◾तासाभराने अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल
कार जळून खाक, जीवितहानी नाही
पालघर दर्पण: वार्ताहर
पालघर: मुंबई अहमदाबाद महामार्गावर भरधाव कारला शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याने कार जळून खाक झाली आहे.शुक्रवारी (ता.13)सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास सीएनजी इंधनावर धावणाऱ्या कारला आग लागली होती.अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला होता. परंतु आगीत कार जळून खाक झाली आहे.
शुक्रवारी सायंकाळी मुंबई अहमदाबाद महामार्गावर कुडे गावच्या हद्दीत गुजरात मार्गिकेवरून कार एमएच 03 एजेड 8402 गुजरातच्या दिशेने भरधाव वेगात जात असताना अचानक पेट घेतला होता.चालकाने समयसूचकता दाखवून भरधाव कार रस्त्याच्या कडेला उभी करून कार मधून बाहेर पडल्याने बचावला आहे. जितेंद्र कुमार गौतम असे कार चालकाचे नाव असून तो बोईसर चा रहिवासी आहे.
तासाभराने अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला होता.अग्निशामक दलाच्या जवानांनी कार ला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले,परंतु आगीत कार जळून खाक झाली आहे.
 
	    	 
 
					

















