पालघर दर्पण: प्रतिनिधी
मुंबई: जेष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे वृद्धापनकाळाने निधन झाले आहे. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांच्या ठाण्यातील राहत्या घरात अखेर चा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण सिनेमासृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. वय वर्ष ८४ होऊन देखीलही रवी पटवर्धन अग्गं बाई सासू बाई या मालिकेत आजोबाची भूमिका निभावत होते. गेली ५० वर्ष अनेक मराठी चित्रपट, मलिका, नाटक तसेच हिंदी चित्रपटांच्या माध्यमांतून वेगवेगळ्या भूमिकेत पटवर्धन हे प्रेक्षकांच्या भेटीस आले. अग्गं बाई सासू बाई ही त्यांची शेवटची मालिका ठरली.
१९७१ मध्ये प्रदर्शित झालेल्या अशा असाव्या सुना हा त्याचा पहिला मराठी चित्रपट होता. त्या नंतर त्यांची जी सुरवात झाली ते कधी थांबलेच नाही. एका मागोमाग चित्रपटात त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. जवळपास १०० मराठी चित्रपटात पटवर्धन यांनी काम केले आहे.

















