घोटाळेबाज आता पुन्हा बॅकेच्या निवडणूक रिंगणात उतरले असल्याने सर्वसामान्य बॅकेचे सदस्य अतिशय चिंताजनक वातावरणात आहेत. यातच मागील निवडणुकीत घोटाळेबाज अध्यक्ष व संचालकांन विरोधात उभे राहुन सर्वसामान्य सदस्यांनी निवडून दिलेले विद्यमान अध्यक्ष देखील घोटाळेबाजांच्या टोळीत सामिल झाल्याने या शहांना शह देण्यासाठी डहाणू जनता सहकारी बँकेतील सर्वसामान्य सदस्यांनी एकत्र येऊन घोटाळेबाज उमेदवारांना विरोधात कंबर कसली आहे. यावेळी प्रगती जनता पॅनल ची स्थापना करून सर्वसामान्य व अनुभवी सदस्यांना पॅनल कडून उमेदवारी देण्यात आली आहे.
डहाणू जनता सहकारी बँक घोटाळा प्रकरण साधारण सन २००९ साली उघडकीस आले. यामध्ये थोडक्यात हकिकत अशी की, आरोपींनी कथितरित्या “राजकीय फायद्यांसाठी” पैशांचा अपव्यय केला आणि घोटाळ्यात नातेवाईक आणि बँक कर्मचाऱ्यांचा समावेश केला होता. आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने सुरुवातीला अटकपूर्व जामीन मंजूर केला होता, परंतु नंतर पोलीस ठाण्यातच जामीन मंजूर झाल्याच्या तक्रारीनंतर तो रद्द केला. यानंतर १० संचालकांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजेही ठोठावले मात्र तेथेही अपयश आल्याने तत्कालीन अध्यक्ष भरत राजपूत व इतर ३ संचालक हे गुजरात अहमदाबाद येथे पळून जात असताना मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून अटक केली होती. मात्र त्यावेळी गुन्हा दाखल करणाऱ्या सहकारी संस्था विभागाने या अध्यक्ष व संचालकांवर कायद्यातील तरतुदीनुसार निवडणूक लढविण्यासाठी बंदी घातली नसल्याने घोटाळेबाज आजही मोकाट पणे बॅकेवर वर्चस्व प्रस्थापित करण्याची तयारी करत आहेत.
◾ डहाणू कोर्टा कडून दिरंगाई?
ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने डहाणू जनता सहकारी बँक घोटाळा प्रकरण जलदगतीने चालविण्याचे आदेश दिले होते. मात्र तब्बल १६ वर्ष उलटून देखील डहाणू न्यायालयाकडून याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप सर्वसामान्य कडून केला जात आहे. विशेष म्हणजे वारंवार तारखेला उपस्थित राहत नसलेल्या आरोपींना तातडीने अटक करून न्यायालयात हजर करणे गरजेचे असताना या आरोपींना एका विनंती अर्जावरून मोकळी दिली होती.
◾ घोटाळेबाजांना शह देण्यासाठी प्रगती जनता पॅनल ची स्थापना ही एक महत्वाचे पाऊल मानले जात असून या सर्वसामान्य सदस्यांनी एकत्र येऊन तयार केलेल्या पॅनल ला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असल्याचे दिसून येते. यातच काही अदृश्य हात देखील या पॅनलच्या सोबत असल्याने येणाऱ्या २६ तारखेला घोटाळेबाजांना बॅकेचे सदस्य घरी बसतात की निवडून आणतात हे पाहणेच औचित्यांचे ठरणार आहे.