Thursday, April 9, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

शिवसेनेचे शिवबंध सोडून बोईसरचे दोन चेहरे शिंदेंच्या मांडीवर

पालघर दर्पण by पालघर दर्पण
September 19, 2022
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
शिवसेनेचे शिवबंध सोडून बोईसरचे दोन चेहरे शिंदेंच्या मांडीवर
0
SHARES
1.8k
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾️बोईसर ग्रामपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून पदाधिकारी नियुक्ती; एकमेकांना विरोधात दंगे करून आता एकत्रितपणे निवडणूक लढविण्याच्या तयारीत

◾️ बोईसरचे मतदार निवडणार वेगळा पर्याय?

हे पण वाचा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील

बोईसर: गेल्या अनेक दिवसांपासुन नेमके कोणत्या गटाचा झेंडा हाती घ्यायचा या विचारात असलेले बोईसरचे शिवसेना पदाधिकारी यांनी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचा झेंडा हातात घेवुन हातचे शिवबंध सोडले आहे. यातच अगोदर असलेली पदे आपल्या पदरात शिंदे यांच्या पत्राद्वारे पाडून घेतल्यानंतर आता बोईसर ग्रामपंचायत निवडणूक यांच्या पुढे आवाहन आहे. महत्त्वाचे म्हणजे शिंदे गटाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून विरोध असलेले बोईसरचे मातब्बर राजकारणी तसेच माजी कृषी सभापती यांच्या सोबत मनोमिलन करून घ्यावे लागले आहे.

बोईसर ग्रामपंचायत हद्दीत शिवसेनेचे दोन मुख्य चेहरे म्हणजे माजी ग्रामपंचायत सदस्य निलम संखे व माजी पंचायत समिती सदस्य मुकेश पाटील या दोघांनी हातचे शिवबंध सोडून थेट शिंदे गटात दाखल झाले. दोन दिवसापूर्वी या पदाधिकाऱ्यांना पहिल्यापासून असलेल्या पदावरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत नियुक्ती करण्यात आली. काही हातच्या वृत्तपत्रात बातम्या व ओस्तवाल मध्ये फलक झलकल्यावर याबाबत माहिती समोर आली. महत्त्वाचे म्हणजे बोईसर ग्रामपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर करण्यात आलेली पदाधिकारी नियुक्ती ही तशी महत्त्वाची आहे. परंतु काही मोजके चेहरे शिंदे गटात बोईसर मध्ये दिसत असल्याने बोईसरचा मतदार नेमका कोणाच्या बाजुला उभा राहणार हे निवडणूकीत दिसुन येणार आहे. विशेष म्हणजे शिवसेना शिंदे गट व भाजपाचे सरकार राज्यात असल्याने बोईसर मध्ये देखील एकत्रितपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात आला आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांन विरोधात हाणामारी करणारे गळ्यात गळे टाकून येणाऱ्या निवडणूकीत दिसून येणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निलम संखे यांची उपजिल्हा प्रमुख व मुकेश पाटील यांची शहर प्रमुख पदी नियुक्ती केल्यानंतर आमदार रविंद्र फाटक यांनी चित्रालय येथील सरोवर हाँटेल येथे नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेतली यावेळी तळागाळातील एकही निष्ठावंत शिवसैनिक याठिकाणी उपस्थित नसल्याचे दिसून आले होते. यामुळे येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत ठाण्याहुन जोरदार रसद पुरवावी लागेल तेव्हाच कुठे कार्यक्रम एकदम ओके होणार आहे. यातच भाजप व शिवसेना शिंदे गट युक्ती बोईसर मध्ये करणार असल्याने नेमकी थेट सरपंच साठी उमेदवारी कोणाला द्यायची यामध्ये मोठे मतभेद असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे. दोन्ही बाजूला नाराज मंडळींची संख्या अधिक असल्याने कोणाला कशा प्रकारे शांत केले जाते हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. या सर्व घडामोडींवर मतदार देखील लक्ष ठेवून असल्याने बोईसरचे मतदार वेगळा पर्याय निवडणार का हा देखील महत्त्वाचा विषय आहे. यामुळे बोईसर ग्रामपंचायत निवडणूक अधिकच रंजक होणार हे नक्की आहे.

◾️ शिवशक्ती संघटना एकला चलोच्या भुमिकेत?

मागील वेळी बोईसर ग्रामपंचायत मध्ये शिवशक्ती संघटनेने भाजप सोबत घरोबा करत शिवसेनेला सत्तेपासून दुर ठेवले होते. यावेळी मात्र भाजप व शिवसेना शिंदे गटाची युक्ती होणार असल्याने यांच्या सोबत शिवशक्ती संघटना देखील एकत्रितपणे निवडणूक लढविणार अशी चिन्हे होती. याबाबत अनेक बैठका देखील झाल्या मात्र भाजप व शिवसेना शिंदे गटाकडून देण्यात येणारे थेट सरपंच पदाचे उमेदवार योग्य नसल्याने शिवशक्ती संघटनेचे संजय पाटील यांनी नाराजी व्यक्त केली असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे. यातच उमेदवार हा पैशाने नाही तर जनतेची सेवा करणारा असावा असा आग्रह संजय पाटलांचा असल्याने आता खात्रीशीर सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवशक्ती संघटना स्वतंत्र निवडणूक लढविण्याची तयारी करत आहे.

◾️शिवशक्ती संघटना स्वतंत्र पणे निवडणुकीत उतरल्यावर शिवसेना शिंदे गट व भाजपाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आजवर शिवशक्तींची बोईसर मधील ताकद पाहता शिवशक्तींच्या संजय पाटील यांना नाराज करणे दोन्ही पक्षांच्या नेत्यांना थोड अडचणीचे ठरणार आहे.

◾️बोईसरचे माजी सरपंच मनोज मोर देखील या निवडणूकीत थेट सरपंच पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे समोर आले आहे. अलीकडच्या काळात शिवसेना शिंदे गटाचे निलम संखे यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या मनोज मोर यांना उमेदवारी देण्याबाबत समाधानकारक उत्तर संखे यांच्या कडून मिळाले नसल्याने त्यांनी आपल्या स्वगृही परतण्याचा निर्णय घेत शिवशक्तींच्या रिंगणात जाण्याची तयारी दर्शवली आहे. मनोज मोर यांनी शिवशक्तीच्या संजय पाटील यांचा हात धरल्यास मोठा फटका काटकर पाडा व सुतार पाडा भागात शिंदे गटाला बसण्याची शक्यता आहे.

◾️शिवसेना शिंदे गट व भाजप सोडून इतर पर्याय बोईसर मध्ये महत्त्वाचा आहे. या निवडणुकीत संपूर्ण बोईसरच्या विविध भागाचे संख्याबळ पाहिले तर शिवशक्ती संघटनेचा प्रत्येक भागात कार्यकर्ता असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे बोईसर मध्ये बहुजन विकास आघाडी देखील निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असुन अद्याप आघाडीचे कोणतेही चित्र स्पष्ट झालेले नाही.

आजच शेअर करा

Related Posts

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

March 20, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?
जिल्हा

“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?

March 20, 2026
वाढवण पोर्टकडून स्थानिकांसाठी स्वतंत्र रस्ता
जिल्हा

वाढवण पोर्टकडून स्थानिकांसाठी स्वतंत्र रस्ता

July 29, 2025
Next Post
बोईसर ग्रामपंचायत निवडणूकीत शिंदेचे दबावतंत्र?

बोईसर ग्रामपंचायत निवडणूकीत शिंदेचे दबावतंत्र?

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

March 20, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

February 25, 2021
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

153 वर्षे जुना ब्रिटिश कालीन पूल तोडण्यास सुरुवात

153 वर्षे जुना ब्रिटिश कालीन पूल तोडण्यास सुरुवात

November 20, 2020
दिग्दर्शक अनुराग कश्यप व अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे

दिग्दर्शक अनुराग कश्यप व अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे

March 3, 2021
आज संध्याकाळी ६ वाजता मोदी पुन्हा देशाला संबोधणार.

आज संध्याकाळी ६ वाजता मोदी पुन्हा देशाला संबोधणार.

October 20, 2020
बेकायदेशीर मुरुड उत्खनन प्रकरणात तहसीलदार देवमाणूस

बेकायदेशीर मुरुड उत्खनन प्रकरणात तहसीलदार देवमाणूस

January 31, 2022

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
  • वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!