Monday, May 11, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

खून प्रकरणी ६ वर्षांच्या प्रत्यक्षदर्शीची साक्ष ग्राह्य नाही

पालघर दर्पण by पालघर दर्पण
January 30, 2022
in ताज्या बातम्या, राज्य
0
खून प्रकरणी ६ वर्षांच्या प्रत्यक्षदर्शीची साक्ष ग्राह्य नाही
0
SHARES
141
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

पालघर दर्पण: प्रतिनिधी

मुंबई : सहा वर्षांच्या प्रत्यक्षदर्शीने दिलेली साक्ष आरोपीला दोषी ठरवण्यासाठी विश्वसार्ह ठरत नाही आणि ती अपुरी आहे, असा निर्वाळा देऊन उच्च न्यायालयाने खुनाच्या आरोपात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या २१ वर्षांच्या आरोपीची निर्दोष सुटका केली. या प्रकरणी तपास अधिकाऱ्यावर कारवाईचे आदेशही न्यायालयाने रायगड पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

७ फेब्रुवारी २०१७ रोजी श्रीवर्धनमध्ये सावित्री सागर पवार या महिलेचा काही अज्ञात इसमांनी खून केल्याची तक्रार श्रीवर्धन पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. याप्रकरणी आरोपी गणेश मांडवकर आणि मंगेश जाधव यांना पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली अटक केली होती. माणगाव जिल्हा सत्र न्यायालयात त्यांच्याविरोधात सहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यात सहा वर्षांच्या मुलीला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. सत्र न्यायालयानेही या मुलीची साक्ष ग्राह्य धरून दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. शिक्षा भोगत असतानाच मुख्य आरोपी मंगेशचा कारागृहातच मृत्यू झाला. तर मांडवकरने शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

आरोपीची बाजू मांडताना अ‍ॅड्. आशिष सातपुते यांनी म्हटले होते की, सत्र न्यायालयाने दिलेला निकाल हा केवळ अनुमानांच्या आधारे असून सहा वर्षीय मुलीची प्रत्यक्षदर्शी म्हणून साक्ष ग्राह्य धरता येणार नाही. सर्वोच्च न्यायालय, भारतीय पुरावा कायद्याच्या न्याय तत्वानुसार अल्पवयीन मुलांची साक्ष ही विश्वासार्ह नाही. न्या. संभाजी शिंदे आणि न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठानेही सहा वर्षांच्या प्रत्यक्षदर्शीची साक्ष अविश्वसनीय, अपुरी असल्याचे मत नोंदवले. शिवाय सत्र न्यायालयानेही चुकीच्या निष्कर्षांवर आरोपीला दोषी ठरवल्याचे नमूद करून न्यायालयाने आरोपीची जन्मठेप रद्द केली. तसेच खुनाच्या आरोपांतून त्याची निर्दोष सुटका केली.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
बेकायदेशीर मुरुड उत्खनन प्रकरणात तहसीलदार देवमाणूस

बेकायदेशीर मुरुड उत्खनन प्रकरणात तहसीलदार देवमाणूस

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

गुटखा अडकला पोलिसांच्या घशात!

गुटखा अडकला पोलिसांच्या घशात!

July 30, 2021
विकासाच्या नावाखाली येऊ घातलेल्या बंदराला विरोध

विकासाच्या नावाखाली येऊ घातलेल्या बंदराला विरोध

October 26, 2020
खडसे पक्षांतर करण्याच्या विचारात?

खडसे पक्षांतर करण्याच्या विचारात?

October 15, 2020
रुग्णवाहिकेमुळे पालघर ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा मिळेल — मंत्री एकनाथ शिंदे

रुग्णवाहिकेमुळे पालघर ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा मिळेल — मंत्री एकनाथ शिंदे

April 13, 2026

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!