Monday, May 25, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

प्रदूषणकारी कारखान्यांवर प्रादेशिक अधिकाऱ्याकडून सोईनुसार कारवाई

पालघर दर्पण by पालघर दर्पण
February 18, 2021
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
प्रदूषणकारी कारखान्यांवर प्रादेशिक अधिकाऱ्याकडून सोईनुसार कारवाई
0
SHARES
169
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾ चार कारखाने एकाच दिवशी बंद करण्याचे आदेश तर बड्या उद्योजकांच्या कारखान्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव असताना देखील निर्णय नाही

पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण सोईनुसार कारवाई करत असल्याचे दिसून आले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाची लघू उद्योजकांवर कारवाई करण्यासाठी एकीकडे तत्परता दाखवत असताना इतर मोठ्या उद्योगांवर कारवाई करण्यास सोयीस्कररीत्या दिरंगाई करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे लहान उद्योजकांवर तुटपुंज्या उपाययोजना नसल्याने कारवाई केली जात असली तरी लाखो लिटर घातक रसायन सोडताना आढळून आलेल्या कारखान्यांवर मेहबानी का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

तारापूर औद्योगिक क्षेत्रात रासायनिक प्रदूषणाचा विषय रोजच समोर येत असून याठिकाणी होणाऱ्या रासायनिक प्रदूषणामुळे येथे जनजीवन धोक्यात आले आहे. रात्रीच्या वेळी घातक रसायन सोडणे, विषारी वायू सोडणे व घनकचऱ्यांची बेकायदेशीर पणे विल्हेवाट लावणे यामुळे येथील सभोवतालचा परिसर पुर्ण पणे प्रदूषित झाला आहे. औद्योगिक क्षेत्रातील काही उद्योगांना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर अवघ्या दोन दिवसात कारवाईचा बडगा उभारला तर काही मोठ्या उद्योगाला कारवाईसाठी शिफारस केल्यानंतर महिना सव्वा महिना उलटला तरी कोणतीही कारवाई झाली नसल्याचे दिसून आले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे तारापूर येथील लघुउद्योजक भरडला जात असून परिणामी येथील उद्योगांना इतर राज्यांमध्ये स्थलांतरित करण्याचा विचार सुरू झाला आहे.

तारापूर मधील काही मोठ्या उद्योगांचे राजकीय पुढाऱ्यांची जवळीक असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यास प्रदूषण नियंत्रण मंडळ चालढकल करत असल्याचे तारापूर मधून एकंदर कारवाई सत्राचा अभ्यास केल्यानंतर दिसून येते. तर प्रदूषण करणाऱ्या सर्व उद्योगांना एकाच पद्धतीने कारवाई करायची व कारवाई करण्यापूर्वी नियमावलीमध्ये सुसूत्रता आणण्याची मागणी येथील कारखानदारांन कडून करण्यात येत आहे. तारापूर मधील प्रदूषणाचा ठपका ठेवून चार उद्योजकांवर एकाच दिवशी कारवाई करण्यात आली. यामध्ये श्रेयाना केमिकल डब्ल्यु- ४३,शेया केमिकल टी-१३/१४, ओशिनिक लॅबरोटरीज प्रा.लि एल -९१,मोल्टस रीसर्च लॅबरोटरीज एन – ५९,एनजीएल फाईन केम.ली.डब्ल्यु-४१, कॅम्लीन फाईन केमिकल ली. डी.२/३,नोवाफेन स्पेशलीटीज प्रा.ली.एन -२७ या कारखान्यांचे कंपन्यांना उत्पादन बंद च्या नोटीस दिल्या असून या खेरीज आणखीन 16 कंपन्यांचे उत्पादन बंद झाले. यातील चार कारखान्यांला उत्पादन बंदची नोटीस एक दिवसात देण्यात आले आहे.

◾औद्योगिक क्षेत्रातील आरती सहमुहातील प्रदूषणकारी कारखाने व त्या कारखान्यातील रासायनिक सांडपाणी सत्तरबंगला भागातील एस ४७ याठिकाणी विल्हेवाट लावण्यासाठी आणले जात असल्याचे उघड झाले असताना देखील प्रादेशिक अधिकारी राजेंद्र राजपूत यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्या कडे अहवाल पाठविला असल्याचे नाट्य गेल्या महिन्याभरापासून लावून धरले आहे. यामुळे अशा अधिकाऱ्यांना राष्ट्रीय हरित लवादाच्या कारवाईचे अभय असल्याचे दिसून येते.

◾प्रदूषणकारी कारखान्यांवर आम्ही कारवाई करत आहोत. यातील काही उद्योजकांवर कारवाई बाबत अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठवला आहे. त्यांनी होकार दिल्यानंतर तातडीने कारवाई करू. कोणत्याही उद्योजकाला मोकळीक दिली जात नाही.

— राजेंद्र राजपूत, प्रादेशिक अधिकारी ठाणे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
पेट्रोल दरवाढी वर राहुल गांधींनी केलं ट्विट

पेट्रोल दरवाढी वर राहुल गांधींनी केलं ट्विट

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

विरार रेल्वे स्थानकाबाहेर वाहतूक कोंडीच्या समस्येत वाढ अवैध रित्या रस्त्यांवर पार्किंग

विरार रेल्वे स्थानकाबाहेर वाहतूक कोंडीच्या समस्येत वाढ अवैध रित्या रस्त्यांवर पार्किंग

November 16, 2020
महसूल विभागाच्या तडजोडीने सरकारी जागेवर भुमाफियांचे बस्तान

महसूल विभागाच्या तडजोडीने सरकारी जागेवर भुमाफियांचे बस्तान

May 5, 2026
भारत केमिकल मध्ये स्फोट

भारत केमिकल मध्ये स्फोट

April 13, 2026
पालघरच्या लाचखोर शिक्षणाधिकारी लाच स्विकारताना ताब्यात

पालघरच्या लाचखोर शिक्षणाधिकारी लाच स्विकारताना ताब्यात

April 25, 2022

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!