Tuesday, May 26, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

सिंधुदुर्ग ठरला,राज्यातील आदर्श जिल्हा पत्रकार संघ

पालघर दर्पण by पालघर दर्पण
December 5, 2020
in ताज्या बातम्या, राज्य
0
सिंधुदुर्ग ठरला,राज्यातील आदर्श जिल्हा पत्रकार संघ
0
SHARES
308
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार जाहीर; पालघर जिल्ह्यात होणार पुरस्कार वितरण कार्यक्रम

पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

मुंबईः आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर याचं स्मारक व्हावं यासाठी सतत पंचवीस वर्षे पाठपुरावा करून स्मारकाचे स्वप्न प्रत्यक्षात आणणार्‍या सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाला यंदाचा मानाचा समजला जाणारा रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने राज्यात सर्वोत्कृष्ट काम करणार्‍या जिल्हा संघाला दरवर्षी हा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो. मानपत्र, स्मृतीचीन्ह आणि शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. फेब्रुवारीत पालघर जिल्हयात होणार्‍या कार्यक्रमात पुरस्कार वितरण करण्यात येणार असल्याची माहिती परिषदेचे विश्‍वस्त एस. एम.देशमुख यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.

महाराष्ट्रात परिषदेशी संलग्न असलेल्या जिल्हा संघांच्यावतीने पत्रकारांच्या हक्काचे तसेच सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत अनेक उपक्रम राबविले जातात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा यथोचित सन्मान परिषदेच्यावतीने करण्यात येतो. यापुर्वी नाशिक, भंडारा, नांदेड, पुणे आदि जिल्हयांना परिषदेच्यावतीने गौरविण्यात आले आहे. यंदाचा हा पुरस्कार पत्रकारांची पंढरी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघास जाहीर करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग ही बाळशास्त्री जांभेकर यांची जन्मभूमी आहे. आचार्य जांभेकर यांच्या जन्मभूमीत त्याचं स्मारक व्हावं यासाठी जिल्हा पत्रकार संघ गेेली पंचवीस वर्षे पाठपुरावा करतो आहे. अखेर जिल्हा संघाच्या या प्रयत्नास यश आले असून स्मारक लवकरच पूर्णत्वास जात आहे.परिषदेने सिंधुदुर्ग जिल्हयाचा सन्मान करताना तयांनी केलेल्या या कामाची दखल घेतली आहे.

एवढेच नव्हे तर जिल्हा संघाच्यावतीने इतरही विविध उपक्रम राबविण्यात येतात. जिल्हा संघानं मागील डिसेंबरमध्ये परिषदेची कार्यशाळा घेतली, जिल्हा स्तरावर सातत्यानं कार्यशाळा घेतल्या जातात,गरजू पत्रकारांना मदतीचा हात देण्याचे, कोरोना काळात पत्रकारांना मदतीचे अनेक उपक्रम जिल्हा संघानं राबविले आहेत. नियमित निवडणुका, चोख आर्थिक व्यवहार,नियमित बैठका घेऊन संघटन शक्ती वाढविण्याचं काम जिल्हा संघानं केलं आहे. त्यामुळे जिल्हयातील 90 टक्के पत्रकार जिल्हा संघाबरोबर जोडलेले आहेत. एक आदर्श जिल्हा संघ म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा संघाचे काम सुरू असल्याने परिषदेने सिंधुदुर्गची निवड केली आहे. या पुरस्काराबदादल परिषदेचे अध्यक्ष आणि सिंधुदुर्गचे सुपूत्र गजानन नाईक आणि जिल्हा संघाचे अध्यक्ष गणेश जेठे यांचे आणि त्यांच्या सर्व सहकार्‍यांचे एस.एम.देशमुख, विश्‍वस्त किरण नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, कोषाध्यक्ष विजय जोशी, महिला संघटक जान्हवी पाटील, प्रसिध्दी प्रमुख अनिल महाजन यांनी अभिनंदन केले आहे.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
अखेर चित्रालय रस्ता रुंदीकरणाला सुरूवात

अखेर चित्रालय रस्ता रुंदीकरणाला सुरूवात

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

महामार्गावर पडलेली मृत गाय हटविण्यासाठी लागले अठरा तास

महामार्गावर पडलेली मृत गाय हटविण्यासाठी लागले अठरा तास

December 13, 2020
शरद पवारांनी केल्या मोदींवर टीका

शरद पवारांनी केल्या मोदींवर टीका

March 7, 2021
विक्रमगड पोखरणाऱ्यांन विरोधात युवा प्रहार आक्रमक

विक्रमगड पोखरणाऱ्यांन विरोधात युवा प्रहार आक्रमक

October 28, 2020
जिल्हा परिषद अध्यक्षांच्या घरचा दारचा उमेदवार पराभूत

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या घरचा दारचा उमेदवार पराभूत

April 13, 2026

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.