Monday, May 25, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

रेमडेेसिवीरच्या उपलब्धतेबाबत अन्न व औषधमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली माहिती

पालघर दर्पण by पालघर दर्पण
April 30, 2021
in ताज्या बातम्या, राज्य
0
रेमडेेसिवीरच्या उपलब्धतेबाबत अन्न व औषधमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली माहिती
0
SHARES
95
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

■राज्यातील ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर पुरवठयाचे योग्य नियोजन; अन्न व औषध प्रशासन मंत्री  डॉ. राजेंद्र शिंगणे

पालघर दर्पण, प्रतिनिधी

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

मुंबई : राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा समप्रमाणात होण्याच्या दृष्टीने त्याच प्रमाणे रेमडेसिवीरच्या उपलब्धतेबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून योग्य नियोजन करण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषधमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.

अन्न व औषध प्रशासन ऑक्सिजन पुरवठ्याचे विवरणपत्र तयार करून ते उत्पादक व जिल्ह्यांना नियमितपणे देत असून २९ एप्रिल २०२१ साठी १६३६ टनाचे विवरणपत्र देण्यात आलेले आहे. याप्रमाणे वितरण केल्या जाण्यासाठी प्रशासनाद्वारे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये मेडीकल ऑक्सिजनचे उत्पादन करणाऱ्या आयनॉक्स इंडिया, लींडे, एअर लिक्विड, टायो निप्पॉन, जे एस डब्ल्यू या पाच प्रमुख कंपन्या आहेत. याव्यतिरिक्त देखील अनेक छोटे उत्पादक आहेत त्यांचे देखील उत्पादन वाढले आहे या सर्व उत्पादकांचे मिळून सुमारे १२७० टन इतके ऑक्सिजन उत्पादन रोज होत आहे.

केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी त्यांचे पत्र २४ एप्रिल २०२१ द्वारा १७८४ टन ऑक्सिजन कोटा महाराष्ट्रासाठी निश्चित केला आहे. त्यात राज्यातील व राज्याबाहेरील उत्पादकांचा समावेश आहे. राज्यात सध्या प्रामुख्याने छत्तीसगड, कर्नाटका व गुजरात राज्यांमधून सुद्धा साधारणता २०० ते २५० टन ऑक्सिजन दररोज प्राप्त होत आहे. विशाखापट्टणम येथून ७ टँकर घेऊन निघालेल्या विशेष रेल्वे व्दारा २४ एप्रिल, २०२१ रोजी १०५ टन ऑक्सिजन राज्यासाठी प्राप्त झाला. राज्यात ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी असलेल्या टँकरची कमतरता लक्षात घेता नायट्रोजनसाठी असलेल्या टँकर यांचे ऑक्सिजन टँकरमध्ये रूपांतर करणे सुरू आहे.

त्यानुसार आतापर्यन्त ६८० टन ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता वाढली आहे आणि अजून ३५० ते ४०० टन वाहन क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. २७ एप्रिल २०२१ रोजी राज्यात एकूण १५५६ टन ऑक्सिजनचे वितरण झाले आहे. अन्न व औषध प्रशासनाद्वारे व शासनाद्वारा या कामी नेमलेल्या नोडल ऑफिसर्स द्वारा राज्यातील सर्व जिल्ह्यांना वेळेत ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले जात आहेत.

■ *रेमडेसिवीरचा साठा वितरणासाठी उपलब्ध*

रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन मे.सिप्ला, हेटेरो, झायडस, मायलन, सन फार्मा, डॉ.रेड्डीज व जुबिलंट या औषध उत्पादक कंपन्यामार्फत करण्यात येते. राज्यात मे. सिप्ला लि. या उत्पादकाचे उत्पादन होते. वरील उत्पादकांच्या प्रामुख्याने भिवंडी, पुणे व नागपूर येथील डेपोमधून या औषधाचा पुरवठा करण्यात येतो. केंद्र शासनाचे पत्र २४ एप्रिल २०२१ अन्वये महाराष्ट्र राज्यासाठी वरील सात उत्पादक मिळून एकूण ४,३५,००० रेमडेसिवीरचा साठा २१ एप्रिल २०२१ ते ३० एप्रिल २०२१ या कालावधीत करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार २१ जानेवारी २०२१ ते २८ एप्रिल २०२१ अखेर पर्यन्त २,९८,०२४ इतका साठा खाजगी व शासकीय रूग्णालयांना करण्यात आला आहे. पुढील कालावधीत उर्वरित साठा प्राप्त होणे अपेक्षित आहे. २८ एप्रिल २०२१ रोजी राज्यात २८९४५ इतका साठा वितरीत झाला आहे. २९ एप्रिल २०२१ रोजीच्या वितरणासाठी अंदाजे ३०,००० इतका साठा वितरणासाठी उपलब्ध होणे अपेक्षित आहे. अशी माहिती डॉ. शिंगणे यांनी दिली आहे.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
10 मे पर्यंत राज्यातील रेमडेसिविर तुटवडा संपणार

10 मे पर्यंत राज्यातील रेमडेसिविर तुटवडा संपणार

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

घनकचरा टाकून रस्त्यांची झाली कचराभूमी !

घनकचरा टाकून रस्त्यांची झाली कचराभूमी !

January 23, 2021
नाशिममध्ये ऑक्सिजन गळतीने २२ रुग्णांचा मृत्यू

नाशिममध्ये ऑक्सिजन गळतीने २२ रुग्णांचा मृत्यू

April 21, 2021
इम्पल फार्म कारखान्याला बेकायदेशीर उत्खनन प्रकरणी पडले महागात

इम्पल फार्म कारखान्याला बेकायदेशीर उत्खनन प्रकरणी पडले महागात

January 14, 2021
मड्याच्या टाळूवरचे लोणी खाणे…

मड्याच्या टाळूवरचे लोणी खाणे…

August 15, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!