Monday, May 25, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

मुख्यमंत्र्यांचा पालघर दौरा अजूनही अनिश्चित

पालघर दर्पण by पालघर दर्पण
August 17, 2021
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोकण विभागातील जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
0
SHARES
624
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾जिल्हा मुख्यालयाच्या उद्घाटनासाठी दौरा जाहीर न झाल्यामुळे संभ्रम कायम!

◾मुख्यालयाचे लोकार्पण प्रत्यक्षात की आभासी होणार?

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील

पालघर: येत्या 19 ऑगस्ट रोजी पालघर जिल्हा मुख्यालयाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री येणार अशी चर्चा व त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली असली तरी मुख्यमंत्री दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर न झाल्यामुळे मुख्यमंत्री प्रत्यक्षात पालघरला येतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अवघे दोन दिवस शिल्लक असताना व शिवसेनेकडून फलकबाजी झाली असताना दौरा कार्यक्रम जाहीर झाला नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

7 वर्षांपूर्वी भूमिपूजन झालेले पालघर जिल्हा मुख्यालय आता तयार झाले असून त्याच्या उद्घाटनाची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून रंगत होती. अखेर मुख्यमंत्री 19 ऑगस्ट रोजी पालघर जिल्ह्यात दाखल होऊन जिल्हा मुख्यालयाचे उद्घाटन करतील अशी ठोस माहिती पालघर जिल्हाधिकारी यांनी काहींच्या कानात सांगितल्यानंतर हे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आले होते. प्रत्यक्षात अवघे दोन दिवस बाकी असताना अजूनही मुख्यमंत्र्यांचा अधिकृत दौरा मुख्यमंत्री कार्यालयातून जाहीर न झाल्यामुळे या उद्घाटना बाबतीत अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत.

मुख्यमंत्री पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याने अलीकडे दादा भुसे यांनी पालघर जिल्ह्याचा दौरा करून विविध प्रशासकीय यंत्रणा सोबत या उद्घाटन सोहळ्याच्या तयारीची बैठक घेऊन विभागनिहाय आढावा घेतला. त्यानंतर मंत्रालयीन पातळीवरूनही अनेक उलट तपासण्या करण्यात आल्या. ही तयारी पहाता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पालघर जिल्ह्यात येणार हे निश्चित झाले होते. त्या दृष्टीने त्यांच्या हेलिकॉप्टर साठी बोईसरच्या विराज प्रोफाइल हेलिपॅड येथून येणारा पालघर बोईसर रस्ता चकाचक करण्यात आला आहे. याच बरोबरीने जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी मांडव उभारणीचे काम जोमात सुरु आहे.

◾प्रसारमाध्यमांच्या प्रवेशपत्रांबाबत जिल्हा माहिती कार्यालयाकडून माहिती घेण्यात येत आहे. अशी सर्व जय्यत तयारी सुरू असताना दोन दिवस येऊन ठेपलेली असताना मुख्यमंत्र्यांचा दौरा मंगळवारी 17 आँगस्ट रोजी रात्री पर्यंत जाहीर न झाल्याने दौऱ्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. याबाबत जिल्हा माहिती कार्यालयला दौरा बाबत विचारले असता आजूनही अधिकृतपणे दौरा कार्यक्रम आला नसल्याचे त्यांनी सांगितले.

◾मुख्यमंत्री येणारच अशी भावना शिवसैनिकांमध्ये असली तरी ते येतील की नाही याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांना मध्ये साशंकता दिसून येत आहे. 19 ऑगस्ट ही जिल्हा मुख्यालय लोकार्पणची उद्घाटनाची तारीख अजूनही अधिकृतरीत्या जाहीर झालेली नाही. जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय उद्घाटनासाठी सुसज्ज असली तरी मुख्यमंत्र्यांचा दौरा अधिकृत रित्या आला नसल्याने मुख्यमंत्री हे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने कि प्रत्यक्षात येऊन करतील याकडे सर्वांचे डोळे लागून राहिले आहेत.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
बोईसर नगरपरिषद घोषणा मुख्यमंत्री करणार का?

बोईसर नगरपरिषद घोषणा मुख्यमंत्री करणार का?

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

मुंबई बडोदा महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या दरात तफावत

मुंबई बडोदा महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या दरात तफावत

December 6, 2020
महाराष्ट्राचा कर्नाटकव्याप्त प्रदेश पुन्हा राज्यात आणणारच; मुख्यमंत्री ठाकरे

महाराष्ट्राचा कर्नाटकव्याप्त प्रदेश पुन्हा राज्यात आणणारच; मुख्यमंत्री ठाकरे

January 27, 2021
देवीची ओटी कशी भरावी ?

देवीची ओटी कशी भरावी ?

May 5, 2026
महामार्गावर बर्निग कारचा थरार

महामार्गावर बर्निग कारचा थरार

April 13, 2026

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!