Thursday, May 28, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

अखेर बोईसर पोलिसांनी निलेश सुर्वेच्या मुस्क्या आवळल्या!

पालघर दर्पण by पालघर दर्पण
April 14, 2022
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
अखेर बोईसर पोलिसांनी निलेश सुर्वेच्या मुस्क्या आवळल्या!
0
SHARES
1.8k
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾️ अमली पदार्थ माफियाला बोईसर पोलिसांनी केली अटक; अमली पदार्थ बाबत सातत्याने पालघर दर्पणने सुरू ठेवला होता पाठपुरावा

पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

बोईसर: शहरातील अमली पदार्थ माफियाला अखेर बोईसर पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरातून गुरूवारी दुपारी ताब्यात घेतले आहे. गेल्या अनेक महिन्यापासून या अमली पदार्थ माफिया विरोधात अनेक तक्रारी असताना देखील पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. याबाबत सातत्याने पाठपुरावा देखील पालघर दर्पणने केला होता. यातच काही दिवसांपूर्वी पत्रकारांंनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी गांजा माफियाला ताब्यात घेवुन मोठा गांजा साठा ताब्यात घेतला होता याच प्रकरणात मुख्य सुत्रधाराला अखेर ताब्यात घेण्यात आले आहे.

नागरिकांनी तक्रार करून देखील गेल्या अनेक महिन्यापासून अमली पदार्थ माफिया निलेश सुर्वे हा खुलेपणाने आपला गोरखधंदा चालत होता. बोईसर पोलिस ठाण्याचे काही पोलिस देखील या माफियाला पाठीशी घालत असल्याचे दिसून आले होते. याबाबत प्रसारमाध्यमात देखील अनेक बातम्या प्रसिद्ध करून त्याचा पाठपुरावा केला जात होता. बोईसर पोलिसांना उशिरा का होईना आपल्या कर्तव्याची जाण आल्याने अमली पदार्थ माफियांच्या मुस्क्या पोलिसांनी आवळल्या आहेत. गुरूवारी 14 एफ्रिल 2022 रोजी दुपारच्या सुमारास बोईसर रेल्वे स्थानक परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. संपूर्ण बोईसर भागात अमली पदार्थ विक्री करणारा मुख्य सुत्रधाराला ताब्यात घेतल्याने त्याच्या संपर्कात असलेले राजकीय पुढारी व अमली पदार्थ रँकेट चालवणारे माफियांचा शोध पोलिसांना आता घेता येणार आहे.

स्थानिक पत्रकारांनी पोलिस कंट्रोल रूमला दिलेल्या माहितीनुसार 7 एफ्रिल रोजी बोईसर पोलिसांनी साधारण 3 किलो गांजा ताब्यात घेतला होता. याच वेळी ताब्यात घेतलेल्या आरोपी सोबत निलेश सुर्वे याचा वारंवार मोबाईल वरून संपर्क असल्याचे पोलीस तपासणी मध्ये दिसून आले होते. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक योगेश खोंडे व त्यांची टीम मुख्य सुत्रधाराला असलेल्या निलेश सुर्वे चा मागोवा घेत होती. यातच चार दिवसापासून बोईसर पोलिस आपल्याला ताब्यात घेतील या भितीने निलेश सुर्वे आपले सर्व दुरध्वनी बंद भुमीगत झाला होता. यातच याचे काही सहकारी गुरुवारी रात्री अमली पदार्थ विक्री करणाऱ्या अड्ड्यावर असताना पत्रकारांंनी याबाबत कंट्रोल रूमला माहिती दिल्यानंतर याठिकाणी पोलीस आल्यानंतर माया व अन्या नावाचे सुर्वेचे साथीदार याठिकाणाहुन पळून जाण्यात यशस्वी झाले होते. घटनास्थळी असलेली एक दुचाकी देखील पोलीस ताब्यात घेतली होती. यातच गुरूवारी सकाळी पासुनच पोलिस उपनिरीक्षक योगेश खोंडे व त्यांची टीम निलेश सुर्वे याचा शोध घेत असताना बोईसर रेल्वे स्थानक परिसरातून दुपारी त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

◾️ निलेश सुर्वे या आरोपीला ताब्यात घेतले असुन अमली पदार्थ बाबत सर्व तपास सुरू आहे. याप्रकरणात जे दोषी असतील त्यांच्या वर कायदेशीर कारवाई केली जाईल.
— सुरेश कदम, पोलिस निरीक्षक बोईसर

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
ड्रग्स माफिया निलेश सुर्वेला सोमवार पर्यंत पोलिस कोठडी

ड्रग्स माफिया निलेश सुर्वेला सोमवार पर्यंत पोलिस कोठडी

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

बोईसरच्या भुमाफियांना स्थानिक अधिकाऱ्यांची साथ

बोईसरच्या भुमाफियांना स्थानिक अधिकाऱ्यांची साथ

April 13, 2026
एक जागा अनेकांना विकणारे आता बोईसरच्या राजकारणात

एक जागा अनेकांना विकणारे आता बोईसरच्या राजकारणात

October 8, 2022
दुधाच्या टँकर मधुन कामगारांची वाहतूक

दुधाच्या टँकर मधुन कामगारांची वाहतूक

May 24, 2020
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला धुडकावून दस्तऐवज नोंदणी

आसनगाव प्रकरणात जिल्हाधिकारी संधी शोधण्याच्या प्रयत्नात

March 20, 2026

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.