Thursday, August 13, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

प्रदूषणकारी आरती ड्रग्ज कारखाना बंद

पालघर दर्पण by पालघर दर्पण
January 10, 2021
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
प्रदूषणकारी आरती ड्रग्ज कारखाना बंद
0
SHARES
141
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾अतिशय प्रदूषणकारी उद्योजक समुहाचा कारखान्यांवर अखेर कारवाई; याच उद्योजकांच्या इतर प्रदूषणावर कारवाई बाबत दिरंगाई

पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सर्वात प्रदूषणकारी असलेल्या एका उद्योजकांचा प्रदूषणकारी कारखाना बंद करण्याचे उत्पादन बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सर्वेक्षणात नियमांचे पालन केले जात नसल्याचे आढळून आल्याने कारखान्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

तारापूर औद्यागिक क्षेत्रातील प्रदूषकारी आरती ड्रग्ज लि. प्लाट नं. ई- 21, या कंपनीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने उत्पादन बंदची कारवाई केली आहे. या कारखानदारांच्या वाढत्या प्रदूषणाबाबत व या उद्योग समूहाच्या विविध कंपन्यांमधून निघणाऱ्या रसायनिक सांडपाणी व घातक घन कचर्‍याची विल्हेवाट राज्याच्या विविध भागात नैसर्गिक स्रोतांमधे मागील अनेक वर्षांपासून लावली जात असल्याबाबत अनेकदा उघडकीस आले होते. यातच मागील महिन्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात उपप्रादेशिक अधिकाऱ्यांच्या सर्व्हेक्षण दरम्यान आरती ड्रग्ज लि. प्लाट नं. ई -21, या कंपनीत पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण नियमांचे पालन केले जात नसल्याचे आढळून आले होते.

आरती ड्रग्ज कारखान्यात उत्पादन घेतल्या जाणाऱ्या डायथिल सल्फॉक्साईड (डीएमएसओ) च्या निर्मिती प्रक्रीये दरम्यान निघणारे रसायन आणि त्याची विल्हेवाट कशा प्रकारे लावली जात आहे याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिली नसल्याचे कारखाना बंद करण्याचे देण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे. आरती ड्रग्स या उद्योजक समुहाला तारापूर मधील सर्वात जास्त प्रदूषणकारी ठरवत कोट्यवधी रुपयांचा दंड राष्ट्रीय हरित लवादाने ठोठावला आहे. असे असले तरी या कारखान्या कडून प्रदूषण सुरूच ठेवले असून या उद्योजकांच्या इतर प्रदूषणकारी कारखान्यांवर देखील कारवाई करण्याची मागणी नागरीकांन कडून केली जात आहे.

◾कारखान्यातील त्रुटी

1) या कंपनीतून उत्पादन प्रक्रिये दरम्यान निघणाऱ्या उच्च सीओडी / उच्च टीडीएस सांडपाणी वाहतुक करणाऱ्या टँकरवर जीपीआरएस प्रणालीची नोंद नाही. हे रासायनिक सोडपाणी प्रक्रियेसाठी सहयोगी कंपनी टी -150 एमआयडीसी तारापूर, येथे पाठविल्याची नोंद नाही.

2) लाइन मॉनिटरिंग सिस्टम प्रदान केलेले नाही

3) या कंपनीतील उत्पादन प्रक्रियेतून निघणारा घातक घन कचरा मे. (एमडब्ल्यूएमएल) तळोजा या ठिकाणी विल्हेवाट लावण्यासाठी पाठविल्याबाबतची एप्रिल -2020 ते ऑक्टोबर 2020, पर्यंतची कोणताही माहिती उपल्बध नाही. 5)

4) ईटीपी आउटलेटमधून संकलित केलेली जेव्हीएस पॅरामीटर सीओडी – १२५६० मिलीग्राम/एल, टीडीएस-४८५२ मिलीग्राम/एल म्हणजे जो संमती मर्यादेपेक्षा जास्त आढळून आला आहे.

5) या कंपनीत उच्च सीओडी / उच्च टीडीएस प्रवाह वेगळा करण्यासाठी आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी पारंपारिक प्रवाही उपचार केंद्र (ईटीपी) ची स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध नाही.

◾ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे उपलब्ध सर्व अहवाल आणि नोंदी तपासल्यानंतर या कंपनीने जाणूनबुजून आणि हेतुपुरस्सर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (संमत्तीपत्र) परवान्यातील व provisions of Water (P & CP) Act, 1974 and Air (P & CP) Act, 1981. नियम व तरतुदीं मधील अटींचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्यालय मुंबई यांच्याकडील आदेशानुसार प्रादेशिक अधिकारी ठाणे यांनी 4 जानेवारी रोजी या कंपनीचे उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार 72 तासा नंतर कारखान्यांचे उत्पादन बंद करण्यात आले आहे.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
बोईसरच्या भुमाफियांना स्थानिक अधिकाऱ्यांची साथ

बोईसरच्या भुमाफियांना स्थानिक अधिकाऱ्यांची साथ

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

बोईसर पोलिसांच्या तडजोडी कार्यक्रमाकडे पोलीस अधीक्षक लक्ष देणार का?

बोईसर पोलिसांच्या तडजोडी कार्यक्रमाकडे पोलीस अधीक्षक लक्ष देणार का?

September 7, 2020
मनोर परिसरात मोहर्रम साधेपणाने साजरा.

मनोर परिसरात मोहर्रम साधेपणाने साजरा.

September 1, 2020
पालघर मध्ये मृतदेह बाईकवरून नेण्याची वेळ

पालघर मध्ये मृतदेह बाईकवरून नेण्याची वेळ

May 5, 2026
चर्चेच्या ९ फेऱ्या होऊन देखील तोडगा नाही

चर्चेच्या ९ फेऱ्या होऊन देखील तोडगा नाही

January 17, 2021

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.