Thursday, July 9, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

बोईसरमधुन धावली आँक्सिजन एक्स्प्रेस

पालघर दर्पण by पालघर दर्पण
April 19, 2021
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
बोईसरमधुन धावली आँक्सिजन एक्स्प्रेस
0
SHARES
240
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾ रेल्वेच्या माध्यमातून प्राणवायूची वाहतूक

पालघर दर्पण, प्रतिनिधी

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

बोईसर: महाराष्ट्रात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान माजवले असुन आरोग्य यंत्रणेपुढे आता प्राणवायू टंचाईचे मोठे आव्हाहन उभे ठाकले आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरात प्राणवायूचा तुटवडा भासत असल्याने तुटवडा दूर करण्यासाठी ऑक्सिजन एक्सप्रेस द्वारे उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या प्राणवायूची वाहतूक केली जाणार आहे.

करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असुन मृत्यू संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश रूग्णालयात प्राणवायूचा साठा कमी झालेला असुन उपचारासाठी प्राणवायूची मागणी मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे  रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. ही गैरसोय थांबवण्यासाठी रेल्वेच्या माध्यमातून प्राणवायूची वाहतूक केली जाणार आहे. रेल्वे रुळांवर ऑक्सिजन एक्सप्रेस धावणार असुन रविवारी बोईसर येथे ट्रायल घेण्यात आली. टँकर मध्ये प्राणवायू भरण्यासाठी विजाग, अंगुल आणि भिलाईत रॅम्प केले जातील. देशात यासाठी ३ रॅम्प तयार करण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र व मध्यप्रदेश सरकारने रेल्वे मंत्रालयाला रेल्वेद्वारे द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू (लिक्विड मेडिकल ऑक्सिजन) रेल्वेद्वारे नेता येईल का अशी विचारणा केली होती. रेल्वेने याची तांत्रिक व्यवहार्यता तपासुन ऑक्सिजन एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १९ एप्रिल (आज) विशाखापट्टणम च्या दिशेने पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस धावली असुन ही एक्सप्रेस १० टँकर भरून प्राणवायू घेऊन महाराष्ट्रात परतेल. ऑक्सिजन एक्सप्रेसची वाहतूक कोणत्याही अडथळ्याविना व्हावी यासाठी ग्रीन कोरिडोर तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. ऑक्सिजन एक्सप्रेस माध्यमातून प्राणवायूच्या रिकाम्या टँकरला  कळंबोली-बोईसर येथून मुंबई येथे पाठवली जाणार असून पुढे ही एक्सप्रेस विशाखापट्टणम, जमशेदपूर, रुरकेला, व बोकरो येथे पाठवली जाणार आहे. तिथे या रिकाम्या टँकरमध्ये द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू (लिक्विड मेडिकल ऑक्सिजन) भरण्यात येईल.

■ *रोल ऑन रोल ऑफ सेवेद्वारे प्राणवायूची वाहतूक केली जाणार.*

रस्त्यांवरच्या अनेक ठिकाणी रोड ओव्हरब्रिज असल्याने टँकर्स जाणे शक्य नव्हते. त्यामुळे ३३२० एमएम उंचीचे असलेले टी१६१८ या रोड टँकर मॉडेल १२९० मिमी  उंची असलेल्या समतल वँगनवर ठेवले जाणार असल्याची माहिती आहे. हे टँकर कळंबोली स्थानकात हलविले जाणार असुन देशातील तीन रॅम्प पैकी एक रॅम्प कळंबोली येथे तयार होणार आहे.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
खाजगी रुग्णालयात करोनावर उपचार घेणाऱ्या आदिवासी रुग्णांसाठी महत्वाचा निर्णय

खाजगी रुग्णालयात करोनावर उपचार घेणाऱ्या आदिवासी रुग्णांसाठी महत्वाचा निर्णय

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

महामार्गालगत लावली जात घातक रासायनिक घनकचऱ्यांची विल्हेवाट

महामार्गालगत लावली जात घातक रासायनिक घनकचऱ्यांची विल्हेवाट

April 13, 2026
लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला दीड कोटींचा टप्पा

लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला दीड कोटींचा टप्पा

April 27, 2021
चार दिवसापासून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह सापडला

चार दिवसापासून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह सापडला

May 5, 2026
लाच स्वीकारताना ग्रामीण रुग्णालयाचा हंगामी वैद्यकीय अधिकारी आणि त्याच्या सहकाऱ्याला अटक.

लाच स्वीकारताना ग्रामीण रुग्णालयाचा हंगामी वैद्यकीय अधिकारी आणि त्याच्या सहकाऱ्याला अटक.

April 13, 2026

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.